येत्या काळात भारतात, इतकंच नाही तर जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शेअर मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे भाव वाढून इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वागताची जंगी तयारी सुद्धा झालेली आहे.
भारतात सध्या बऱ्याच राज्यांमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या उपयोगाकडे जगाचे लक्ष वेधले गेले. पण योग्य तंत्रज्ञानाच्या अभावामुळे या वाहनांचा विकास होऊ शकला नाही.
या वाहनांच्या वापराने पेट्रोलचा खर्च २५ % कमी केला जाऊ शकतो. हि वाहनं त्यातील बॅटरी किंवा चार्ज करण्याच्या एखाद्या बाहेरील सोअर्स च्या मदतीने चालतात.
जसजसे तंत्रज्ञान उपलब्ध होऊ लागले तसे जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. भारतातल्या वाहन निर्मात्यांनी सुद्धा इलेक्ट्रिक वाहने बाजारात उतरवायला सुरुवात केली आहे.
पेट्रोल डिझेलचे दिवसेंदिवस गगनाला भिडणारे भाव पाहता इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज होणार आहे, हे काही आता वेगळे सांगायला नको.
इंधनाचे वाढते भाव हे जसे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देतात तसेच त्याचे इतर कोणते फायदे आहेत ते आपण पुढे बघू.
१) मेंटनन्स कमी लागतो: यात इंधनाचा वापर होत नसल्याने मेकॅनिकल पार्ट्स कमी असतात, त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा मेंटनन्स ठेवण्याचा खर्च कमी येतो.
२) ध्वनी प्रदूषण: इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ज्या प्रकारच्या मोटार वापरल्या जातात त्याने ध्वनी प्रदूषण कमी व्हायला मदत होते.
या गाड्या सुरू होताना सुद्धा खूप कमी आवाजाची निर्मिती होते.
वाहनात बसलेल्या लोकांना सुद्धा केबिन मध्ये मोटरच्या आवाजाचा त्रास होत नाही.
३) मेकॅनिकल वाहनांच्या तुलनेत गाडी चालवणे सोपे : या वाहनांचा आणखी एक फायदा म्हणजे ही वाहनं ड्राईव्ह करण्यासाठी म्हणजेच चालवण्यासाठी सुद्धा सोपी असतात.
ही वाहनं गियरलेस असतात आणि ती चालवताना प्रामुख्याने एक्सलरेटर आणि ब्रेकचाच वापर करावा लागतो. त्यामुळे गिअर न बदलता प्रवास करणे शक्य होते.
४) प्रदूषण मुक्त वातावरण: इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात महत्त्वाचा आणि दूरगामी फायदा हा प्रदूषण मुक्त वातावरणासाठी होतो.
या वाहनांच्या वापराने आपल्या भोवतालच्या परिसरातील प्रदूषण नियंत्रित ठेवणे शक्य होऊ शकते.
५) चांगली स्पेस: या कार मध्ये पुढच्या बाजूला गिअर लिव्हर नसल्याने ती जागा जास्त मिळते. त्याशिवाय कार मध्ये उत्तम लेग रूम, स्टोअरेज स्पेस सुद्धा मिळते.
६) घरातूनच चर्जिंग शक्य: भारतातील सर्व इलेक्ट्रिक कार कम्पन्या कार बरोबर घरी चर्जिंग ची सुविधा सुद्धा देतात. त्याशिवाय शहरात ठिकठिकाणी चर्जिंग स्टेशन सुरू करण्यावर सुद्धा सरकारचा विचार चालू आहे.
या कार सामान्य सॉकेट हुन ३ ते ४ तासात चर्जिंग करणे सहज शक्य होते.
७) रनिंग कॉस्ट: पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा या वाहनांचा प्रति किलोमीटर खर्च कमी होतो.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक कार या एका चार्ज मध्ये ४५० किलोमीटर अंतर सहज कापू शकतात. यामुळे येणारा खर्च हा २ ते ३ रुपये प्रतिकिलोमीटर पेक्षाही कमी येतो. पेट्रोल च्या तुलनेत २५% बचत यातून शक्य होऊ शकते.
८) सरकारी मदत: इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा म्हणून सरकरकडूनही काही सवलती, सबसिडी दिल्या जातात.
मित्रांनो, हे सर्व फायदे पाहता पुढची वाहन खरेदी करताना इलेक्ट्रिक वाहनांचा विचार करून बघायला काहीही हरकत नाही.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
किंमत जास्त होतृय
किंमत जास्त होतेय