नोव्हेंबर २०१९ पासून कोरोना विषाणूनं जगाला हादरवलय. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा हा विषाणू नेमका काय आहे, त्याचे नेमके काय परिणाम दिसतात याचा कोणताच अंदाज कोणाला नव्हता.
वरवर दिसणारी लक्षणं पाहून रुग्णाला औषधं मिळायची. पण प्रतिकार शक्ती किती कमी झाली याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे कोरोनाच्या आजारातून बरं झाल्यावर पुन्हा कोणता वेगळाच आजार उद्भवू शकेल याची शक्यता सांगणं कठीण होतं.
मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग एवढ्याच त्रिसुत्रीवर लोकांनी आपापला जीव सांभाळणं गरजेच झालं.
२०२० च्या शेवटाला एकीकडून ‘कोरोनाची लस आता लोकांना मिळणार’ अशा बातम्या येत होत्या. तर दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता दाट झाली. आणि झालंही तसंच.
कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा तीव्र झाली. ज्या गतीनं पेशंट वाढत होते त्या गतीनं लोकांना लस मिळणं शक्य झालं नाही.
त्यापुढे जाऊन आता असं दिसतय की कोरोनामुळे लोकांची प्रतिकार शक्ती खूप खालावते आहे.
त्यामुळे असे लोक आता नव्या आजाराला बळी पडत आहेत. काही ठिकाणी असंही दिसून आलं आहे की कोरोना झालेला नसला तरी लोकांमध्ये हा आजार फैलावतो आहे. त्या आजाराचं नाव आहे ‘म्युकरमायकोसिस’ म्हणजे काळी बुरशी.
तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांची मुळातच प्रतिकार शक्ती कमी आहे, जी व्यक्ती मधुमेह, हृदयरोगाने ग्रस्त आहे किंवा आतड्याचा आजार असेल, तर अशा लोकांनी अधिक सावधगिरी बाळगावी. या व्यक्ती लवकर म्युकरमायकोसिसला बळी पडण्याची शक्यता आहे.
नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर के. पॉल यांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोनाच्या आधीपासूनच म्युकरमायकोसिसचं अस्तित्व आहे.
मधुमेह किंवा इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्ती लवकर या आजाराला बळी पडू शकतात. अशा वेळी रक्तदाबाची पातळी ७००-८०० पर्यंत पोहोचू शकते.
या परिस्थितीला कीटोअसिडोसिस म्हणतात. बालकांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही हा आजार होऊ शकतो. तसेच न्युमोनिया सारख्या आजारांचा धोका वाढतो.
सध्या कोरोनामुळे या आजाराचा धोका वाढला आहे. एम्स रुग्णालयाचे डॉक्टर निखिल टंडन यांच्या मते, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे त्यांनी म्युकरमायकोसिसला घाबरण्याची गरज नाही.
काळ्या बुरशीच्या संसर्गाची शक्यता असलेल्या व्यक्ती :
कोरोनाबाधित किंवा त्यातून बरं झालेल्या व्यक्ती, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खालावली आहे अशांना काळ्या बुरशीचा म्हणजेच म्युकरमायकोसिसचा धोका जास्त संभवतो.
यामध्ये नाक, डोळे, सायनस आणि काही केसेसमध्ये मेंदूलाही संसर्ग झाल्याचं दिसून आलं आहे.
याशिवाय मधुमेह, हृदयरोग, मूत्रपिंड रोग, वृद्धपकाळ किंवा संधिवाताने त्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस लवकर पसरत आहे.
कोरोना रुग्णावर उपचार करताना स्टिरॉइडला जीवनरक्षक उपचार असं मानलं जातं. पण त्याचेच काही दुष्परिणाम आता दिसून येत आहेत.
स्टिरॉइड दिल्यास व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होते आणि काळ्या बुरशीचा संसर्ग व्हायला वाव मिळतो. त्यामुळे डॉक्टरांच्या निरीक्षणाखालीच स्टिरॉइड्सचा योग्य वापर झाला पाहिजे.
कोरोनाची दुसरी लाट आल्यावर म्युकरमायकोसिस आजाराचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
आतापर्यंत देशात या आजाराचे जवळपास नऊ हजार रुग्ण नोंदवले गेले आहेत. अनेक राज्यांनी म्युकरमायकोसिसला साथीचा रोग असं जाहीर केलं आहे.
तेव्हा मित्रांनो काळजी करण्यापेक्षा किंवा नवीन आजार म्हणून घाबरण्यापेक्षा मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग ही त्रिसूत्री पाळूया, आपला परिसर स्वच्छ ठेवूया आणि एकमेकांना सुरक्षित ठेवूया.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.