भांडी घासायला १५० रूपये पगार घेणाऱ्या व्यक्तीने उभा केला 30 करोडचा डोशांचा बिझनेस !

भांडी घासायला १५० रूपये पगार घेणाऱ्या व्यक्तीने उभा केला 30 करोडचा डोशांचा बिझनेस !

पहिल्याच वर्षी आपल्या रेस्टॉरंटमध्ये दिल्या २६ प्रकारच्या व्हरायटी!

आभाळात उंच भरारी घेणं फार अवघड नाही फक्त तुमच्या पंखात ताकद कमवायला हवी.

असे मोजकेच लोक आहेत, असतात ज्यांना आपल्या पंखातली ताकद माहिती असते.

अशा व्यक्ती कितीही संकटं आली तरी हार मानत नाहीत.

या कठीण परिस्थितीनंतर, संघर्षानंतरच यशाची चव चाखायला मिळणार याची त्यांना खात्रीच असते.

भारताचे “डोसा किंग” प्रेम गणपती यांचा प्रवास असाच काहीसा आहे.

अगदी सामान्य परिस्थितीपासून “डोसाकिंग” होण्यापर्यंत प्रेम गणपती यांना काय काय अडचणी आल्या ते आज जाणून घेऊया.

प्रेम गणपति हे तामीळनाडूच्या ‘तुतीकोरीन’ जिल्ह्यात नागलपुरम गावात १९७३ साली एका गरीब कुटुंबात जन्मले.

त्यांना ७ भावंड आहेत. गरीबीमुळे शिक्षण घेऊ न शकलेल्या प्रेम गणपती यांना परीवाराला हातभार लावण्यासाठी पडेल ते काम करावं लागलं .

२५० रुपये मिळवत प्रेम गणपती आपल्या कुटुंबासाठी आर्थिक कमाईचा हातभार लावत होते.

पण एवढ्या मोठ्या कुटुंबासाठी ही कमाई तुटपुंजीच होती.

प्रेम गणपती यांनी मनोमन मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. घरात कुणालाही न सांगता मुंबई गाठली.

या निर्णयामागे एक कारण असं होतं की एका ओळखीच्या गृहस्थानी “चल तुला १२०० रूपयांची नोकरी देतो” असं सांगीतलं होतं.

१२०० ही रक्कम मोठी होती, पण यासाठी मुंबईला जायला आईवडील परवानगी देणार नाहीत हे प्रेम गणपतींना पक्कं माहिती होतं.

म्हणून घरी काहीच न सांगता प्रेम गणपती मुंबईत पोचले.

मुंबईत पोचल्यावर मात्र प्रेम गणपती यांचेच २०० रूपये घेऊन त्या गृहस्थाने पळ काढला.

शेवटी त्यांनी माहीमच्या बेकरीत भांडी घासायचं काम पत्करलं.

तिथेच रात्री झोपायची ही सोय झाली. १५० रुपये कामाचे आणि झोपण्याची सोय या पद्धतीने प्रेम गणपती यांचं जीवन सुरू झालं.

जवळपास २ वर्ष प्रचंड मेहनत करून, प्रेम गणपती यांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये काम ही केलं.

या परिस्थितीत त्यांनी ठाम निश्चय केला की कितीही काम करायला लागलं तरी हरकत नाही पण जास्तीत जास्त पैसे कमवायचे.

प्रचंड मेहनत आणि पैशांची बचत करत करत १९९२ साली स्वतः चा खाद्यपदार्थांचा गाडा सुरू करायचा हे त्यांनी ठरवलं.

यासाठी वाशी रेल्वे स्टेशन समोर एक गाडा १५० रुपये महिना या पद्धतीने भाड्याने घेऊन इडली डोशांचा व्यवसाय सुरू केला.

१००० रूपये खर्च करुन गँस भांडी, कच्चा माल यांची खरेदीसुद्धा झाली.

कामाची सुरुवात तर उत्तम झाली. मदतीला मुरुगन आणि परमशिवन या भावांना ही बोलावून घेतलं.

लवकरच प्रेम गणपती आणि त्यांच्या भावांच्या मेहनतीला फळ मिळायला लागलं.

त्यांच्या पदार्थांची चव, स्वच्छता या गोष्टींचा चांगला प्रभाव पडत होता.

याशिवाय एप्रन, कँप वापरल्यामुळे लोक त्यांच्या पदार्थांना पसंती द्यायला लागले.

प्रेम गणपती यांचा महिन्याचा फायदा २०००० रूपयांपर्यत वाढला. वाशीतच त्यांनी आणखी एक जागा भाड्याने घेऊन व्यवसाय वाढवला.

अडचणींचा डोंगर

व्यवसाय सुरु करणं सोपं असतं पण, त्याची घडी बसवणं महाकठीण काम असतं. प्रेम गणपतींना याचा पुर्ण अनुभव आला.

कितीतरी वेळा नगरपालिकेच्या लोकांनी हा गाडा जप्त केल, याचं कारण प्रेम गणपती यांच्याकडे लायसन्स नव्हतं.

दंड भरून वारंवार न थकता त्यांनी आपला गाडा सोडवून आणला.

सातत्याने होणाऱ्या या समस्येवर काही ठोस उपाय केले पाहिजेत.

पूर्ण विचारांती प्रेम गणपती यांनी स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलं.

स्वतः च्या जीवतोड मेहनतीने यशाची चढती कमान प्रेम गणपती अनुभवत होते.

१९९७ ला वाशीमध्येच ५० हजार डिपॉझिट आणि आणि ५ हजार मासिक भाडं देत त्यांनी रेस्टॉरंटची सुरुवात केली, नाव होतं “प्रेमसागर डोसा प्लाझा”.

या रेस्टॉरंटसाठी दोन कर्मचारी ही नियुक्त केले गेले.

हे रेस्टॉरंट कॉलेज प्रेमी युवकांच्यात खूप लोकप्रिय झालं.

पहिल्याच वर्षी या रेस्टॉरंटमध्ये डोशाची जवळपास २६ प्रकारची व्हरायटी होती.

२००२ सालापर्यंत डोशांचे १०५ प्रकार तिथे उपलब्ध झाले !

अजूनही प्रेम गणपती समाधानी नव्हते. त्यांचं स्वप्न होतं की एखाद्या मॉलमध्ये आपलं रेस्टॉरंट दिमाखात सुरु करावं.

प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला कधीच हार मानावी लागत नाही, थोडा धीर मात्र धरावा लागतो.

प्रेम गणपती यांचा संयम कामी आला आणि ब-याच वेळा प्रयत्न करुनही सत्यात न उतरलेलं स्वप्न २००३ साली मात्र पुर्ण झालं.

ठाण्याच्या वंडर मॉलमध्ये प्रेम गणपती यांची पहिला फ्रँचाइजी आउटलेट डोसा प्लाझाची सुरुवात झाली.

यानंतर मात्र प्रेम गणपतींनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

आज या डोसा प्लाजाचे देशात परदेशात मिळून ७० आउटलेट आहेत.

न्युझीलंड, दुबई आणि ओमान पर्यंत हा डोसा प्लाझा पोचलेला आहे आणि खवैय्यांची पसंती ही मिळवतो आहे.

२०१२ ला डोसा प्लाझाची उलाढाल 30 करोडपर्यंत गेली.

आताच्या घडीला सुद्धा ही घोडदौड चालूच आहे.!

मित्रांनो, प्रेम गणपती यांचा अशक्यप्राय वाटणारा प्रवास तुम्ही ही करु शकता कारण, उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्नं नक्की पुरी होतात….

पण लक्षात ठेवा फक्त त्या स्वप्नांना मेहनतीचे पंख लाभावे लागतात.

Image Credit : The Youth

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।