१०७ वर्षांपूर्वीची दंतकथा बनून राहिलेलं टायटॅनिक वाचू शकलं असतं का?
४६ हजार टनापेक्षा जास्त वजन असणाऱ्या टायटॅनिक ची निर्मिती हारलेंड एंड वॉल्फ शिपयार्ड ने केली होती. थॉमस एन्ड्रू ह्याचा मुख्य आर्किटेक्ट होता. आर.एम.एस. टायटॅनिक चं सारथ्य कॅप्टन एडवर्ड स्मिथ ह्यांच्याकडे होतं. ह्याच्या प्रथम वर्गाच्या श्रेणी मध्ये सुखवस्तू लोकांसाठी सगळ्या सोयी सुविधा केलेल्या होत्या अगदी स्विमिंगपूल, वाचनालय. व्यायामशाळा अश्या सगळ्या गोष्टी त्यात समाविष्ट होत्या.