प्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक-बदनामीचे नवे षडयंत्र!
टिळकांनी सुरुवातीला जनतेला सरकारला ह्या कामी सहकार्य करावे असेच आवाहन केलेले आढळते, तसेच एवढे पुरेसे नसून ह्या संसर्गवर्जक तळावरील लोकांची आबाळ होऊ नये म्हणून त्याचे व्यवस्थापन पालिकेकडे असावे म्हणून मुंबई राज्याचे गवर्नर लॉर्ड सँडहर्स्ट ह्याना अर्ज दिला होता. तो अर्थात मान्य झाला नाही.