ट्रॅजिडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीना कुमारी च्या प्राक्तनाची कहाणी
३० मार्च ला कोमात जाण्यापूर्वी मीनाकुमारी कमाल अमरोहीला शेवटचे बोलली- “चंदन, मी आता अधिक काळ जगेल असे वाटत नाही माझी एकच इच्छा आहे की माझा शेवटचा श्वास मी तुझ्या बाहूपाशात घ्यावा.” ३१ मार्च १९७२ रोजी गुड फ्रायडेच्या दिवशी तीने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या फक्त ३८ व्या वर्षी माझगाव मुंबईच्या नारळवाडीतल्या कब्ररीस्तानमध्ये तिचा देह कायमचा विसावला.