Swaminathan Aayog ला बगल देऊन हमीभावाचे मृगजळ ?
कृषी शात्रज्ञ एम.एस. स्वामिनाथन यांच्या नेतृतवाखालील आयोगाने उत्पादन खर्चावर आधारित पन्नास टक्के नफा देण्याची शिफारस सरकारला केली होती. हमीभाव ठरविण्यासाठी सी-२ हे सूत्र त्यांनी सांगितले होते. यानुसार पीक घेताना बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजुरीचा खर्च, सिंचन, इंधन, कृषी अवजारे, यंत्रसामग्री, जनावरांवर होणारा खर्च धरून दीडपट हमीभाव देण्याचे स्वामीनाथन यांचे सूत्र होते.