‘अटल’ युगाची समाप्ती!
स्वतःला समाजाचा सेवक संबोधून देशातील जनतेसाठी ‘व्यष्टि’ चे बलिदान करण्याचा संकल्प करणाऱ्या ह्या ओळी कुण्या एका सध्या कवी किंवा लेखकांच्या नाहीत. तर, भारतीय राजकारणात एका स्तंभाच्या रूपात स्थापन झालेल्या युगपुरुष अटल बिहारी वाजपेयी यांच्या आहेत. ‘जगण्याला जीवन म्हणावे अशी माणसं शतकातून एखाद्या वेळेला जन्माला येतात’ या पु. ल.च्या वाक्यांची सत्यता पटविणारे जे काही मोजके दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत, त्यापैकी एक म्हणजे अटल बिहारी वाजपेयी.