भारताच्या ताफ्यात नव्याने सामील झालेली शक्तिशाली पाणबुडी आय.एन.एस. अरिहंत

आय.एन.एस. अरिहंत

कारगिल विजय दिवसाच्या दिवशी २६ जुलै २००९ ला तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग ह्यांनी आय.एन.एस. अरिहंत ला हिरवा झेंडा दाखवला होता. आता सगळ्या चाचण्यांमधून पास होऊन, देशाच्या सागरी किनारे आणि आजूबाजूचा समुद्र ह्यांच्या संरक्षणाची धुरा पेलण्यास ती समर्थ झाली आहे. ही पाणबुडी पाण्याखालून शत्रूच्या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला करून त्यांच्या नजरेपासून लपून राहू शकते.

सावजी ढोलकीया यांच्या कम्पनित कर्मचाऱ्यांना बोनस देण्यामागची खरी कहाणी…

सावजी ढोलकीया

ही कंपनी अत्यंत उदारपणे आपल्या कर्मचाऱ्यांना कार बोनस देते असं चित्र रंगवणं चुकीचं असून कर्मचाऱ्यांच्याच बहुतांश पैशातून हे केलं जातं आणि कंपनीला टॅक्स क्रेडिट सारखा लाभ होतो तो वेगळाच असा दावा मेरान्यूजनं केला आहे. असो पण कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला देण्याचा असा हटके प्रयोग पण छानच…  ज्यांना हवे ते कर्मचारी अशी हि भेट घेऊन खुश पण होतील. आणि स्वतः कम्पनीपण त्यांच्या बिजनेस स्कीलने फायदा मिळवेल. थोडक्यात काय तर काहीही फुकटात मिळत नाही हेच खरं. आपण जिथे काम करतो तेही काही वाईट नाही याचं समाधान मानायचं आणि कामाला लागायचं…😅😅

झेंडूची फुले, प्लास्टिक बंदी वगैरे, वगैरे..

प्लास्टिक बंदी

मी परग्रहाहून आल्यासारखा तो बघू लागला. नंतर त्याला काही जाणीव झाली असावी “लोकं प्लास्टिक पिशवीच मागतात काय करावं?” असे सांगून त्याने त्याच्यापुरता हा प्रश्न सोडवला आणि मला अनेक प्रश्न देऊन मोकळा झाला. शासनाने आदेश काढावे आपण त्याची खिल्ली करावी, चांगले आदेश धुळीस मिळवावे, वरून शासन काम करत नाही म्हणून ओरडावे.

‘जांभळ्या स्तनांचा तालिबानी संदेश’ कवी दिनकर मनवर यांच्या कवितेवरील निर्बुद्ध गदारोळ

दिनकर मनवर

जवळपास ५० ओळींच्या या कवितेत कविॅनी समाजासमोर आजच्या वर्तमानातलं दाहक वास्तव मांडलं आहे. “किंवा अदिवासी पोरींच्या स्तनांसारखं जांभळं” या पाच शब्दांच्या ओळीकडे सर्वांचं लक्ष गेल. त्यातही या ओळीतील पाच शब्दांमधील ‘स्तन’ ह्याच शब्दाकडे जास्त लक्ष गेलं असण्याचीच शक्यता जास्त आणि मग पुढचं सगळं घडलं असावं.

एक भेट: लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा – अत्युच्च समाधान…

लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा

बाबा आमटे ह्यांच्या महारोगी सेवा समिती ह्या संस्थेने चालू केलेला लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा इथे. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे तसेच इथल्या अनेक लोकांच्या परिश्रमातून बाबा आमटेंनी लावलेल्या एका छोट्या रोपट्याचं एका वटवृक्षात रुपांतर झालं आहे. आजही त्याच सेवाधार्मातून इथल्या आदिवासी समाजासाठी पूर्ण आमटे कुटुंब कार्यरत आहे.

भुतांनी स्थापली ‘मनुष्यबाधा निर्मुलन समिती’

मनुष्यबाधा

माणसांनी जंगलात अतिक्रमण केले, घरे बांधली, उद्योग उभारले आणि वन्यप्राण्यांना पिंजर्‍यात कैद केले. आता ही माणसं स्मशान सुद्धा ताब्यात घेऊन तिथेही अतिक्रमण करणार की काय अशी भिती भुतांना वाटत होती आणि त्यांच्यातील एक बाळ-भूत प्रचंड घाबरलेलं दिसत होतं.

फ्रान्समधील “आयर्नमॅन” हा किताब मिळवणारे डॉ. रवींद्र सिंगल

आयर्नमॅन ट्रायथलॉंन डॉ. रवींद्र सिंगल

आयर्न मॅन ट्रायथलॉंन ही WTC म्हणजेच वर्ल्ड ट्रायथलॉंन कॉर्पोरेशन यांनी आयोजित केलेली स्पर्धा असून यामधे ३.८६ कि.मि.(२.४ माईल्स) पोहणे, १८०.२५ कि.मि. (११२ माईल्स) सायकलिंग आणि ४२.२० कि.मि.(२६.२२ माईल्स) धावणे. जगभरात ही स्पर्धा एकदिवसीय खेळ स्पर्धा म्हणून अतिशय कठीण मानली जाते. बहुतांशी आयर्न मॅन स्पर्धेचा कालावधी हा १७ तासांचा मानला जातो आणि वेळेत पूर्ण करणे, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य मानले जाते.

कुर्बानी केरळसाठी…..

कुर्बानी केरळसाठी

पुण्यातील काही तरुणांनी खर्‍या अर्थाने ईद वेगळ्या पद्धतीने साजरी केली आहे. आमच्यात कितीही मतभेद असले तरी आपत्कालात आम्ही जात धर्म भेद विसरुन सहकार्य करतो. ही भारतीयत्वाची भावना या मुस्लिम तरुणांनी उजागर केली आहे. या वेळी बकरीची कुर्बानी न देता केरळच्या पूरग्रस्तांना मदतरुपी कुर्बानी देण्यात यावी असे आवाहन या तरुण मंडळींनी केले. या कल्पनेचा शिल्पकार आहे पैगंबर शेख.

सलाम – जवानांच्या मदतकार्याला…

kerala flood

केरळ राज्यात आलेल्या पुराने हाहाकार उडवून दिल्यावर सगळे राजकारणी हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून असताना भारतीय सेना आपल्या कर्तव्यात बिझी आहे. भारतीय सेना मग ती थल सेना असो वायु सेना वा नौदल ह्यांच्या सोबत एन.डी.आर.एफ. तटरक्षक दल आणि इतर संस्था आपआपल्या परीने एक मिशन राबवत आहेत. लक्ष्य एकच प्रत्येक भारतीयाची जीवावर उदार होऊन रक्षण करण. त्याला संकटातून सोडवून सुरक्षित स्थळी नेणं.

आठवणीतला श्रावण

shravan

पूर्वी शाळा, म्हणजे आंतरराष्ट्रीय होण्या पूर्वी अर्ध्या दिवसाची असायची (ग्रामीण भागात अजूनही राहते) त्यामुळॆ मला श्रावण सोमवारचे विशेष आकर्षण असायचे. नागपंचमी, मंगळागौर, राखीपौर्णिमा, गोपाळकाला व शेवटी पोळा असे एक एक सण म्हणजे आनंदाची मेजवानी. नागपंचमीला आम्ही नागाचे वारूळ शोधून त्याची पूजा करयचो अर्थात खाली वारुळाची.

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।