डिएसके, तुमचं चुकलंच…
आर्किटेक्चर कॉलेजमध्ये असताना, २००४ मध्ये, मी पुण्यात ट्रेनिंगला होतो. डेक्कन जिमखान्याच्या बाजुला आमचं ऑफीस होतं, आणि तिथेच मी पहील्यांदा डिएसके नाव ऐकलं, ‘घराला घरपण देणारी माणसं’ ही टॅगलाईन आणि एक सुंदर असं ब्रोशर पहील्यांदा पाहीलं आणि मी भारावुन गेलो.