सुवर्ण संचय योजना
भारत देशात सोने ही एक प्रतिष्ठेची बाब आहे. कोणतेही मंगल कार्य सोन्याशिवाय अपूर्ण मानले जाते. सोने खरेदी करणे म्हणजे उत्तम गुंतवणूक हे समीकरण आजही सर्वसामान्य भारतीय माणसाच्या मनात पक्के आहे. अजूनही ग्रामीण भागात शेतमालाचे पैसे आल्यावर सोन्यातच गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जाते. किंवा घरात मुलीचा जन्म झाल्यास सर्वसाधारण भारतीय माणूस तिच्या लहानपणापासूनच थोडे थोडे सोने खरेदी करायला सुरवात करतो.