ब्रिटिश संसदेला पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पावले उचलायला लावणारी ‘ग्रेटा थनबर्ग’
ग्रेटा थनबर्ग या युवतीने काही दिवसांपूर्वी थेट ब्रिटिश संसदेत सरकारची या मुद्यावरून चांगली खरडपट्टी काढली. ब्रिटन पर्यावरण रक्षणासाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याची प्रखर टीका ग्रेटाने पुराव्यानिशी केली. वसुंधरा परिषदेला दिलेली वचनेही ब्रिटनने मोडली असल्याचा दावा ग्रेटाने यावेळी केला.