१०३ व्या वर्षी धावण्याच्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या मन कौर कोण आहेत?

मन कौर

मन कौर’ ह्या एका भारतीय धावपटूनेही आपल्या जिद्दीने वयाला लाजवलेलं आहे. १४ मुलांची पणजी, ९ मुलांची आजी, ३ मुलांची आई असणाऱ्या ‘मन कौर’ ह्यांनी वयाच्या १०३ व्या वर्षी ‘वर्ल्ड मास्टर’ स्पर्धेत, स्पेन इथे सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. आजवर ३० पेक्षा जास्त सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या मन कौर ह्यांनी आपल्या कर्तृत्वाने सर्वांपुढेच एक आदर्श ठेवला आहे.

प्रयत्न थांबवू नका! हे सांगणारी होंडा मोटर्सची कहाणी

होंडा

Honda Motor Pvt. Ltd. Company चे संस्थापक सोइचीरो (Soichiro) होंडा यांचा जन्म जपानमध्ये १९०६ ला झाला. सोइचीरो यांचे वडील लोहारकीचं काम करायचे आणि त्याबरोबर त्यांचं सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. छोटा सोइचीरो वडिलांना सायकल रिपेअरिंगच्या कामात मदत करायचा.

अपंगत्वावर मात करून जगाच्या पटलावर आपलं नाव उमटवणारी दिक्षा दिंडे

दिक्षा दिंडे

व्यवसायाने काळी रिक्षा चालवणारे वडील आणि शिवणकाम करणारी आई अशी अगदी बेताची परिस्थिती असताना पण तिच्या आई- वडिलांनी सगळ्या समाजाकडून येणारे टक्के टोमणे आणि सहानभुतीच्या नजरांना झेलत दिक्षाला तिच्या पायावर उभं करण्यासाठी तिची साथ देण्याचा पण केला.

पोटचं मूल नसल्याचं दुःख दूर करून झाडांचीच आई झालेली सालूमरडा थिमाक्का

सालूमरडा थिमाक्का

आई बनण्याचा क्षण आपण अनुभवू शकत नाही हे शल्य कुठेतरी त्यांना आत्महत्येचा विचार करायला प्रवृत्त करत होतं. पण थिमाक्का च्या जोडीदाराने त्यांना आजूबाजूच्या निसर्गाची आई बनण्याचा सल्ला दिला. मग सुरु झाला एक असा प्रवास ज्याने सालूमरडा थिमाक्काचं आयुष्य तर पूर्ण बदललंच पण त्यासोबत निसर्गाला जोपासण्याची एक चळवळ सुरु झाली.

अशिक्षित असून जगाच्या पटलावर आपलं नाव उमटवणाऱ्या, राहीबाई पोपरे!!

राहीबाई सोमा पोपेरे

राहीबाईंच्या कामाची नोंद दस्तुरखुद्द भारत सरकार ते बी.बी.सी. ह्या सर्वांनी घेतली आहे. बी.बी.सी. ने २०१८ सालातल्या जगातल्या सगळ्यात प्रभावशाली पहिल्या १०० महिलांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. तसेच भारत सरकारने २०१९ चा नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

आयसिस च्या अत्याचारातून स्वतःची सुटका करून अन्यायाला वाचा फोडणारी नादिया मुराद

नादिया मुराद

आपल्या स्वप्नात स्वच्छंद जगणाऱ्या अल्लड मुलीच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं आहे ह्याची कल्पना न नादिया ला होती न तिच्या कुटुंबियांना! गेल्या २०-२५ वर्षात इराकच्या राजकारणात सद्दाम हुसेनचा झालेला शह, त्यातून झालेला इसीस (ISIS) चा उदय हे सगळचं कुठेतरी अस्वस्थ करणारं. सद्दामच्या पडावानंतर अमेरिकेने इराकच्या राजकीय स्थितीला वाऱ्यावर सोडून काढलेला पाय हा इसीसच्या कडवट मुस्लीम धोरणांना बळ देणारा होता.

या लेखात वाचा स्टीव्ह जॉब्ज ला जगावेगळं बनवणाऱ्या सात सवयी! (प्रेरणादायी कहाणी)

स्टीव्ह जॉब्ज

स्टीव्हला एका जोडप्याने दत्तक घेतलं, स्टीव्हच्या वयाच्या सातव्या वर्षी गल्लीतल्या मुलीने त्याला चिडवले की तो दत्तक आहे, स्टीव्हने त्याच्या आईवडीलांना अर्थ विचारला. तेव्हा स्टीव्हच्या आईवडीलांनी त्याला खरे खरे सांगितले आणि म्हणाले. “तु साधारण मुलगा नाहीस, तु खुप ‘स्पेशल मुलगा’ आहेस, तुझे आयुष्य ‘असाधारण’ असणार आहे.”

शहीद मेजर शशिधरन नायर यांची ‘एक छोटीसी लव्ह स्टोरी’

शहीद मेजर शशिधरन नायर

२००७ साली मेजर शशिधरन नायर ह्यांची ओळख त्यांच्या एका मित्राने तृप्तीशी करून दिली. बघताक्षणीच तृप्ती आणि शशिधरन नायर एकमेकांच्या प्रेमात पडले. तृप्तीने कॉम्प्यूटर एप्लिकेशन मधून आपलं मास्टर पूर्ण केलं होतं. ‘लव्ह एट फर्स्ट साईट’ अशा वेगळ्या प्रेमकथेत दोघांनाही कळून चुकलं की ‘अपनी जोडी तो उसने बनाई है।’

अत्याचार झालेल्या स्त्रियांना जीवनदान देणारे ‘डॉक्टर डेनिस मुकवेगे’…

डेनिस मुकवेगे

जगाच्या इतिहासात सगळ्यात जास्त नरसंहार झालेल्या युद्धात ‘काँगो’ युद्धाचा समावेश होतो. जवळपास ५.४ मिलियन लोकांचा ह्यात जीव गेला आहे. ह्याला ‘आफ्रिकेचं वर्ल्ड वॉर’ असंही म्हंटलं जातं. ह्या युद्धात स्त्रीचा युद्धाचं शस्त्र म्हणून उपयोग केला गेला.

आयसिसच्या बंदिवासात राहिलेल्या नादिया मुराद ची कहाणी

नादिया मुराद

नादिया मुराद हे नाव सामान्य लोकांना माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही! आपल्या आयुष्यातले आदर्श हे सिनेमा आणि राजकारणापलीकडे जात नाहीत म्हणून ही नावं आपल्या ध्यानीमनी ही नसतात. स्त्री मुक्ती चळवळ, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री समानता ह्याची आवई उठवून त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेकांना पण हे नावं माहित नसेल.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।