या ६ गोष्टी लक्षात ठेवा आणि कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयरोगांना दूर ठेवा

शरीरामधलं हाय कोलेस्ट्रॉल हे एक काळजीचं कारण ठरतं.

हे हाय कोलेस्ट्रॉल कित्येक आजारांना निमंत्रणही देतं.

अगदी काही साध्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही हे कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये ठेवू शकता.

अनेकदा असं पहायला मिळतं की लोक कोलेस्टेरॉलचा संबंध चरबीशी जोडतात.

ही गोष्ट अतिशय चुकीची आहे.

लक्षात घ्या चरबी ही शरीरासाठी वाईट नाही, कारण शरीराला अन्नातून थोड्या चरबीची ही गरज असते.

शरीरातील पेशींच्या पडद्याच्या निर्मितीमध्ये, प्रत्येक पेशीचा महत्त्वाचा बाह्य भाग आणि मज्जातंतूंच्या सभोवतालच्या आवरणांमध्येसुद्धा चरबी महत्त्वाची भूमिका बजावते.

तुम्ही फक्त योग्य आहार निवडा आणि काळजीपूर्वक व्यायाम करा, मग काळजीचं कारण उरणार नाही.

शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणे ही मात्र काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.

हृदयरोग आणि स्ट्रोक या दोन्हींसाठी कोलेस्टेरॉल धोकादायक घटक आहे.

कोलेस्टेरॉलकडे दुर्लक्ष करणं म्हणजे या आजारांना थेट आमंत्रण देण्यासारखं आहे, जे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं.

चला तर मग आज आम्ही तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे सोपे उपाय या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत.

1) प्राण्यांच्या चरबीचं सेवन कमी करा

जर तुम्ही नॉन व्हेजीटेरीयन असाल तर लक्षात ठेवा जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचं सेवन केल्यामुळं तुमच्या रक्तातील LDL कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.

रक्तातील LDL कोलेस्टेरॉलची पातळी वाढली की, हृदयविकाराचा धोका वाढतो.

मांस, फॅटयुक्त दुग्धजन्य पदार्थ, अंडी, नारळ आणि पाम तेल यांसारख्या पदार्थांमध्ये चरबी मोठ्या प्रमाणात असते.

चिकन, दूध, चीज, मलई, आंबट मलई, कॉटेज चीज आणि बटर यांसारख्या फुल फॅट डेअरी उत्पादनांमध्ये सॅच्युरेटेड फॅट तसंच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते.

2) फायबरचं सेवन करा

फायबरचं सेवन शरीरासाठी नेहमीच चांगलं असतं.

विरघळणारं जे फायबर असतं ते तुमच्या रक्तप्रवाहातलं कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करू शकतं.

याशिवाय, तंतुमय पदार्थ तुमचे LDL कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतात.

शरीराला फायबर मिळण्यासाठी फ्लॅक्ससीड, इसबगोल, सातू, वाळलेल्या सोयाबीनच्या शेंगा, फळं आणि धान्याचं सेवन करा.

3) ताजा भाजीपाला वापरा.

स्वच्छ आणि ताजा भाजीपाला यांचा आहारात नियमित समावेश करा.

ज्या व्यक्ती मांसाहार करतात त्यांनी आहारातील मांस, मासे, अंडी, यांचा वापर कमी करून बीन्स, मसूर, टोफू किंवा क्विनोआ सारख्या मुबलक प्रथिनं असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

एका अहवालानुसार, ‘कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या शाकाहारी खाद्यपदार्थांमुळं एलडीएल, ट्रायग्लिसराइड्स आणि रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी होतो.’

यासाठी आहारात भरपूर फळं आणि ताज्या भाज्या, तसंच अखंड धान्य यांचा समावेश करा.

4. कार्बोहाइड्रेटचा आहारात फार वापर करू नका.

एका संशोधनात असं सिद्धं झालं आहे की कमी कार्ब खाल्ल्याने वजन कमी व्हायला आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांचा धोका कमी व्हायला मदत होते.

ओटचे जाडं भरडे पीठ, सोयाबीन मसूर आणि ताजी फळं यांसारखे उच्च फायबर कार्बोहायड्रेट निवडा जे तुम्हाला नक्कीच ऊर्जा देतील आणि पोट भरल्याचा अनुभव येईल.

आहारात आवर्जून अशा भाज्यांचा समावेश करा ज्यात कॅलरी कमी आणि फायबरचं प्रमाण जास्त असेल.

5) अतिरिक्त वजन कमी करून आरोग्य सुधारा.

जर तुमचे वजन जास्त असेल आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर शरीरातील एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल.

आहारातील स्टार्चयुक्त पदार्थांऐवजी प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.

फळांचा ज्यूस पिण्याऐवजी ताजी फळं खा. आणि महत्त्वाचं म्हणजे भूक लागल्यावरच जेवा.

6. व्यायाम करा

आरोग्यासाठी व्यायाम हा प्रत्येक व्यक्तीने केलाच पाहिजे.

हाय कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर आवर्जून व्यायाम करायला हवाच.

तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी 90 मिनिटे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम करा.

यासाठी कोणताही एक खेळ तुम्ही निवडू शकता, किंवा तुम्ही सायकल चालवू शकता.

एकदा तुम्हाला व्यायामाची सवय झाली की हळूहळू व्यायामाची तीव्रता वाढवा. आणि नियमित व्यायामाने कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवा.

आहार, व्यायाम यांचा तज्ञांकडून सल्ला घेऊन प्रयत्नात सातत्य ठेवलतं तर तुम्ही कोलेस्टेरॉलवर सहज नियंत्रण ठेऊ शकता.

जाणून घ्या हृदयातील ब्लॉकेजची लक्षणे, कारणे, घरगुती उपाय आणि पथ्ये

हृदयरोग टाळण्यासाठी झोपेचं वेळापत्रक कसं असावं?

हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यावी…

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।