कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना, एखाद्या पदवीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी एक महत्त्वाचा टप्पा पार करावा लागतो तो म्हणजे बुद्धीमत्ता चाचणी.
बुद्धीला चालना देणारे, विचार करायला लावणारे प्रश्न या चाचणीत असतात.
फार वेळ न दवडता समर्पक उत्तर देणं अपेक्षित असतं. असाच उमेदवार परीक्षेत यशस्वी होतो.
हे प्रश्न वाचताना किरकोळ आणि मजेशीर वाटले तरी त्यामागे अर्थ दडलेला असतो. उमेदवार त्या पदवीसाठी पात्र आहे का, कामासाठी योग्य आहे का याची पारख अशा प्रश्नातून होते.
या लेखात आपण असे तीन प्रश्न पाहणार आहोत ज्याने बुद्धिमत्तेची चाचणी घेता येईल.
कॉग्निटीव्ह रिफ्लेक्शन टेस्ट ही जगातली सर्वात कमी पण खूप विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांची चाचणी आहे.
यामधे केवळ तीनच प्रश्न आहेत. ही प्रश्नावली प्रिन्सटन येथे २००५ मधे मानसतज्ज्ञ शेन फ्रेड्रिक यांनी तयार केली.
या चाचणीचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वग्रह लांब ठेवून तुम्ही कसा विचार करता, वैयक्तिक दृष्टिकोन न बाळगता तर्कसंगत विचार करून पुरेशा वेळेत तुम्ही काम करु शकता का अशा गोष्टी नेमकेपणाने पारखल्या जातात.
मानसशास्त्राच्या भाषेत किरकोळ गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची तुमची क्षमता किती आहे, एखाद्या गोष्टीचा तुम्ही पूर्वग्रह ठेवून विचार करता की तर्कसंगत विचार करता हे ओळखता येते.
ही चाचणी देत असताना उमेदवाराने पुरेसा वेळ घेऊन तर्कसंगत विचार करून योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करावा.
ज्या उमेदवाराची तिन्ही उत्तरं बरोबर असतील तो यशस्वी होणारच पण जो कमीत कमी वेळात उत्तर देईल त्याची बुद्धीमत्ता कुशाग्र असणार यात शंका नाही.
२००३ च्या अभ्यासात असं दिसून आलं की जगातील केवळ १७% लोक या चाचणीत यशस्वी होऊ शकले. जगातील नामांकित विद्यापीठातील विद्यार्थीही यात मागे पडले.
या चाचणीतले तिन्ही प्रश्न पहिल्यांदा वाचल्यावर खूप साधे सोपे वाटतात. वास्तविक ते खूप विचार करायला लावणारे असतात. तर मग बघुया ते कोणते प्रश्न आहेत…
प्रश्न १: एक बॅट आणि बॉल यांची एकूण किंमत 1.10 डॉलर इतकी आहे. बॅट ची किंमत ही बॉल पेक्षा एक डॉलर ने जास्त आहे. तर बॉलची किंमत किती असणार?
प्रश्न २: पाच कागद बनवण्यासाठी पाच मशीन घेऊन पाच मिनिटे वेळ लागत असेल तर शंभर मशीन घेऊन शंभर कागद बनवण्यासाठी किती वेळ लागेल?
प्रश्न ३: एका तळ्यात जलपर्णी वाढत असताना ती आदल्या दिवसापेक्षा दुसरे दिवशी दुप्पट होते. संपूर्ण तळे व्यापायला ४८ दिवस लागले असतील तर निम्मे तळे व्यापायला किती दिवस लागतील?
उत्तरे वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आणि तुमचा स्कोअर काय ते कमेंट्स मध्ये लिहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
80%
Hi
Hi
Ohh
1. ball price .10
2. 5 minutes
3.47day