सध्या एक व्हायरल मेसेज सर्व सोशल मीडियावर पसरवला जातो आहे,
ज्यात असा दावा केला गेलेला आहे कि, WHO ने आपली चूक मान्य करत, यु टर्न घेऊन म्हंटल आहे की, कोरोना व्हायरस हा सिझनल व्हायरस असून, वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी खोकल्यासारखाच तो असल्याने त्यापासून घाबरण्याचे काहीही कारण नाही.
एवढेच नाही तर कोरोना बाधित रुग्णाला आयसोलेशन मध्ये राहण्याची तसेच लोकांनी सोशल डिस्टनसिंग पाळण्याची किंवा मास्क घलण्याचीही काही एक गरज नाही.
शिवाय या व्हायरल मेसेजला, पुढे फॉरवर्ड करण्याचे सुद्धा अपील केले गेलेले आहे.
केंद्र सरकारची एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो च्या ‘फॅक्ट चेक विंग’ ने या व्हायरल दाव्याची पडताळणी करून खुलासा केला आहे की, हा दावा खोटा आहे.
म्हणजेच WHO ने अशा प्रकारे कोरोना व्हयरस हा सामान्य सिझनल व्हायरस असल्याने त्याला न घाबरण्याचे, सोशल डिस्टनसिंग न पाळण्याचे असे कुठलेही संकेत दिलेले नाहीत.
.@WHO द्वारा कथित रूप से #कोरोना के सीजनल वायरस होने का दावा किया जा रहा है जिसमें शारीरिक दूरी और आइसोलेशन की जरूरत नहीं है#PIBFactCheck:यह दावा #फर्जी है।#COVID19 एक संक्रामक रोग है व इसमे #कोविड अनुकूल व्यवहार अपनाना आवश्यक है।
▶️मास्क पहनें
▶️हाथ धोएं
▶️शारीरिक दूरी बनाएं pic.twitter.com/7BQANS6uy3— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 2, 2021
म्हणून हात धुणे, मास्क घालणे, सोशल डिस्टनसिंग पाळणे या सर्व गोष्टी तंतोतंत पाळल्या तरच आपण या संकटापासून स्वतःची मुक्तता करू शकतो.
आणि म्हणून असे भ्रामक मेसेजेस फॉरवर्ड करण्याआधी त्याची खात्री करून घ्या.
अशीच एखाद्या व्हायरल झालेल्या मेसेज बद्दल काही शंका असल्यास ती तुम्ही आम्हाला फेसबुक पेजच्या inbox मध्ये किंवा 8308247480 या व्हाट्स ऍप नंबरवर विचारू शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.