जेव्हापासून १८ ते ४४ वर्षासाठीच्या लोकांना लशींसाठी रजिस्ट्रेशन खुले झाले तेव्हापासून सगळेच एकमेकांना विचारत आहेत कि, तुम्हाला स्लॉट मिळाला का? आणि याच उत्तर हे शक्यतो सर्वांचं नाही असंच येतंय….
लस घेऊन आपला जीव वाचवावा… म्हणून मेहनत तर केलीच पाहिजे… या विचाराने तासंतास बरेच लोक अपॉइंटमेंट शेड्युल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत… पण खुले असलेले सर्व स्लॉट्स हे Fully Booked असेच दिसत आहेत.
मग हे नक्की बुक करतंय तरी कोण?
आणि याचं उत्तर मिळतं आहे ते ट्विटर वर….
काही टेक्नो सॅव्ही लोक विशिष्ठ प्रकारे कोवीन ऍप वर लस घेण्यासाठी स्लॉट बुक करत आहे.
जसे ४५ वर्षाच्या वरचे लोक थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात तसे १८ ते ४४ च्या वयोगटातले लोक घेऊ शकत नाहीत. या वयोगटाला कोवीनऍप वर किंवा आरोग्यसेतू ऍपवर रजिस्टर करून ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करायची आहे.
पण रजिस्ट्रेशन करून अपॉइंटमेंट बुक करायला स्लॉट मात्र उपलब्ध होत नाहीत.
याचं सध्या निदर्शनास आलेलं कारण काय?
कोवीन ऍपच्या सिस्टीममध्ये येऊन काही माहिती घेता यावी म्हणून सरकारने या ऍपचे API म्हणजे application Programming Interface हे सार्वजनिक केलेले आहे. आणि हि बाब सामान्य सुद्धा आहे.
API सार्वजनिक करण्याचा अर्थ असा होतो कि, या सिस्टीममध्ये जाऊन काही माहिती घेतली जाऊ शकते.
आता अशा कुठल्याही गोष्टीचा फायदा हा त्या त्या क्षेत्रातले बुद्धिमान लोक घेतात…
If you are 18+ and live in Bangalore, the only way to get vaccine appointments is to use python scripts that ping CoWin’s public API and setup notification alerts via Telegram, Twitter or SMS.
Yes, the vaccination drive is now officially a hackathon.
— Praveen Gopal Krishnan (@peegeekay) May 3, 2021
अशाच काही स्क्रिप्ट्स किंवा ऍप्सचा वापर करून काही लोक जवळच्या सेण्टरवर लस केव्हा उपलब्ध आहे याचा अलर्ट मिळवत आहेत..
ट्विटर खंगाळले तर हे बँगलोरमधून मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे लक्षात येते. तांत्रिक क्षेत्रात हुशार असलेले लोक, कोविनवर API द्वारे बॅकडोअरने एंट्री घेऊन उपलब्ध स्लॉट लगेच बुक करून घेतात आणि सामान्य माणूस याला ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ समजून तासंतास प्रयत्न करत राहतो.
अशाच प्रकारे IRCTC च्या वेबसाईटचा API वापरून सर्वात आधी तिकीट बुक करून विकण्याचे काम, तत्काळ रेल्वे तिकीट बुक करणारे एजंट करायचे… अशा दलालांना पोलिसांनी काही ठिकाणी अटक सुद्धा केलेली होती.
आता असे होत असताना सामान्य माणसाला वेळेवर लस कशी मिळेल?
खरंतर सरकारने लवकरच यामध्ये काही बदल करून स्लॉट उपलब्ध असल्याची माहिती, लोकांना SMS ने पाठवून सिस्टीम फुलप्रूफ करण्याची सोय केली पाहिजे.
बरं सरकारकडून ते होईल तेव्हा होईल, पण सध्या तुम्ही काय करू शकता ते आता लक्षपूर्वक वाचा…
PayTM वर vaccine Finder द्वारे जवळच्या केंद्रावर स्लॉट केव्हा उपलब्ध होऊ शकेल याची माहिती तुम्ही घेऊ शकता. तसेच ‘वॅक्सीनेट मी’ द्वारे इ-मेल किंवा व्हाट्स ऍप वर उपलब्ध स्लॉट चे अपडेट तुम्ही घेऊ शकता. हि माहिती आपल्या मित्र परिवाराला (शेअर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या पर्यायातून) शेअर करा. म्हणजे लवकरात लवकर लस घेण्याची सर्वांची इच्छा पूर्ण होऊ शकेल…
कारण सध्याच्या काळात, शेअरिंग इज केअरिंग…
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.