नैराश्य (Dipression) ही जरी एक जीवशास्त्रीय समस्या असली तरी ती रोजच्या जीवनातील तणावांमुळे उदभवते.. जेव्हा माणसाला आयुष्यातली प्रत्येक गोष्ट नकारात्मक भासू लागते आणि हि स्तिथी जेव्हा कळस गाठते तेव्हा माणूस नैराश्याचा शिकार होऊ लागतो.
हा नैराश्याचा विकार जर दीर्घकाळासाठी आपल्या जीवनात राहिला तर ही समस्या जीवघेणी ठरू शकते. चिंता आणि तणावांमुळे एड्रीनलीन (adrenaline) आणि कार्टिसोल (cortisol) या हार्मोन्स चा बॅलन्स बिघडतो.
या मानसिक आजाराचे रूपांतर पुढे शारीरिक आजारात होऊ शकते. नैराश्याने अति प्रमाणात ग्रासले गेलेले लोक पुढे जाऊन आत्महत्येचे चुकीचे पाऊल उचलण्याचीही शक्यता असते. आजकाल प्रत्येकाच्या जीवनात समस्या आहेत. आणि त्याचमुळे प्रत्येक पाचपैकी एक व्यक्ती ही नैराश्यग्रस्त असल्याचा अंदाज आहे.
आज आपण नैराश्याची कारणे, लक्षणे आणि नैराश्य टाळण्याचे उपाय याबद्दल बोलू :
नकारात्मक विचार येत जाणे हे नैराश्याचे प्रार्थमिक कारण असतेच पण नैराश्याचे परिस्थितीजन्य कारण खालील प्रमाणे आहेत..
- अचानक नोकरी किंवा रोजगार गमावणे किंवा व्यवसायात मोठे नुकसान होणे.
- मोठे आर्थिक नुकसान होणे.
- फसवणूक होणे.
- जवळच्या व्यक्तीचा अचानक दुरावा सहन न होणे.
- कामाचा अति दबाव असणे.
नैराश्य आलेल्या माणसामध्ये खालील लक्षणे दिसू लागतात :
- एकटेपणा वाटणे
- झोप कमी येणे
- कमी किंवा अधिक प्रमाणात खाणे
- स्वतःचे निर्णय घेऊ न शकणे
- कामात मन न लागणे
- क्रोध अधिक येणे
- थकवा जाणवणे
- मरणाचे विचार येणे
- एकांतात रडू येणे
- स्वतःला असहाय समजणे
- स्वतःशीच बडबड करणे
- अचानक भावनिक होणे
- भीती वाटणे
- नेहमी दुःखी राहणे
- नकारात्मक विचार मनात येणे
उपाय :
नैराश्यग्रस्त माणसाला असं वाटू लागतं कि आयुष्यात आता काहीही बदलणार नाहीये. आणि तो हार माणून निराश होतो. तेव्हा त्या व्यक्तीतील नकारात्मक विचार कमी करणे हा नैराश्य घालवण्याचा मुख्य उपचार ठरतो. आणि त्यासाठी त्या व्यक्तीच्या परिवारातील किंवा जवळच्या माणसांनी नैराश्याचे मूळ कारण समजून घेऊन उपचार केले तर हे अधिक सुसह्य होऊ शकते.
- स्वतःला व्यस्त ठेवणे
- प्राणायाम
- आंनदि राहण्याचा प्रयत्न करणे
- कामात बदल करणे
- चांगले संगीत ऐकणे
- आवडीच्या कामात मन रमवणे
- हसत राहणे
- ताज्या हवेत फिरणे
नैराश्याची लक्षणं दिसू लागली तर या पाच अन्नपदार्थांचे सेवन वाढवावे..
- रताळी – Vitamin B6.
- पालक – सेरोटोनिन ची मात्रा वाढवते
- काजू – सेरोटोनिन ची मात्रा वाढवते
- बेरी
- ऍव्होकॅडो
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
अतिशय चांगल्या पद्धतीने लेख लिहिला आहे…
Highly informative. Thanks a lot for sharing. Very nicely written write up! Keep it up!!
Highly informative. Thanks a lot for sharing. Very nice write up! Keep it up!!