‘मुघल-ए-आझम’ चित्रपटाची निर्मीती सुरु होती, तेव्हाची गोष्ट आहे, निर्माता-दिग्दर्शक के. आसिफ यांनी संगीतकार नौशाद यांना विचारलं, “चित्रपटात तानसेन गातोय असं दाखवायचं आहे, तर त्या तोडीचा कोण गायक आहे?” नौशाद यांनी उत्तर दिलं, “तानसेनला न्याय देऊ शकेल असे एकच गायक भारतात आहेत, ते म्हणजे उस्ताद बडे अलीं खान!” पण ते क्लासीकल सिंगर आहेत, ते चित्रपटासाठी गात नाहीत, तो काळ साठच्या दशकातला होता, शास्त्रीय संगीतातल्या वर्तुळातल्या लोकांनी चित्रपटासाठी गाणं त्या काळात हलक्या दर्जाचं मानलं जायचं, पण के. आसिफ यांनी निश्चय केला. नौशादला घेऊन ते उस्ताद बडे अलीं खान यांच्याकडे गेले आणि चित्रपटातले तानसेनचे गाणे तुम्ही गावे अशी गळ घातली, अपेक्षेप्रमाणे खानसाहेबांनी नकार दिला, के असिफ यांच्यावर मात्र कसलाच परीणाम झाला नाही.
तास – दोन तास ते तिघे तसेच बसुन होते.
जितक्यांदा नकार दिला तितक्या वेळी ते एकच वाक्य उच्चारायचे. “ खांसाब, गाना तो आपही गावोगे”….
कोंडी फुटत नव्हती, खांसाहेबाचा संयम संपत आला होता.
“ये आदमी पागल है क्या? त्यांनी के आसिफ समोरच नौशाद यांना प्रश्न केला. थांब, ह्याची जिरवतोच.
त्या काळात एका गाण्यासाठी लता मंगेशकर, मोहम्मद रफी इत्यादी मान्यवर गायक तीनशे ते चारशे रुपये मानधन घ्यायचे. खांसाहेबानी एका गाण्याचे मानधन पंचवीस हजार रुपये मागीतले. पंचवीस हजारात तेव्हा अख्खा चित्रपट तयार व्हायचा. त्यांना ह्या सरफिर्या निर्मात्याला पळवुन लावयचे होते, पण के आसिफ ने त्यांनाच धक्का दिला आणि ५०% रक्कम एडवांस देऊन चित्रपटात गाण्यासाठी भाग पाडले. त्यांनी गायलेली ‘प्रेम जोगन बन के’ आणि ‘शुभ दिन आयो’ ही शास्त्रीय रागदारीवर आधारीत गाणी श्रवणीय आहेत.
निर्मात्याने इतके पैसे का दिले? तो खरचं वेडा, सनकी होता का?
के. आसिफ ला परफेक्ट पेक्षा कमी असलेले काहीही नको होते. एकदा दिलीपकुमारचा ‘क्लोज अप एंगल’ चा शॉट होता, तेव्हा त्यांच्या पायात महागडे नक्षीदार कलाकुसरीचे जोडे असावेत असा हुकुम त्याने सोडला, धावपळ सुरु झाली.
बाकीचे लोक त्याला समजाऊ लागले, चित्रीकरणाला उशीर होतोय, शॉर्टमध्ये पाय दिसतच नाहीत तेव्हा असा विचित्र हट्ट कशाला? के. आसिफने दिलेले उत्तर “जेव्हा माझा नायक राजपुत्राला शोभेल असे महागडे जोडे घालेल, तेव्हाच त्याच्या चेहर्यावर राजपुत्राच्या श्रीमंतीचे भाव दिसतील.”
त्याला एक्स्लंट पेक्षा कमी काही चालणारच नव्हते. सव्वीस वर्षांच्या करीअर मध्ये त्याने फक्त तीनच चित्रपट केले. त्यापैकी अठरा वर्ष त्याच्या डोक्यात एकच कल्पना घोळत होती, १९४४ मध्येच त्याने मुघल-ए-आझम बनवायला घेतला पण शुटींग सुरु करायच्या आधीच १९४६ मध्ये नायक चंद्रमोहन यांचं निधन झालं. के. आसिफ ने हार मानली नाही.
त्याने काही वर्ष संधीची वाट बघीतली, १९५१ मध्ये पुन्हा नवी टीम घेऊन पिक्चर सुरु केला. कित्येक अडचणी आल्या, प्रत्येकावर तो मार्ग काढत राहीला. पृथ्वीराज कपुर यांना अकबराच्या रोल साठी तयार केलं, त्यांच्याच ओळखीवर शापुरजी पालनजी कडुन आर्थिक सहाय्य घेतलं, ‘मुगल-ए-आजम’ पुर्ण करायला त्याला तब्बल बारा वर्ष लागली. आयुष्यातली बारा वर्ष, एक तप, एखाद्या स्वप्नासाठी स्वतःला झोकुन दिलं, तर परफेक्शन येणार नाही, असे कसे होईल?
‘प्यार किया तो डरना क्या’ ह्या ऐतिहासीक गाण्यासाठी ‘मोहन स्टुडिओ’ मध्ये दहा लाख रुपये खर्चुन लाहोरच्या शालीमार बागेमधल्या शीश महलची प्रतिकृती तयार केली. त्यासाठी त्याकाळी बेल्जीअमहुन काचा मागवण्यात आल्या. चित्रपटानेही इतिहास घडवला.
असचं एक उदाहरण एप्पलचं, स्टीव्ह जोब्ज आपल्या टेक्नीकल टिमवर सतत रागवत असायचा. मॅकिंटोश कॉम्प्युटर बनवताना, कॉम्पुटरच्या आतल्या भागात असणार्या, सर्किटची मांडणी थोडीशीही अस्ताव्यस्त त्याला चालायची नाही. ती नेटनेटकी, दिसायला सुरेख असावी, असा त्याचा आग्रह असायचा. त्याच्या असल्या वेडेपणाला कंटाळुन कित्येक हुशार हुशार माणसं त्याला सोडुन गेले.
एकदा त्याचा एक सहकारी त्याला विचारतो, “स्टीव्ह, हा कॉम्पूटर फक्त आपल्या सर्विस सेंटर मध्येच उघडला जाईल, ग्राहकाला कधीही माहीत होणार नाही की आतमधली डिझाईन किती सुंदर आहे तेव्हा असा वेडा हट्ट का?” ……“त्याला माहीत नाही होणार पण ते मला माहीत आहे, ज्यावेळी मी जगाला ओरडुन सांगेन, माझं प्रॉडक्ट जगातलं बेस्ट आहे, तेव्हा माझ्या आवाजात वजन असेल.” सगळे निरुत्तर झाले……. असा असतो उत्कृष्टतेचा ध्यास.
मरताना देखील स्टीव्ह जोब्ज डिझाईनबद्द्ल किती चोखंदळ होता, ह्याचं एक उदाहरण आहे. अखेरच्या दिवसात त्याचं ऑपरेशन होणार होतं, तेव्हा ऑक्सीजन देण्यासाठी डॉक्टरांनी त्याच्या चेहर्यावर मास्क लावलं, तेव्हा स्टीव्ह जॉब्जने ते काढुन टाकलं, कारण विचारल्यावर त्याने सांगीतलं, “मला हे भिकार डिझाईन आवडलेलं नाही, दुसरा मास्क आणा”, धावपळ करुन सात डिझाईनचे मास्क दाखवण्यात आले, आणि महत्प्रयासाने त्याने एक डिझाईन सिलेक्ट केला, आणि डॉक्टरांचा जीव भांड्यात पडला…….. कोमात जायची वेळ आली तरी तो चांगल्या डीझाईनसाठी अडुन बसला होता.
अशी वेडी माणसंच जगापेक्षा वेगळं काहीतरी काम करुन जगावर छाप सोडुन जातात.
चला, कुठल्यातरी ध्येयाच्या मागे आपणही पागल होऊन असं जगावेगळं उत्कृष्ट आयुष्य जगुया आणि आयुष्याचं सार्थक करुया!…
वाचण्यासारखे आणखी काही…..
लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मी!…
Low Cost Housing – बांधकामाची किंमत कमी कशी कराल?
आकर्षणाचा सिद्धांत
मनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खुप सुंदर लेख