ब्लॉक आणि बल्क डील म्हणजे काय आणि त्यात फरक काय?

मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी विक्रीच्या संदर्भात Block Deal आणि Bulk Deal हे शब्दप्रयोग नेहमी ऐकायला मिळतात. जरी हे शब्दप्रयोग मोठ्या व्यवहारासंदर्भात वापरले जात असले तरी ते पूर्णपणे भिन्न आहेत, म्हणजे काय ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. या दोन्ही प्रकारचे व्यवहार प्रामुख्याने प्रमोटर्स, खूप मोठी मालमत्ता असलेले गुंतवणूकदार, स्वदेशी आणि परदेशी वित्तसंस्था, म्यूचुयल फंड, पेन्शन फंड, विमा कंपन्या यांच्याकडून केले जातात. हे व्यवहार जाहीर केले जात असल्याने गुंतवणूकदारांना कोण आणि कशासाठी व्यवहार करीत आहेत या संबंधी अंदाज बांधता येतो. एखादी व्यक्ती किंवा संस्था यांचे कोणत्या कंपनीचे शेअर्स घेण्यात उत्सुक आहेत ते समजते. एखाद्या कंपनीच्या उलाढालीत होणारे बदल हे तांत्रिक विश्लेषणाचा (Technical Analyses) एक महत्वाचा भाग आहेत. त्यामूळे टेक्निकल एनालिस्ट त्यावर लक्ष ठेवून असतात.

ब्लॉक आणि बल्क डील यातील फरक:-

  • ब्लॉक डील : ब्लॉक डील हा एक असा व्यवहार आहे जो किमान ५ कोटी रुपयांचा असतो. असा सौदा २ व्यक्ती / संस्था यांच्यात एकमेकांच्या मान्यतेने होतो. यातील शेअर्सचा मान्य भाव हा या व्यवहाराच्या आधीच्या दिवसाच्या बंद भावापेक्षा १% कमी / अधिक असू शकतो. असे सौदे डिलिव्हरी बेसच केले जातात. हे व्यवहार पूर्ण करण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळी व्यवस्था केली असून सकाळी ०९:१५ ते ०९:५० या ३५ मिनिटांच्या काळात ते करावे लागतात. नेहमीच्या platform वर हे व्यवहार दिसत नाहीत. ते एक्सचेंजकडून ताबडतोब जाहीर केले जातात.
  • बल्क डील : भागभांडवलाच्या अर्धा टक्यांहून अधिक शेअर्सचे खरेदी / विक्री व्यवहार यांना बल्क डील असे म्हटले जाते. असे व्यवहार बाजाराच्या वेळेत एक अथवा अनेक व्यवहारामधून होत असल्याने तसेच ते त्या त्या वेळेच्या बाजारभावाच्या प्रमाणे होत असल्याने शेअरचे भाव कमी जास्त होण्यात मोठी भूमिका बजावू शकतात. यात डे ट्रेडिंगही करता येते. एका व्यक्तीकडून, एक वा अनेक व्यवहारातून एकाच कंपनीच्या शेअरमध्ये असे व्यवहार झाल्यास ब्रोकरला एक्सचेंजमध्ये कळवावे लागते. एक्सचेंजमधून बाजार नियामक सेबीला (Securities and exchange board of india) त्यांची माहिती दिली जाते. काही शंका आल्यास हे व्यवहार नियमांना धरून आहेत ना? याची तपासणी करून यातून काही अनुचित व्यवहार निदर्शनास आले तर असे व्यवहार करणाऱ्यांवर नियमांनुसार कारवाई केली जावून त्यांना पुढे कोणतेही व्यवहार करण्यासाठी अपात्र अथवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकतात त्याचप्रमाणे झालेले व्यवहार रद्द होवू शकतात.

मोठ्या रकमेचे व्यवहार एकंदरीत गुंतवणूक प्रमाण वाढल्याने कोणी टाळू शकत नाहीत. त्याचप्रमाणे त्यावर कोणतेही बंधनही आणू शकत नाही. अशा व्यवहारांमुळे घबराट होवून भाव खाली आल्यास छोट्या गुंतवणुकदारांचे नुकसान होवू शकते. मार्केटवरील लोकांचा विश्वास वाढावा आणि शेअरचे भाव त्याच्या मुल्याएवढे होण्यास मदत व्हावी, यासाठी अशी पद्धत स्वीकारण्यात आली आहे.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “ब्लॉक आणि बल्क डील म्हणजे काय आणि त्यात फरक काय?”

  1. शेअर बाजार,मँच्युअल फंड इ.गुंतवुणकी पासुन मराठी माणुस ‘अर्थनिरक्षरतेमुळे’ व इंग्रजी अज्ञानामुळे लांबच राहतो व पारंपारिक गुंतवुणक करतो अशा माझ्या सारखानां सहज,सोप्या भाषेत तुम्ही माहिती देत आहे, हे खुप चांगले आहे.

    Reply
  2. उदय सर नमस्कार आपले लेख मी वाचतोय आपल म्हणन अगदी बरोबर आहे मराठी माणूस आपल्या कष्टाची रक्कम शेअर मार्केट मध्ये फार कमी प्रमाणात गुंतवणूक करतोय कारण त्याला भीती असते मी घेतलेले शेअर्स पडणार तर नाही आपणास विनंती आहे की याबद्दल मला बेसीक माहिती दिली तर मी आपला आभारी राहील व कदाचित मी सुद्धा या व्यवसायात पाऊल टाकेल

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।