कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम यांसारखे मिनरल्स, व्हिटॅमिन ‘ए’, ‘डी’, ‘बी-१२’ अशा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेलं दूध आपल्या शरीराचे पोषण करून सुदृढ राखणारे एक पूर्णान्न आहे.
पण हल्ली दुधामध्ये होणाऱ्या भेसळीमुळे दुधाचे आरोग्यासाठी फायदे होण्याऐवजी दुष्परिणाम सुद्धा दिसून येत आहेत.
भेसळीचे प्रकार:
दुधात होणारी भेसळ हि दोन प्रकारची असते. जर त्यातून आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थ काढून घेऊन पाण्याची मिलावट केली गेली तर ते दूध सबस्टॅन्डर्ड असते.
या भेसळीमुळे आरोग्यावर दुष्परिणाम तर होत नाहीत पण दुधातली पोषक मूल्य मात्र कमी होतात.
दुसऱ्या प्रकारच्या भेसळीमध्ये युरिया, डिटर्जंट पावडर यासारख्या अखाद्य पदार्थांची मिलावट केली जाते. या भेसळीमुळे मात्र आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात.
आता सर्वात आधी दुधात भेसळ असू शकेल का, हे ओळखण्याच्या काही सोप्या म्हणजे निरीक्षणातून ओळखण्यासारख्या पद्धती बघू:
१) सिंथेटिक दूध ओळखण्यासाठी आधी त्याचा वास घेऊन बघा. जर त्यात काहीसा साबण किंवा डिटर्जंट सारखा वास आला तर त्यात भेसळ आहे हे ओळखावे. शुद्ध दुधाला अशा प्रकारचा वास न येता सुवास येतो.
२) शुद्ध दुधाची चव काहीशी मधुर असते, पण मिलावट असलेले दूध युरिया, डिटर्जंट किंवा स्टार्च सारखे पदार्थ वापरल्याने काहीसे कडवट असते.
३) शुद्ध दूध स्टोअर केले असता आपला रंग बदलत नाही. याउलट मिलावट असलेले दूध आधीपेक्षा पिवळट पडत जाते.
तसेच दुधात पाण्याची मिलावट आहे का हे ओळखण्यासाठी गडद रंगाच्या पृष्ठभागावर दुधाचा एक थेम्ब टाकून बघा. पाण्याची भेसळ असेल तर त्यातून पाणी वेगळे होऊ लागेल.
४) शुद्ध दूध उकळल्या नंतर त्याचा रंग बदलत नाही. तर भेसळ असलेले दूध उकळल्या नंतर त्याला हलकासा पिवळसर तांबूस रंग येऊ लागतो.
५) शुद्ध दूध तळहातावर घेऊन रगडले तर त्यात चिकटपणा जाणवत नाही. पण त्यात भेसळ असेल तर हाताला चिकटपणा जाणवतो.
अशा प्रकारच्या निरीक्षणात जर मिलावट असल्याचा संशय आला तर पुढे काही शास्त्रीय पद्धती सुद्धा आपण घरच्या घरी करून बघू शकतो.
१) युरिया असल्याची भेसळ कशी ओळखावी:
एका काचेच्या भांड्यात थोडे दूध घेऊन त्यात सोयाबीन पावडर टाकून चांगले एकजीव करा. जर यात लाल लिटमस पेपर बुडवल्यास तो निळा झाला तर या दुधात युरियाची आणि डिटर्जन्टची भेसळ आहे हे ओळखावे.
२) दुधात स्टार्चची मिलावट कशी ओळखावी:
स्टार्चची मिलावट ओळखण्यासाठी ५ मीली दुधात आयोडीन किंवा टिंक्चर आयोडीनचे चार पाच थेम्ब टाका. त्यानंतर जर लगेच दुधाचा रंग निळा झाला तर त्यात स्टार्चची मिलावट आहे हे समजून जावे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.