मकरसंक्रातीचा दिवस….
नाशिकचे काम आटोपले आणि घरी निघालो. रस्ता सूरू झाला लाखलगाव आले. आणि समोर दिसला मनोरूग्ण आपोआप गाडी थांबली. मग पूढची हालचाल सूरू. अगोदर तिळाच्या लाडूचा पुडा सोडला आणि त्याला तिळाचा लाडू भरवला. घेत नव्हता पण तोडांत टाकला आणि खाणे सूरू झाले. तेवढ्यात तिथले गावकरी मित्र श्री.पंढरीनाथ कानडे आले अन् विचारपूस सूरू झाली. हा खूप दिवसापासून असाच फिरतो. तो शिलापूरचा आहे. मग नाव श्री.अशोक किसन कहाडळ. शिलापूर ऊर्फ बंडू मग त्यांची बहिण सौ.पूजाताई खेलूकर, बि डी कामगार नाशिक. फोन झाले तूम्हाला यश येत असेल तर घेऊन जा, असे त्यांच्या बहिणीचे मत झाले. तोपर्यत नाशिकवरून आण्णांनी दिलेली अँब्यूलन्स आणि आमची टिम हजर झाली.
सुखसमृध्दी केअर सेंटरला आणले आणि साफसफाई, कटिंग दाढी, अघोंळ आणि नविन कपडे हे सर्व झाले. मग बंडूला जेवण दिले आणि भरवायला सूरूवात करणार त्यात एकशब्द न बोलणारा बंडू मूसमूसून रडायला लागला त्याचे डोळे भरून आले. त्याच्या त्या भावना आणि त्याची बघण्याची ती स्थिती असे सांगत होती कि, आजपर्यत जे लोक आपल्याला जवळ घेत नव्हते ते आज आपली इतकी सेवा करताय. मग आमची टिम सेंटरवर बंडूला झोपवून आपआपल्या घरी गेली.
पण रस्त्यावर राहाणारा बंडू ते बंदिस्त राहणे न आवडल्याने पहाटे सेंटरच्या बाहेर पडला, कसे दरवाजाचे लाॅक खोलले मी विचार करत होतो. आणि तिथून बडूंचा परत रस्त्यावरील प्रवास सूरू झाला.
पूर्ण नाशिक शोधले. ओझर, पिपंळगाव, वणी, कळवण, चांदवड पण काही बंडूचा तपास नाही. नंतर कोकणगावला आहे कळाले पण ते दूसरेच होते. कूठे असेल काय करत असेल जेवण मिळाले असेल का. हा सर्व विचार दरोरोज यायचा.
मग आठेचाळीस तास झाले पंचवटी पोलिस स्टेशनला मिसिंग केस देऊन टाकली. नंतर शोध मोहिम सूरूच होती. त्यांची बहिण भटजीकडे जाऊन आली, चांदवडच्या दिशेला गेल्याचा अंदाज गूरूजीनी दिला होता. मी पण आठ दिवसापूर्वी रेणूकादेवीला साकडे घालून आलोच होतो. सापडला तर त्यालाच तूझ्या दर्शनाला घेऊन येईल.
आणि आठच दिवसात बंडूचा शिलापूरचे एक लग्न नांदगावला जात असताना बंडू त्या वर्हाड्यांना राजापूरच्या घाटात तळपत्या उन्हात डांबरी रोडवरून चालत असताना दिसला. मग त्यांनी पूजाताईला फोन करून सांगितले की, बंडू राजापूरच्या घाटात दूपारी दिसला. मग ताईचा मला फोन आला. बंडू आहे नांदगावला मी म्हटल चला मग लगेच जाऊ पण रात्र असल्याने आम्ही सकाळी जाण्याचा निर्णय घेतला.
सकाळी अकरा वाजता आमची अॅब्यूलन्स, मी सुखसमृध्दी केअर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संतोष वैदय, अनिकेत गाढवे, बाॅर्न टू हेल्प फाँऊडेशनचे अध्यक्ष आनंददादा कवळे, पूजाताई खेलूकर, बंडूची आत्या, आत्येबहीण असे पाच जण आम्ही प्रवासाला सूरूवात केली. नांदगाव पोहचलो. ज्यांनी पाहीले होते त्या नारायण मामा त्यांना फोन करून विचारले. नेमके कूठे पाहिले. मग त्यांनी राजापूर सांगितले. जातानाच खेडेगावात पारावर बसलेले आजोबा त्यांना विचारले अशा एखादा माणूस येथे असतो का तर त्यांनी आम्हाला तो पूढच्या गावात एका शाळेजवळ बसलेला आहे. असे सांगितले मग आम्हाला धीर आला. आता बंडू सापडणार. नाहीतर तसाही आमचा बर्याच वेळेस हिरमोड झाला होता. त्या विचारतच आम्ही शाळेजवळ पोहचलो आणि समोर बंडूशेठ दिसले. आंनद झाला पहिले त्याने चरणस्पर्श केला आणि आनंददादाशी तो हसायला लागला ते बघून खूप मन भरून आले. त्याला सूध्दा कळाले की माझे कोणीतरी आले. मग आम्हाला दाखवायला तिथले एक गावकरी आले होते त्यांचे धन्यवाद मानले. आणि आता बंडूची अघोंळीची सोय आणि कपडे तिथेच मग वस्तीवरून रोजचे पाणी जेवण बंडूला देणारे राज धात्रक यांचे चूलते तिथे आले आणि त्यांनी बंडूची दिवसभराची दिनचर्या सांगितली, धन्यवाद ते एस टीचे कर्मचारी जे रोज बंडूला एक भत्याचा पुडा आणि पाववडा आणून द्यायचे. असे पाहिले की मग वाटते अजून माणूसकी खेड्यात जिवंत आहे.
मग त्यांच्याच वस्तीवर अंघोळ घातली नविन कपडे घालायला दिले. आंनददादा, अनिकेत, राजदादा आणि मी अशी चौघांनी त्याचा हा सोपास्कार आटोपला. त्यांचा निरोप घेऊन आम्ही परतीचा प्रवास सूरू केला.
मग गाडीत बसल्यावर देवीची आठवण झाली आणि लगेच गाडी चांदवडच्या रेणूकादेवीचे दर्शन घेऊन जाऊ हा निर्णय घेतला.प्रवास सूरू झाला गाडीत चर्चा पूर्ण बंडूच्या प्रवासाची पण बंडू मात्र एकदम गप्प एक शब्द न बोलता त्याच्या भावना तो दाखवत होता. मग चांदवड पोहचलो देवीचेदर्शन घेतले .बंडूनेच देवीला पेढे दिले.नारळ फोडले हात जोडून नमस्कार केला.प्रसाद घेतला.खूप बरे वाटले बोलायचे प्रयत्न करायचा पण परत शब्द पूसट करून टाकायचा.मग तिथेच पूजाताईने देवीची वटीभरन करून सेल्फी फोटो बंडूसोबत परतीचा प्रवास परत सूरू. मग पोटतर भरले बंडूला भेटून पण पूजाताई म्हणे आता तूम्ही सकाळचे काही खालेले नाही तेव्हा आता जेवण करा.मग एका शूध्द शाकाहारी हाॅटेलवर थांबलो आणि बंडूसोबतच जेवणाचा आंनद घेतला.तोपण ताटपूसून जेवणाचा आंनद घेत होता.जेवण आटोपून परत नाशिक प्रवास सूरू मग पंचवटी पोलिस स्टेशनला बंडूला घेऊनच गेलो. तिथे पोलिस हावालदार मिसाळ दादांना मिळाल्याची नोंद करून दिली. आणि सेंटरला येऊन बंडूला रूम देऊन झोपण्याची सोय करून पूजाताई, आनंददादा, अनिकेत,आत्या, असे ते सर्व घरी गेले. मग कल्पनाताई, सूधिरभाऊ, मी आमचा रात्रीचा सेंटरमधल्या कामाचा प्रहर सूरू झाला.
असा हा चार महिन्याचा बडूंचा प्रवासाचा शेवट झाला ….आता बंडू स्थिर आहे.
सौजन्य आणि शब्दांकन समृद्धी केअर सेंटर, नाशिक.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.