एलॉन मस्क म्हणतो मानवी मेंदू रोबोट्समध्ये डाऊनलोड करता येईल, तर ग्रीम्स म्हणतात हे काम जेफ बेझोस करतील.
एलॉन मस्क नेहमी रोमांचक गोष्टी सांगतात.
SpaceX चे संस्थापक, खेळण्यासारखं अट्टहासाने आवडलं म्हणून ट्विटर विकत घेणारे टेस्लाचे अब्जाधीश CEO एलॉन मस्क यांना खात्री आहे की, मानव त्यांचे मेंदू रोबोट्स मध्ये डाउनलोड करून अमर होऊ शकतील!!
अजरामर होण्याची इच्छा सगळयांनाच असते…. पण हे शक्य आहे का ?
एलॉन मस्क यांना मात्र, ही गोष्ट शक्य आहे यावर ठाम विश्वास आहे…
ज्या गोष्टी तुम्हाला इतरांपासून वेगळं, युनीक ठरवतात त्या गोष्टी तुम्ही डाऊनलोड करू शकता.
मात्र तुम्ही तुमच्या देहात नसल्यामुळे काही गोष्टींमध्ये फरक मात्र नक्कीच पडेल.
पण काही रम्य आठवणी, तुमचं व्यक्तिमत्त्व यांना जतन करणं शक्य होईल असं त्यांचं म्हणणं आहे.
मस्कच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारचं तंत्रज्ञान हळूहळू संगणक मेमरी च्या रूपात विकासित होईल.
तुमच्या आठवणी, फोटो, व्हिडिओ आज फोन आणि कम्प्युटरमध्ये साठवले जातात.
पुर्वीच्या काळात अशा गोष्टींचा विचार केला असता तर ती जादू वाटली असती.
पण तंत्रज्ञानाची प्रगती तर तुम्ही बघताच आहात.
कम्प्युटर मुळे अगोदरच मानवी मेंदूला मोठ्या प्रमाणात विकसित केलं आहे.
कृत्रिम शरीरात चेतना डाउनलोड करून मानवी जीवन वाढवण्याची संकल्पना ही विज्ञान कथेत फार पूर्वीपासून वापरलेली आहे.
1964 च्या सायन्स फिक्शन कादंबरीत अशा प्राण्यांना सायमेक्स म्हटलेलं आहे.
काही तज्ञांचं ही अस मत आहे की “माईंड अपलोडिंग तंत्रज्ञान” एक ना एक दिवस व्यवहार्य बनू शकेल.
पण हे कधी घडेल ते मात्र आज निश्चितपणे सांगता येणार नाही.
2019 साली मानसशास्त्रज्ञ आणि न्युरोसायन्सचे प्राध्यापक मायकेल एस. ए. ग्राझीयानो यांनी असं मत मांडलं की मेंदूच्या अपलोडिंग साठी तंत्रज्ञानाचे दोन भाग आवश्यक आहेत.
एक म्हणजे कृत्रिम मेंदू आणि दुसरं, एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचं असं स्कॅनिंग जिथं न्युरॉन एकमेकांशी कसे संलग्न आहेत हे तपासता येईल.
ग्रझियानो असं म्हणतात की कृत्रिम मेंदू तयार करण्यात तुलनेने खूप सोप्पं आहे.
पण मानवी मेंदू अपलोड करण्यासाठी असा स्कॅनर तयार करायला हवा जो काहीही नष्ट करणार नाही आणि जो तपशील त्याच्या समोर उपलब्ध आहे त्यापेक्षा शंभर दशलक्षपट स्कँनही तो करू शकेल.
आज मात्र असं तंत्रज्ञान उपलब्ध नाही.
पण आगामी काळात लवकरच आपल्याला अशा प्रकारचं तंत्रज्ञान पाहायला मिळेल.
काही आशावादी लोकांना असं वाटतं की काही दशकातच असं तंत्रज्ञान प्रगत होईल.
पण ग्रझियानो मात्र म्हणतात या गोष्टीसाठी कदाचित शेकडो वर्ष लागू शकतात.
एलान मस्क यांचा सध्याचा स्टार्टअप पैकी एक जो आहे तो आहे न्युरालिंक.
ज्यातून मेंदू साठी एक चिप तयार केली जाते…
ही चिप आजारी लोकांसाठी किंवा पँरालिसीस वगैरे असणाऱ्या लोकांसाठी खूप महत्त्वाची आहे.
रोजचं आयुष्य सोपं करण्यासाठी या आजारी मंडळींना या चिपचा फायदा होईल.
भविष्यात मात्र या चिपच्या माध्यमातून आठवणी साठवता येतील.
इतकेच नाही तर त्यांचा रिप्ले सुद्धा शक्य होईल.
यावर मस्क यांनी मात्र कंपनीची सध्याची उद्दिष्ट ही व्यावहारिक आहे यावरती जोर दिला आहे.
लवकरच न्यूरालिंक चिपचा मेंदूच्या दुखापतीसाठी, पाठीच्या दुखण्यासाठी उपाय म्हणून वापर करता येईल.
ज्याने आपले हात पाय गमावले आहेत अशा व्यक्तींना सुद्धा या न्युरालींक चिप्सचा फायदा होऊ शकेल.
मेंदूला गंभीर दुखापत झालेली आहे अशा व्यक्तीही या चिप मूळं त्यांचं रोजचं आयुष्य सहजपणे व्यतीत करू शकतील.
मित्रांनो चिरंजीव होण्याचा वर हा शाप म्हणून भोगणाऱ्या अश्वत्थामाचं उदाहरण देऊन अमर होण्याचा कोणी विचारही करत नाही.
“मृत्यू म्हणजे वसंत माझा मजवरी फुलणार”
अशाच काहीशा भावना बऱ्याच जणांच्या असतात.
मृत्यू हा वेदनेतून मुक्ती देत असतो. त्यामुळे शहाण्या माणसाला अमर व्हायचं नसतं.
अजरामर म्हणजे वृद्धत्व न येता अमर होणं जमलं तरीही वेदना संपत नसते , मग कोण अमर व्हायला तयार असेल?
तुम्हांला वाचून आश्चर्य वाटेल की एलॉन मस्कला स्वतःला अमर व्हायचं नाहीये किंवा इतर कोणीही अमर व्हावं असंही त्याला वाटत नाही.
यामागचं कारण असं आहे की त्यांना असं वाटतं की, आयुष्य दीर्घ करण्याचा फारसा फायदा नाही.
कारण काही लोक आपल्या विचारांना, आपल्या मतांना आयुष्यभर घट्ट चिकटून राहतात त्यांच्यामध्ये काडीचाही फरक होत नाही.
अशा व्यक्ती जर अमर राहिल्या तर आपला समाज जुन्याच गोष्टींमध्ये अडकून राहील, त्याची प्रगती कधीच होणार नाही.
समजा मेंदू रोबोट मध्ये अपलोड करणं शक्य झालं तर मस्कच्या परिवारातला तरी कोणी अमर व्हायला उत्सुक असेल का?
तर याचे उत्तर मस्कचे सहपालक आणि माजी भागीदार ग्रींम्स यांनी दिलेलं आहे.
ॲमेझॉन आणि ब्ल्यू ओरिजन्स चे संस्थापक जेफ बेझोस हे सायन्स फिक्शन्स मध्ये उल्लेखलेले सायमेक्स व्हायला तयार होतील असं ग्रीम्स यांना वाटतं.
बेझोस यांनी आजपर्यंत जाहीरपणे अशा तंत्रज्ञानामध्ये खरा तर कोणताही रस दाखवला नाही.
तरीही त्यांचं दीर्घायुष्य आणि वृद्धत्व विरोधी संशोधनामध्ये गुंतवणूक करण्याचं रेकॉर्ड मात्र आहे.
तर मित्रांनो बघू या भविष्यामध्ये नक्की काय होतं? आणि कशा पद्धतीने आपला मेंदू रोबोट मध्ये डाउनलोड केला जातो.
खरंच आपला मेंदू जर असा डाउनलोड करून ठेवता आला तर काय काय घडू शकेल? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नक्की कळवा.!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.