नवा मोबाईल खरेदी करणे सोपे व्हावे यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
आपल्याजवळ स्मार्टफोन असणे ही आता एक महत्त्वाची गरज बनली आहे. हल्लीच्या काळात हातात मोबाईल फोन (तोदेखील इंटरनेट असलेला) नसणारा माणूस शोधुनही सापडणार नाही.
आपल्याला स्मार्टफोनचा दैनंदिन वापरासाठी खूपच उपयोग होतो ही गोष्ट खरी आहे. फक्त फोन करणे एवढाच मोबाईलचा उपयोग राहिलेला नसून निरनिराळी ऑनलाइन कामे, पेमेंटस, बँकांची कामे, फोटो व्हिडिओ काढणे, इंटरनेटचा वापर करणे या सर्व गोष्टींसाठी स्मार्टफोनचा उपयोग होतो.
त्यामुळे तो फोन अद्ययावत असणे आवश्यक बनते.
काही वर्षांपूर्वी स्मार्टफोन निर्मिती करणाऱ्या कंपन्या थोड्या थोड्या अवधीनंतर फोनचे नवीन वर्जन आणत असत.
त्यामुळे नवा फोन खरेदी करणे सोपे होते. परंतु आता मात्र अनेक कंपन्या या स्पर्धेमध्ये उतरल्या आहेत आणि अगदी थोड्या कालावधीत स्मार्टफोनचे नवे नवे वर्जनस मार्केटमध्ये येत असतात.
त्यामुळे नेमक्या कोणत्या फोनची निवड करावी हा ग्राहकांपुढचा मोठा प्रश्न असतो.
विश्वासार्ह आणि नावाजलेल्या कंपनीचा फोन खरेदी करा.
विश्वासार्ह आणि नावाजलेल्या कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करावा हे तर खरेच. परंतु त्या फोनमध्ये नेमकी कोणती फीचर्स असणे अत्यावश्यक आहे हेदेखील आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.
जर तुम्ही नवा अँड्रॉइड स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर त्यामध्ये खालील फिचर्स आहेत ना हे नक्की तपासून पहा.
१. अद्ययावत प्रोसेसर
प्रोसेसर हा कोणत्याही स्मार्टफोनचा जणूकाही मेंदूच असतो. जितक्या जास्त क्षमतेचा प्रोसेसर फोनमध्ये असेल तितका तो फोन अद्ययावत आणि सक्षम असतो. फोनमध्ये वापरले जाणारे इंटरनेट ब्राउझिंग, गेमिंग, फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी, स्टोरेज आणि कम्युनिकेशन उत्तम रीतीने होण्यासाठी फोनचा प्रोसेसर अद्ययावत असणे आवश्यक असते.
कमी क्षमतेच्या प्रोसेसरमुळे फोनमध्ये वापरली जाणारी फीचर्स चांगल्या रीतीने काम करू शकत नाहीत. त्यामुळे कोणताही स्मार्टफोन खरेदी करताना त्याचा प्रोसेसर अद्ययावत आहे ना हे पाहणे सर्वात महत्त्वाचे असते.
२. कमीत कमी ६ जीबी रॅम
रॅम म्हणजे रँडम ऍक्सेस मेमरी. फोनच्या स्टोरेज मेमरीपेक्षा ही मेमरी वेगळी असते. स्मार्टफोनमध्ये थोड्या कालावधीसाठी ही मेमरी वापरली जाते. परंतु जितकी जास्त रॅम तितका स्मार्टफोन जास्त कार्यक्षम असतो.
एकाच वेळी अनेक कामे जर आपल्या स्मार्टफोनवर करायची असतील (मल्टिटास्किंग) तर स्मार्टफोनमधील रॅम जास्त असणे आवश्यक असते. दोन किंवा चार जीबी रॅम असणारे फोन देखील असतात परंतु किमान सहा जीबी रॅम असेल तर तो फोन जास्त अद्ययावत आणि कार्यक्षम असतो. अशा फोनचे लाईफ देखील जास्त असते.
३. कमीत कमी १२८ जीबी स्टोरेज
सध्या स्मार्टफोनचा वापर वेगवेगळी माहिती स्टोअर करून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे डाऊनलोड केलेले डॉक्युमेंटस, व्हिडिओज, मुव्हीज आणि इतरही आवश्यक गोष्टी फोनमध्ये स्टोअर केल्या जातात. तसेच हल्ली स्मार्टफोनच्या आधुनिक कॅमेऱ्यामुळे फोनचा वापर करून फोटो आणि व्हिडिओ काढण्याचे प्रमाण देखील खूप वाढले आहे.
हे सर्व आपल्या फोनमध्ये योग्यरीतीने स्टोअर होण्यासाठी आपल्या स्मार्टफोनला कमीत कमी १२८ जीबी स्टोरेज असणे आवश्यक असते.
४. जास्त रिफ्रेश रेट डिस्प्ले असणारा स्क्रीन
मोबाईल फोनवरील सर्व फीचर्स आपण त्याच्या स्क्रीनवरच पाहतो. हा स्क्रीन अद्ययावत आणि जास्त रिफ्रेश रेट डिस्प्ले असणारा असावा.
फोनचा रिफ्रेश रेट किमान ९०Hz असणे आवश्यक आहे. त्यामुळे फोनवर बघितले जाणारे कन्टेन्ट वारंवार रीफ्रेश होऊन उत्तम रीतीने दिसते.
फोनचा डिस्प्ले स्क्रीन हा सर्वात जास्त वापरला जाणारा भाग आहे. त्यामुळे फोनचा डिस्प्ले स्क्रीनला 90Hz refresh rate, FHD resolution, AMOLED colours, आणि ८०% screen-to-body रेशो असणे आवश्यक आहे.
५. किमान ४००० mAh बॅटरी
स्मार्टफोनचा वापर संपूर्णपणे त्याच्या बॅटरीवर अवलंबून असतो. किमान ४००० mAh बॅटरी असेल तर स्मार्टफोन उत्तम रीतीने काम करू शकतो.
तसेच बॅटरी फास्ट चार्जिंग असणे आवश्यक आहे.
यापेक्षा जास्त क्षमतेची बॅटरी देखील उपलब्ध आहे परंतु किमान एवढ्या क्षमतेची बॅटरी आपल्या स्मार्टफोनला असणे अतिशय आवश्यक आहे.
६. अद्ययावत कॅमेरा
हल्ली स्मार्ट फोनचा वापर फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनला अद्ययावत कॅमेरा असणे आवश्यक बनले आहे.
फोटो क्लियर येण्यासाठी आणि त्यातील रंग आहेत तसेच नैसर्गिक दिसण्यासाठी ट्रिपल किंवा quad कॅमेरा असणे आवश्यक आहे.
७. स्मार्टफोनमध्ये आवश्यक असणाऱ्या आणखी काही बाबी
उत्तम सॉफ्टवेअर- फोनमध्ये अद्ययावत सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे.
हेडफोन जॅक – फोनला हेडफोन जोडण्यासाठी स्वतंत्र जॅक असावा.
यु एस बी C – A टाइप यू एस बी पोर्टपेक्षा C टाइप यू एस बी पोर्ट जास्त कार्यक्षम आहे.
फिंगरप्रिंट स्कॅनर – फोनला सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर असावा.
नियर फिल्ड कम्युनिकेशन (NFC) – कॅशलेस पेमेंट करण्यासाठी NFC चा उपयोग होतो. हे फोनमधील एक महत्वाचे फीचर आहे.
वॉटर रेझिस्टन्स – स्मार्टफोन वॉटरप्रूफ असावा म्हणजे पाण्याच्या स्पर्शाने तो खराब होण्याची भीती राहणार नाही.
नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन खरेदी करताना वर दिलेली सर्व फीचर्स त्यामध्ये असणे हे फोन जास्त काळ टिकण्याच्या दृष्टीने आणि संपूर्ण कार्यक्षमतेने त्याचा पुरेपूर वापर होण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
यातील काही बाबी तांत्रिक आहेत हे खरे आहे. परंतु फोनची दिलेली माहिती वाचून किंवा विक्रेत्याच्या मदतीने आपण हे सर्व फीचर्स आपण निवडलेल्या फोनमध्ये आहेत ना हे तपासून घेऊन मगच तो फोन खरेदी करू शकतो.
स्मार्टफोन खरेदी करणे सोपे व्हावे यासाठी हा लेख आहे.
तर मित्रांनो, कशी वाटली ही माहिती तुम्हाला? तुमचा अँड्रॉइड स्मार्टफोन खरेदी करताना ह्या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.
ह्या माहितीचा स्मार्टफोन खरेदीसाठी तुम्हाला कसा उपयोग झाला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख जरूर शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very nice and useful information. Thanks.
नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.
मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…
#मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇
व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇
https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE
टेलिग्राम चॅनल👇
https://t.me/manachetalksdotcom
मनाचेTalks फेसबुक पेज:
https://www.facebook.com/ManacheTalks/
मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:
https://www.facebook.com/ManacheTalksHindi/