सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार covid-19 मुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्या रुग्णांच्या वारसांना पन्नास हजाराचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे.
त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आता सुरु झालेली आहे. Mahacovid19relif.in
हा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तुम्हांला काही कागदपत्रांची गरज लागणार आहे.
1) अर्जदाराचा आधार कार्ड नंबर
2) रुग्णाचा आधार कार्ड नंबर
3) बँकेच्या चेक ची कॉपी
4) आधार कार्ड लिंक असलेला बँक अकाउंट नंबर
वर दिलेली लिंक क्लिक करून तुम्ही पोर्टल वरती गेलात की तुम्हाला त्या होम पेज वरती जीआर नुसार कोण कोण हा अर्ज करायला पात्र ठरू शकतं हे कळेल.
तुम्ही अर्ज केल्यानंतर जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर पुढचे सात दिवस तुमचा मंजूर झालेले अर्ज तुम्ही या पोर्टल वरती पाहू शकता.
तर अर्ज भरण्यासाठी नवीन अर्जदार या ऑप्शनवर क्लिक करा.
तुमचा मोबाईल नंबर टाईप करून आलेला ओटीपी व्हेरिफाय करून घ्या.
त्यानंतर अर्जदाराचे डिटेल्स भरा.
यामध्ये अर्जदार म्हणजे तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात हे लिहा
संपूर्ण जन्मतारीख भरा
पूर्ण पत्ता देऊन चार MB पर्यंतचीच होईल एवढीच आधार कार्डची फाईल अपलोड करा.
त्यानंतर रुग्णाच्या डिटेल्स भरा. यामध्ये रुग्णाचं संपूर्ण नाव. रुग्णाच्या मृत्यूची तारीख. आधार कार्ड नंबर असेल तर तो नंबर.
समजा मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आधार कार्ड असेल तर उपलब्ध डाटाच्या आधारे हा अर्ज पटकन मंजूर होतो हे लक्षात घ्या.
रुग्णाचं आधार कार्ड अपलोड करा. हे आधार कार्ड सुद्धा चार MB पर्यंत चीच फाईल असावी.
रुग्णाचं गाव किंवा जिल्हा हा कॉलम भरा.
अर्जदाराचे रुग्णाशी असलेलं नातं लिहा.
डेथ सर्टिफिकेट अपलोड करा.
त्यासाठी तुम्ही जेपीईजी किंवा पीडीएफ फाईल वापरू शकता.
इतर काही मेडिकल सर्टिफिकेट असेल तर तेही अपलोड करा.
मृत्यू नेमका कशामुळे झालेला आहे तो ऑप्शन्स भरा.
म्हणजे covid-19 चा संसर्ग होऊन झाल्यामुळे की कोवीडमुळे आत्महत्या केल्यामुळे मृत्यू झाला आहे त्यातला योग्य पर्याय निवडा.
ही माहिती सबमिट करा.
त्यानंतर पुन्हा काही माहिती समोर येईल.
त्यामध्ये रुग्णाची जन्मतारीख.
कोरोना बाधित झालेली तारीख. मृत्यूची तारीख. दवाखान्या संबंधी कागदपत्र.
हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला होता का नाही?
हॉस्पिटल मध्ये असेल तर डॉक्टरचं नाव हि माहिती.
ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह करा आणि कंटिन्यू करा.
त्यानंतर चेकचे डिटेल्स विचारतील.
आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेचा अकाउंट नंबर द्या.
आणि त्यासंबंधीची आणखी काही माहिती लागणार आहे ती भरा.
तुमचा अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर तो सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची पोझिशन काय आहे ते तुम्ही त्या पोर्टल वरती पाहू शकता.
तुमच्या जवळच्या नातेवाईकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल सर्व कागदपत्र घेऊन या लिंक वरती ऑनलाईन अर्ज करा किंवा आपल्या ओळखीतल्या गरजू व्यक्तींना याची माहिती द्या
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.