सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: fd laddering म्हणजे काय । रिटायरमेन्ट नंतर मिळालेला पैसे FD मध्ये गुंतवायचा असेल तर तो कसा गुंतवावा ।
FD laddering म्हणजे नेमके काय? अधिक चांगल्या प्रकारे बचत करण्यासाठी ह्याचा उपयोग होऊ शकतो का?
पुढील लेखात वापरण्यात आलेली नावे काल्पनिक असून केवळ उदाहरणासाठी वापरली गेली आहेत.
नवीन नोकरी मिळाली म्हणून ईशा अगदी खुश होती. नव्या गावात, नव्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी ती खूप उत्सुक होती. तिच्या दृष्टीने आणखी आनंदाची बाब म्हणजे नवीन नोकरीत तिला जॉइनिंग बोनस म्हणून एक लाख रुपये मिळाले होते. आई-वडिलांकडून बचतीचे संस्कार मिळालेल्या ईशाने ते एक लाख रुपये गुंतवायचे ठरवले.
घराजवळच्या एका बँकेत तिने बचत खाते उघडले होते. त्याच बँकेत ह्या मिळालेल्या एक लाख रुपयांची एफ. डी. म्हणजे फिक्स डिपॉझिट पावती करण्याकरता ती बँकेत गेली.
योगायोगाने तिची बाल मैत्रीण प्रियांका त्याच बँकेत नोकरीसाठी नुकतीच जॉईन झाली होती. ईशा आणि प्रियांकाला एकमेकींना भेटून खूप आनंद झाला.
ईशाने प्रियांकाला आपण एक लाख रुपयांची एफ. डी. करण्यासाठी आलो आहोत असे सांगितले.
तसेच सध्या बँका फिक्स डिपॉझिट वर जास्तीत जास्त व्याजदर देत असल्यामुळे मोठ्या कालावधीसाठी ही रक्कम गुंतवून जास्तीत जास्त व्याज मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे असे देखील ईशाने प्रियांकाला सांगितले.
ईशा म्हणाली की ती हे एक लाख रुपये दहा वर्षांसाठी गुंतवू इच्छिते जेणेकरून तिला भरपूर व्याज मिळेल.
प्रियांकाने मात्र ईशाला वेगळे पर्याय सुचवले. कोणते ते आपण सविस्तर पाहूया.
प्रियांका म्हणाली की, कोणत्याही बँकेत तीन वर्षासाठी एफडी करणे हे सर्वात जास्त फायदेशीर असते. खूप जास्त कालावधीसाठी जर आपण रक्कम गुंतवली तर ती रक्कम तेवढ्या कालावधीसाठी अडकून तर पडतेच, शिवाय मधल्या काळात जर बँकेचे फिक्स डिपॉझिटचे व्याजाचे दर वाढले तर त्याचा आपल्याला फायदा होत नाही.
याचाच अर्थ असा की, जरी आपण दीर्घकाळ गुंतवणूक करणार असलो तरी, एकदम मोठ्या मुदतीत रक्कम न गुंतवता दर तीन वर्षांनी आपल्या फिक्स डिपॉझिटचे रिन्यूअल करावे.
तसे करण्यामुळे बँकेकडून मधल्या काळात जर फिक्स डिपॉझिटचे व्याजदर वाढले असतील तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो.
फिक्स डिपॉझिट लॅडरींग म्हणजे नेमके काय?
आपल्याजवळ असलेल्या सगळ्या रकमेची एकच फिक्स डिपॉझिट पावती न करता ही रक्कम विभागून त्याच्या तीन फिक्स डिपॉझिट पावत्या कराव्यात.
उदाहरणार्थ, वरील उदाहरणातील ईशाकडे असणारे एक लाख रुपये तिने एक रकमी फिक्स न करता ४००००, ३०००० आणि ३०००० अशा तीन एफडी पावत्या कराव्यात.
तसेच ह्या पावत्यांची मुदत अनुक्रमे एक वर्ष, दोन वर्ष आणि तीन वर्ष अशी करावी.
तसे करण्यामुळे पहिल्या वर्षी मॅच्युअर झालेली एफ. डी. रिन्यू करताना बँकेकडून वाढलेल्या व्याजदराचा लाभ घेता येईल.
तसेच दरवर्षी कोणती ना कोणती एफ. डी. मॅच्युअर होऊन अधिक व्याजाचा फायदा घेता येईल.
त्याचप्रमाणे सगळी रक्कम एकत्र गुंतवलेली नसल्यामुळे जर अडचणीच्या काळात थोड्या रकमेची आवश्यकता भासली तर संपूर्ण फिक्स डिपॉझिट पावती न मोडता केवळ एखादी पावती वापरून अडचणीचे निराकरण करता येऊ शकते. त्यामुळे ग्राहकाचे व्याजाचे नुकसान होत नाही.
अशा पद्धतीने गुंतवलेल्या एफ. डी. पावत्यांना फिक्स डिपॉझिट laddering असे म्हणतात.
आजही भारतात बहुतांश लोक बचत खात्यानंतर गुंतवणुकीचा सुरक्षित आणि सोपा उपाय म्हणून फिक्स डिपॉझिटलाच प्राधान्य देतात.
गुंतवलेल्या रकमेची सुरक्षितता, मिळणाऱ्या व्याजाची हमी आणि आवश्यकतेनुसार तातडीने उपलब्ध होऊ शकणारी रक्कम त्यामुळे लोकांचा फिक्स डिपॉझिट पावती करण्याकडे कल असतो.
त्यातून सध्या बँका फिक्स्ड डिपॉजिट वर जास्त व्याजदर देत असल्यामुळे ही पद्धत नक्कीच फायदेशीर ठरत आहे.
तसेच रिटायरमेंट नंतर जर तुम्हाला काही लाखांची रक्कम मिळाली असेल आणि त्याची FD करत असाल तर अशा प्रकारे FD लॅडरिंग करून गुंतवणुकीचे नियोजन तुम्ही अधिक फायदेशीरपणे करू शकाल.
अशा सुरक्षित आणि सोप्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी काय करता येईल ते आज आम्ही तुम्हाला सांगितले.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्ही कोणत्या प्रकारे बचत आणि गुंतवणूक करता हे देखील आम्हाला नक्की सांगा.
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेअर करायला विसरू नका. कारण फक्त हा लेख शेअर करून तुम्ही इतरांना फायदा करून देण्याचं पुण्य कमावू शकता. मग चला, करा शेअर पटापट!!!
रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.
- अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
- तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
- निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
- अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
- मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
- वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
- आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
- हे तेरा प्रश्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
- तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
- नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
- आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
- आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
- स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
- पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
- मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
- स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
- स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
- जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
- समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
- एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.