काहीतरी नवनवीन करून बघायला हौसच असावी लागते.
स्वयंपाकघर तर एक भारी प्रयोगशाळा असते.
कधी अन्नधान्य रसायनासारख वापरा, बाकीच्या वस्तू भौतिकशास्त्राच्या वस्तू म्हणून वापरा. कल्पनेला भरपूर वाव.
फ्रिज नावाचं कपाट तर गृहिणीचा श्वासच….
त्यातला फ्रिजर नावाचा कप्पा जास्तच मदतीचा.
बर्फ बनवा आईस्क्रीम बनवा.
याव्यतिरिक्त काही मजेशीर आणि फायद्याच्या गोष्टी बर्फाचा ट्रे वापरून करता येतात…
हीच चर्चा करुया या लेखात.
१. कॉफी :
उकळलेली थोडी कॉफी शिल्लक आहे का??
ती पुन्हा प्यायचा कंटाळा आलाय??
उरलेली कॉफी आईस ट्रे मध्ये घालून फ्रिजरमधे ठेवा.
तयार झालेला कॉफीचा बर्फ आणि दूध किंवा पाणी घालून छान मॉकटेल तयार करा.
२. वाईन :
वाईन आईस ट्रे मध्ये घालून ठेवायची.
वाईनचा बर्फ आणि काही फळं घेऊन सॅंग्रियन नावाच स्पॅनिश पेय तयार करता येईल.
३. चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी :
स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि वितळलेलं चॉकलेट आईस ट्रे मधे घालून फ्रिजरमधे सेट करायला ठेवायचं.
मग तयार झालेलं भन्नाट कॉम्बिनेशन जिभेचे चोचले पुरवणारं असेल.
४. दही :
दही आईस ट्रे मध्ये घालून फ्रिजरमधे सेट करायचं.
ते वेगवेगळ्या स्मुदीज बनवण्यासाठी वापरता येईल.
त्यामुळे स्मुदीजला छान टेक्श्चर सुद्धा येईल.
५. लिंबाचा रस आणि पुदिना :
रेस्टॉरंट सारखं मोजिटो बनवायचंय??
मग आईस ट्रे मध्ये लिंबाचा रस आणि पुदिन्याची पाने घालून छान सेट करून घ्या.
या क्युब्स सरबत करण्यासाठी सुद्धा वापरता येतील.
६. चॉकलेट चीज बाईट्स :
चीज आणि चॉकलेट म्हणजे लहान मुलांच्या आवडीची गोष्ट.
वितळलेल चॉकलेट आधी आईस ट्रे मध्ये घालून सेट करून घ्यायचं.
नंतर त्यात वितळवलेलं चीज घालून सेट करायला ठेवायचं.
मुलांना आवडेल असा वेगळा खाऊ तयार होईल.
७. हर्ब :
ऑरेगॅनो, रोझमेरी असे पदार्थ टिकवून ठेवायचे??
आईस ट्रे मध्ये ऑलिव्ह तेल घालून त्यात हे हर्ब घालून ठेवा. हवे तेव्हा वापरता येईल.
८. आलं लसूण पेस्ट :
आलं लसूण पेस्ट दीर्घकाळ टिकवायची आहे??
ही पेस्ट आईस ट्रे मध्ये घालून फ्रिजर मधे ठेवा.
दीर्घकाळ त्याची चव टिकून राहते.
९. नारळपाणी :
नारळपाणी आईस ट्रे मध्ये घालून सेट करून ठेवा.
त्यात तयार झालेला बर्फ स्मुदीज, फ्रूट ज्युस, सरबतं यासाठी वापरता येईल.
१०. कोरफडीचा रस :
कोरफडीचा रस आईस ट्रे मध्ये घालून सेट करून ठेवावा.
तयार झालेला बर्फ चेहऱ्यावर लावल्याने त्वचा तजेलदार होते.
घरच्या घरी अशा गमती जमती करून बघणार ना मग??
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.