गॅस स्टोव्ह कसा साफ करावा | किचन ट्रिक्स

स्वयंपाकघरातील एक महत्वाची वस्तु असणारी गॅसची शेगडी स्वच्छ ठेवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.

स्वयंपाकघर हा आपल्या घराचा एक प्रमुख, महत्वाचा भाग असतो, तो आपल्या घराचा आत्माच असतो म्हणा ना! घरातील सगळ्या मंडळींच्या पोटाची काळजी घेणारा हा प्रमुख भाग गृहीणींचा (आणि काही पुरुषांचा पण) अगदी लाडका असतो.

गृहीणींचा दिवसातला बराचसा वेळ इथेच जातो असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. हल्ली पुरुष मंडळी देखील स्वयंपाकघरात सक्रिय सहभाग घेतात. अशा सर्वांसाठीच हा लेख अगदी महत्वाचा आहे.

आता स्वयंपाकघर म्हटले की तिथे निरनिराळे पदार्थ शिजवले जाणार. म्हणजे थोडीफार सांडलवंड होणारच, अस्वच्छता होणारच आणि खरे तर जिथे अन्न शिजवायचे ती जागा अगदी स्वच्छ असणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. त्यामुळे गृहीणींच्या समोरचा मोठा प्रश्न असतो तो स्वच्छतेचा.

स्वयंपाकघरात फरशी, ओटा स्वच्छ ठेवणे तितकेसे अवघड वाटत नाही, परंतु गृहीणींना मुख्य काळजी असते ती गॅस शेगडीच्या स्वच्छतेशी. गॅस शेगडीचा थेट संबंध आगीशी असल्यामुळे शेगडी स्वच्छ तर ठेवायला हवी पण तसे करताना काही चूक व्हायला नको असे गृहिणींना वाटते आणि ते बरोबरच आहे.

गॅस शेगडीवर सतत अन्न शिजवले गेल्यामुळे ती खराब होणार, वारंवार स्वच्छ करावी लागणार आणि ते देखील सुरक्षितता राखून हे गृहितच आहे.

म्हणूनच आज आम्ही गॅसची शेगडी स्वच्छ करण्याची सोपी आणि सुरक्षित पद्धत सांगणार आहोत आणि त्या संदर्भातील काही महत्वाच्या टिप्स सुद्धा देणार आहोत.

आपल्या स्वयंपाकघरातील गॅसची शेगडी स्वच्छ असणे आरोग्याच्या दृष्टीने तर चांगले आहेच पण त्याच बरोबर स्वच्छ शेगडीवर स्वयंपाक करायला एक वेगळाच उत्साह येतो. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ असणारी शेगडी पाहिली की कामे जणू पटापट उरकतात.

शेगडी स्वच्छ करायला सुरुवात करण्यापूर्वी हाताशी ह्या वस्तू घेऊन ठेवा.

१. किचन क्लीनर लिक्विड

२. भांडी घासण्याचा साबण किंवा लिक्विड

३. गरम पाणी

४. मायक्रोफायबर क्लॉथ (हा बाजारात सहज विकत मिळतो.)

५. घासणी

६. स्पंज

७. जुना टुथब्रश

८. नॅपकिन

शेगडी स्वच्छ करण्याची कृती

१. शेगडीवरील भांडी ठेवण्याचे स्टँड, ताटल्या आणि बर्नर काढून घ्या.

२. शेगडीवरील सांडलेले पदार्थ कोरड्या कपड्याने पुसून घ्या.

३. गरम पाण्यात भांडी घासण्याचा साबण किंवा लिक्विड घालून त्या द्रावणाच्या मदतीने स्पंजचा वापर करून शेगडीचा पृष्ठभाग स्वच्छ करा. तारेची घासणी वापरू नये. त्यामुळे शेगडीवर चरे पडतात. त्याऐवजी डाग काढण्यासाठी जुन्या टूथब्रशचा वापर करा.

४. त्यानंतर दूसरा स्वच्छ कपडा पाण्यात बुडवून शेगडी स्वच्छ पुसून घ्या.

५. शेगडी स्वच्छ करण्यासाठी किचन क्लीनरचा वापर देखील करता येतो. ते शेगडीवर पसरवून १० मिनिटांनी शेगडी पुसून घ्यावी. बाजारात वेगवेगळे किचन क्लीनर मिळतात. त्यांचा वापर करता येतो.

६. शेगडीवर पाणी ओतून ती धुवू नये. असे करण्यामुळे शेगडी लवकर खराब होते. नेहेमी शेगडी ओल्या फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावी.

बर्नर कसे स्वच्छ करावे?

१. गॅस शेगडीचे बर्नर स्वच्छ करण्यापूर्वी शेगडीची माहिती पुस्तिका जरूर वाचावी.

२. एखाद्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात भांडी घासण्याचा साबण किंवा जेल घालावे. त्या गरम पाण्यात शेगडीचे बर्नर, ताटल्या आणि स्टँड किमान २० मिनिटे बुडवून ठेवावे.

३. त्यानंतर एखादी घासणी किंवा ब्रश घेऊन ह्या सर्व वस्तु स्वच्छ घासाव्या. बर्नरमध्ये अडकलेले कण काढून त्याची छिद्रे स्वच्छ करावीत.

४. त्यानंतर सर्व वस्तु साध्या पाण्याने स्वच्छ धुवून पुसून कोरड्या कराव्यात.

५. संपूर्णपणे कोरड्या झाल्यावर ह्या वस्तु शेगडीवर आधी होत्या तशा मांडाव्या.

६. बर्नर आणि स्टँड शेगडीवर नीट बसले आहेत ह्याची खात्री करून घ्यावी.

७. शेगडी चालू करून सर्व ठीक आहे ह्याची खात्री करून घ्यावी. फ्लेमचा रंग बदललेला दिसल्यास बर्नर नीट लागला नाही असा त्याचा अर्थ होतो. अशा वेळी बर्नर पुन्हा नीट बसवावा. गरज भासल्यास गॅस मेकॅनिकची मदत घ्यावी.

तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या गॅसची शेगडी आणि बर्नर स्वच्छ ठेवू शकतो.

मात्र शेगडी स्वच्छ करायला सुरुवात करण्याआधी गॅसचे नॉब बंद असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा गॅस लीक होऊन मोठा अपघात घडू शकतो. गॅस शेगडीशी निगडीत सर्व कामे अत्यंत सावधगिरी वापरुन आणि सुरक्षित राहून करावीत.

स्वच्छता महत्वाची आहेच पण सुरक्षितता जास्त महत्वाची आहे.

गॅसची शेगडी केव्हा स्वच्छ करावी?

गॅसची शेगडी काही सांडलं किंवा खराब झाली तर ताबडतोब पुसून घ्यावी म्हणजे ती वारंवार धुवायची गरज पडत नाही.

दररोज नियमितपणे शेगडी ओल्या फडक्याने पुसल्यास अशा पद्धतीची स्वच्छता १५ दिवसातून एकदा केली तरी तुमची गॅसची शेगडी अगदी स्वच्छ राहून नव्यासारखी चमकेल आणि तिचे आयुष्यही वाढेल.

दररोज शेगडी पाण्याने धुवायची गरज नाही. तसे करण्यामुळे शेगडी खराब होऊन तिचे आयुष्य कमी होऊ शकते.

तर मैत्रिणींनो, गॅसची शेगडी स्वच्छ करण्याची ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.

तुम्ही जर गॅस शेगडी स्वच्छ करायला काही वेगळी युक्ती वापरत असाल तर तेही कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा म्हणजे त्याचा फायदा आपल्या इतर वाचकांना सुद्धा मिळेल.

तसेच ह्या माहितीचा लाभ आपल्या जास्तीतजास्त मैत्रिणींना व्हावा म्हणून हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।