उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
यावर्षी तर बरेच ठिकाणी रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद होत आहे.
24 तास फिरणारा फॅन ही गरम वारा देतो आहे.
प्रत्येकालाच AC वापरणं शक्य नाही किंवा ज्यांच्या घरात AC आहे तिथेही तो एक किंवा दोन खोल्यांतच लावता येतो.
अशावेळी वाढतच चाललेल्या या गर्मी वरती नियंत्रण कसं आणायचं? ते ही कमी खर्चात?
या वरती तुम्ही हे छोटे-छोटे उपाय करू शकता.
१) टेरेस रंगवा.
उष्णता कमी करण्याची पहिली पद्धत वापरताना तुम्हाला टेरेस अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे.
धुळ, पावसाळ्यात साचलेलं शेवाळं हे सगळं घासून पुसून स्वच्छ करून टेरेस चकाचक करून घ्या.
त्यानंतर मार्केटमध्ये मिळणारा सिमेंट कलर आणा.
साधारण १००० स्क्वेअर फूट टेरेसाठी 15 किलो सिमेंट कलर तुम्हांला लागेल.
२० किलोचं सिमेंट कलरचं एक पोतं बाजारात उपलब्ध असतं ते 700 ते 800 रुपयांना मिळतं.
त्याच बरोबर बाजारातून एक ब्रश किंवा रोलर आणायचा
Wall रोलर आणला तर काम पटकन होईलच पण सोशल मीडियावर Do It Yourself (DIY) चे व्हिडिओ बघणारी तुमच्या घरातली मुलं पण आनंदाने तुम्हाला या कामात मदत करतील.
१० लिटरच्या बादलीत सिमेंट कलरचा हळूहळू लगदा करत व्यवस्थित भिजवून घ्या.
सिमेंट कलर पावडर फॉर्म मध्ये मिळतो. तो भिजवण्यापूर्वी इंटरनेटची मदत नक्की घ्या.
हा तयार सिमेंट कलर Horizontal किंवा Vertical पद्धतीने ब्रश फिरवत रंगवून घ्या.
हॉरिझॉन्टल पद्धतीने एकदा ब्रश फिरवला तर हॉरिझॉन्टल पद्धतीनेच पूर्ण रंग लावायचा आणि व्हर्टीकल पद्धतीने जर तुम्ही एकदा सुरुवात केली तर संपूर्ण रंग व्हर्टिकल पद्धतीनेच लावायचा.
रंगाचा पहिला कोट पूर्णपणे वाळू द्या.
त्यानंतर पहिला कोट हॉरिझॉन्टल पद्धतीने तुम्ही दिला असेल तर दुसरा व्हर्टिकल पद्धतीनं, पहिला कोट व्हर्टीकल असेल तर दुसरा कोट हॉरिझॉन्टल पद्धतीने रंगवा.
चांगला परिणाम साधण्यासाठी रंगाचे कमीत कमी २ कोट देणं गरजेचं आहे.
सिमेंट कलरने रंगवून झाल्यानंतर दोन दिवस पाणी मारणे गरजेचं असतं
फायदे
टेरेस वरती जे ऊन पडत ते या रंगामुळे रिफ्लेक्ट होतं त्यामुळे घरातल्या टेंपरेचर कमी व्हायला मदत होते.
सिमेंट कलरचा प्रयोग करण्याआधी तुमच्या घरातला टेंपरेचर चेक करा आणि सिमेंट कलर लावल्यानंतरचं टेंपरेचर चेक करा .
तुम्हाला यामध्ये नक्की फरक जाणवेल.
आता फक्त फॅन लावून सुद्धा तुम्ही तुमचा हा उन्हाळा सुसह्य करू शकता.
२) DampProof पेंट
या सिमेंट कलर शिवाय DampProof पेंटचा व्हाईट कलर ही तुम्ही वापरू शकता.
हा कलर थोडासा महाग पडतो. साधारण २०० रुपये लिटर इतक्या किंमतीत हा कलर तुम्हाला मिळू शकतो.
तुमची इच्छा असली तर तुम्ही हा कलर वापरू शकता.
याला भिजवण्याची झंजट नसते. तुम्ही थेट हा रंग वापरू शकता आणि घरातला टेंपरेचर कमी करू शकता.
३) ग्रीन कापडाचा वापर
ग्रीन कापडाचा वापरही तुम्हाला उष्णता कमी करण्यासाठी करता येतो.
बाजारात उपलब्ध असणारं ग्रीन कलरचं कापड आणून कमी उंचीच छत तुम्ही बांधून घेऊ शकता.
तुमच्या टेरेसच्या लांबी रुंदी नुसार तुम्ही हे छत बांधून घ्यायचं आहे.
या छतामुळे टेरेसवर उन्हाचा थेट मारा कमी होईल आणि स्लॅब तापणार नाही.
स्लॅब तापला नाही की घरातली उष्णता कमी होते.
याशिवाय मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची टीप म्हणजे पश्चिम आणि दक्षिणेकडं उन्हाचा जास्त मारा होत असतो.
दक्षिणेकडची किंवा पश्चिमेकडची भिंत जर तुम्ही पांढऱ्या रंगाने रंगवून घेतली तर ऊन रिफ्लेट होऊन बाकीच्या भिंती तापणार नाही.
मित्रांनो हे होते सर्वसामान्यांना परवडतील अशा पद्धतीचे उन्हाळा सुसह्य करण्याचे उपाय.
कमी खर्चात तुम्ही हे उपाय करु शकता. या उपायांमुळे Ac मुळं येणाऱ्या बिलावर ही तुम्ही नियंत्रण ठेवू शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.