मोबाईल फोन हरवला किंवा चोरीला गेला तर काय करावं?

मोबाईल ही गोष्ट आज प्रत्येक व्यक्तीकडे आहे.

अतिशय अत्यावश्यक अशा गोष्टींमध्ये मोबाईल मोडतो.

आता फक्त फोन करणे किंवा फोन रिसीव करणे एव्हढच मोबाईलचं काम उरलं नाही.

तर अत्यंत महत्वाचा डाटा हा मोबाईल आपल्या पोटामध्ये साठवू शकतो. बर्‍याच जणांना बँक डिटेल्स त्याचबरोबर अनेक महत्त्वाची माहिती मोबाईल वरती सेव्ह करण्याची सवय असते.

अगदी ए. टी. एम.चा पीन, ऑनलाइन अनेक वेबसाईटचे पासवर्डस्, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतरही बरीच महत्वाची माहिती तुम्ही मोबाईल मध्ये साठवलेली असते..

बरेच प्रायव्हेट फोटो तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह केलेले असतात.

मोबाईल मधले साठवलेले व्हिडिओ किंवा इतर महत्त्वाची माहिती पण प्रत्येक व्यक्तीनुसार कमी जास्त असते तरीही महत्वाची असते.

त्या माहितीचा वापर करुन बँकेतली मोठी रक्कम चोरीला जाऊ शकते.

महिलांचे फोटो किंवा व्हिडीओ असतील तर त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो.

म्हणूनच मोबाईल हरवला हे लक्षात आल्यानंतर प्रत्येकाचं धाबं दणाणतं.

मोबाईलच्या किंमती प्रचंड असतातच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा डाटा चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागण्याची शक्यता जास्त असते.

प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार मार्केटमध्ये काळजीपूर्वक शोधून आपला मोबाईल निवडत असतो.

एकदा का मोबाईल हातात आला की त्याच्यामध्ये खूप प्रकारची माहिती लगेचच भरली जाते.

आणि मोबाईल मध्ये ही माहिती आहे असं म्हटल्यानंतर आपण दुसऱ्या ठिकाणी ती माहिती साठवून ठेवायला विसरतो.

गर्दीच्या ठिकाणी कोणीतरी मोबाइलची चोरी करतो, किंवा चुकून एखाद्या ठिकाणी आपण मोबाईल विसरुन येतो.

अशावेळी आपला हात मोडला असं वाटतं. पण आपली माहिती वापरली गेली तर होणारं नुकसान प्रचंड असतं.

मग अशी वेळ आपल्यावर आली तर काय करता येईल?

मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर सर्वात आधी काय करावे? हरवलेला फोन कसा शोधायचा

1) ऑनलाईन कंम्प्लेंट

मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला आहे हे लक्षात आल्या क्षणी तुम्ही तुमच्या भागातल्या पोलिसांच्या पोर्टल वरती ऑनलाईन कंम्प्लेंट रजिस्टर करायलाच हवी.

कंम्प्लेंट रजिस्टर करताना त्याच्यामध्ये आय. एम. ई. आय. (I M E I) नंबर टाकावा लागतो.

हा नंबर तुम्हाला मोबाईलच्या बिलावर किंवा मोबाईलच्या बॉक्सवर सहज मिळून जातो.

तर हा आय एम ई आय नंबर, तुमच्या सिम कार्ड चा नंबर, आणि त्या अनुषंगाने तुमची माहिती या पोर्टलमध्ये भरायची.

एक पी.डी एफ. तयार होते. ही पीडीएफ डाऊनलोड करून घेऊन जवळच्या पोलिस ठाण्यात त्या पीडीएफ ची कॉपी सबमिट करायची.

मोबाईल हरवलेला आहे किंवा चोरीला गेलेला आहे हे लक्षात आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पोलीस पोर्टलला ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर करणं गरजेचं असतं.

2) सिमकार्ड ब्लॉक करायचं.

मोबाईल हरवला आहे किंवा चोरीला गेलेला आहे हे कळल्यानंतर मोबाईल सिमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरला कॉल करून तुमचे सिमकार्ड ब्लॉक करा.

त्यामुळे काय होईल कोणतीही व्यक्ती तुमच्या मोबाईलचा गैरवापर करू शकणार नाही.

3) ऑनलाइन ट्रॅक

तुमच्या मोबाईलचं लोकेशन तुम्ही ऑनलाइन ट्रॅक करू शकता.

हे लोकेशन लक्षात आलं की त्या परिसरात जाऊन तुम्ही तुमच्या मोबाईलचा शोध घेऊ शकता.

सुदैवाने चांगल्या व्यक्तीच्या हातात मोबाईल पडला असेल तर तुम्ही त्या एरियात गेलात तर तुमचा मोबाईल तुम्हाला लगेचच मिळू शकतो.

मात्र त्या परिसरात जाऊन पटकन चौकशी करणं महत्त्वाचं ठरतं

त्या एरियात असणाऱ्या एखाद्या सीसीटीव्ही फुटेजचा ही तुम्ही उपयोग करून घेऊ शकता.

तुमची गूगल मॅप ची “your timeline” ही सर्व्हिस चालू असेल तर तुम्ही कम्प्युटरवर तुमच्या गूगल अकाऊंट मध्ये लॉगिन करून, गूगल मॅप च्या “your timeline” वर गेलात तर तुम्हाला तुमचा मोबाईल कुठल्या एरियात फिरला आहे हे लक्षात येईल.

तुमच्या मोबाईलचं इंटरनेट चालू असेल तर त्याचे करेक्ट लोकेशन ही तुम्हाला कळू शकेल.

4) एण्ड्रोइड डिवाइस मॅनेजर

हरवलेला फोन शोधण्यासाठी या पद्धतीचाही वापर करता येऊ शकतं.

तुमचा फोन कुठे आहे हे कळण्यासाठी अँड्रॉइड डिवाइस मॅनेजरची मदत घ्यायची असेल, तर मात्र त्यासाठी तुमच्या हरवलेल्या मोबाईलचं इंटरनेट चालू असायला हवं.

तुमचा फोन स्विच ऑफ केलेला अथवा रिसेट केलेला नसावा. अण्ड्रोइड डिवाइस मॅनेजर हे ऍप तुमच्या मोबाईल मध्ये इन्बिल्ट असते.

तुम्हाला हे ऍप चालू स्थितीत ठेवावे लागेल त्यासाठी तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये तुम्ही तशी सेटिंग करून ठेवलेली असावी.

अण्ड्रोइड डिवाइस मॅनेजर मध्ये, गेस्ट मोडवर लॉगिन करा, लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल कुठे आहे हे मॅप वर दिसेल.

तुम्ही या ऍपद्वारे मोबाईलचा सर्व डाटा डिलीट करू शकता किंवा फोनवर रिंग सुद्धा देऊ शकता.

जर तुमचा मोबाईल जवळपासच कुठे असेल तर लगेच सापडेल.

मोबाईल चोरीची पोलीस तक्रार केल्यानंतर पोलीस आय. एम. ई. आय. नंबर द्वारे तुमचा मोबाईल ट्रॅक करून चोरांपर्यंत पोहोचू शकतात

आता या प्रक्रियेला किती वेळ लागेल ते मात्र काही सांगता येत नाही आणि म्हणूनच आपला मोबाईल त्यातला डाटा मौल्यवान आहे हे लक्षात घ्या आणि तो नीट सांभाळून ठेवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।