चकित झालात ना, पण हो, हे सत्य आहे.
आपल्या हाताच्या बोटांच्या लांबीवरुन आपले स्वास्थ्य आणि आपला स्वभाव देखील ओळखता येतो.
एका सर्वेक्षणात असे आढळले आहे की आपल्या बोटांच्या लांबीवरुन त्यातल्या-त्यात हाताचं पहिलं बोट आणि अनामिका म्हणजेच अंगठी घालतो ते बोट, ह्यांच्या लांबीवरुन त्या त्या व्यक्तीच्या स्वभाव आणि होऊ शकणाऱ्या आजारांबद्दल भाकीत करता येऊ शकते.
अनामिका आणि पहिलं बोट ह्यांच्या लांबीत किती फरक आहे ह्यावर त्या व्यक्तींचा स्वभाव ठरतो. तसेच होऊ शकणाऱ्या आजारांबद्दलही जाणून घेता येते.
१. पहिले बोट जर अनामिकेपेक्षा बरेच लहान असेल तर त्या व्यक्तीच्या जिभेला बरीच धार असते. बोलण्यात थोडे अग्रेसिव नेचर जाणवते.
स्त्री असो अथवा पुरुष पहिले बोट लांबीने कमी असेल तर स्वभाव जरा वर्चस्व गाजवण्याचा असतो.
२. तसेच पहिले बोट लांबीने कमी असेल तर त्या व्यक्तींचा खेळाकडे जास्त ओढा असतो. अनेक खेळाडू, ऍथलिट ह्यांचे पहिले बोट अनामिकेपेक्षा लहान असल्याचे आढळून आले आहे.
३. स्त्रियांमध्ये जर पहिले बोट अनामिकेपेक्षा लहान असेल तर नेतृत्वगुण दिसून येतात. इतरांकडून योग्य रीतीने काम करून घेण्याची क्षमता आढळून येते.
४. पहिले बोट जर अनामिकेपेक्षा बरेच लहान असेल तर स्त्री व पुरुष दोघांमध्येही थोड्या प्रमाणात भांडखोर वृत्ती आढळून येते. तसेच काही चुकीचे घडत असेल तर ते सहन न होऊन लगेच वाद घालण्याकडे अशा लोकांचा कल दिसून येतो.
५. ज्या पुरुषांमध्ये अनामिका सर्वात लांब असते ते जास्त जोखीम पत्करून काम करणारे असतात.
अनेक स्टॉक ट्रेडर्स म्हणजेच शेयर बाजारात जोखीम पत्करून नफा मिळवणाऱ्या पुरुषांच्या हाताची अनामिका सर्वात लांब असते असे आढळून आले आहे.
हे झाले स्वभावातले गुण अवगुण. अशीच भाकिते तब्येतीच्या दृष्टीनेही करता येतात. कशी ते पाहूया
१. पहिले बोट जर अनामिकेपेक्षा बरेच लहान असेल तर गुडघेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त आढळते.
२. पहिले बोट जर अनामिकेपेक्षा बरेच लहान असेल तर तोंडामध्ये इन्फेक्शन किंवा तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो.
३. पहिले बोट जर अनामिकेपेक्षा बरेच लहान असेल तर प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका देखील बराच कमी असतो.
तर ही आहेत बोटांच्या लांबीवरुन केलेली स्वभाव आणि तब्येतीबाबतची भाकिते. अर्थात ही केवळ भाकिते आहेत हे आपण विसरता कामा नये.
सर्वांनी आपापल्या तब्येतीची योग्य ती काळजी घेत राहणे अतिशय आवश्यक आहे.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.