अंडे हे खरंतर इतकं पौष्टिक आहे की ते ‘सुपरफूड’ मानले गेले पाहिजे.
अंड्यामध्ये अतिशय पौष्टिक घटक असतात जे इतर पदार्थातून सहजपणे मिळत नाहीत.
नियमित अंडी खाण्यामुळे शरीर सुदृढ तर होतेच शिवाय रोगप्रतिकारक शक्ति देखील वाढते.
आज आपण अंडी खाण्याचे ८ फायदे कोणते ते पाहूया.
१. अतिशय पौष्टिक – अंडे हे अतिशय पौष्टिक आहे.
एका मोठ्या उकडलेल्या अंड्याचे घटक खालीलप्रमाणे
विटामीन ए : ६%
फोलेट : ५%
विटामीन बी ५ : ७%
विटामीन बी १२ : ९%
विटामीन बी २ : १५ %
फॉस्परस : ९%
सेलेनियम : २२ %
ह्याशिवाय उकडलेल्या अंड्यामध्ये विटामीन डी, ई, के, बी ६, कॅल्शियम आणि झिंक देखील असते.
एका अंड्यामध्ये ७७ कॅलरी असतात. ६ ग्राम प्रोटीन आणि ५ ग्राम हेल्दी फॅट्स असतात.
तर अशा प्रकारे अंडे हा एक परिपूर्ण पोषक आहार आहे.
२. रक्तातील कॉलेस्ट्रॉल वाढू देत नाही – अंडे हा खरंतर जास्त कोलेस्ट्रॉल असणारा पदार्थ आहे.
परंतु अंड्याचे वैशिष्ट्य असे की ह्याच्या सेवनामुळे रक्तातील वाईट समजले जाणारे कोलेस्ट्रॉल वाढत नाही.
त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याचा धोका उरत नाही.
३. HDL हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते – शरीरातील HDL किंवा चांगले कोलेस्ट्रॉल योग्य प्रमाणात असणे अतिशय आवश्यक आहे.
कारण त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.
नियमित अंडे खाण्यामुळे हे HDL चांगल्या प्रमाणात वाढते असे दिसून आले आहे.
४. कोलीन नावाचे पोषकद्रव्य मिळते – कोलीन नावाचे पोषकद्रव्य जे अतिशय दुर्मिळ आहे आणि सहसा इतर कुठल्या अन्नपदार्थामधून मिळत नाही ते अंडी खाण्यामुळे मिळते.
हे पोषणद्रव्य मेंदूच्या कार्याशी निगडीत आहे. त्यामुळे त्याचे योग्य प्रमाण शरीरात असणे अतिशय आवश्यक आहे.
एका अंड्यामध्ये १०० मिलिग्राम इतके कोलीन मिळते.
५. हृदयविकाराचा धोका कमी होतो – शरीरातील LDL नावाचे कोलेस्ट्रॉल जे वाईट कोलेस्ट्रॉल म्हणून समजले जाते त्याचे प्रमाण कमी असणे हे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते.
नियमित अंडे खाण्यामुळे ह्या कोलेस्ट्रॉलचे शरीरातील प्रमाण कमी होते आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो.
६. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त – वयोपरत्वे दृष्टी कमी होणे किंवा मोतीबिंदू होणे ह्या अगदी कॉमन समस्या आहेत.
परंतु आहारात सुरुवातीपासून नियमित अंडे सेवन केले असता हा धोका कमी होतो.
अंड्यामध्ये ल्यूटीन आणि झिक्झांथिन नावाचे अँटीआक्सिडेंट असते ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच मोतिबिंदुचा धोका कमी होतो.
शिवाय अंड्यामध्ये विटामीन ए असते, तेदेखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
७. प्रोटीनयुक्त आहार – अंडी हा अर्थातच प्रोटीनयुक्त आहार आहे. प्रोटीन आपल्या शरीराच्या मासपेशी घडवण्यासाठी आवश्यक असते. म्हणजेच शरीर सुदृढ होण्यासाठी योग्य प्रमाणात प्रोटीन घेणे आवश्यक असते जे अंडी खाण्यामुळे मिळते.
म्हणूनच कसरतपटू आणि ऍथलीट नियमित अंडी खातात.
८. पोटभरीचे खाणे – अंडी खाल्ल्यामुळे पोटभर खाणे खाल्ल्यासारखे वाटते. भूक भागते.
आणि त्यामुळे कमी खाऊन देखील पूर्ण आहार घेतला असे वाटते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अंडी खाणे उपयुक्त ठरते.
तर हे आहेत अंडी खाण्याचे फायदे. आपल्या आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करा. आणि ह्या फायद्यांचा लाभ घ्या.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.