अलीकडच्या काळात आपल्या बदलेल्या जीवनशैलीमुळे वेगवेगळे आजार जसे की डायबेटीस, हाय बीपी याचा त्रास अगदी तिशीपासूनच सुरु व्हायला लागला आहे.
यामागची कारणे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहेत.
व्यायामाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या अडनिड्या वेळा, आहारात जास्त फास्ट फूडचा समावेश, कामाचा स्ट्रेस इत्यादी.
पण आजकालच्या तरुण पिढीचा कल मात्र हे चित्र बदलण्याकडे दिसतो आहे.
कामाचा आणि घरचा व्याप सांभाळून आपल्या तब्येतीकडे लक्ष देणे, व्यायाम करणे, खाण्यात बदल करणे, त्यासाठी कमी तेलकट, कमी गोड पदार्थांना प्राधान्य देणे यासारखे बदल ते आपल्या आयुष्यात घडवून आणायचा प्रयत्न करत आहेत.
हे करताना आपण वापरत असलेले तेल कशापासून बनलेले आहे?
आपण चांगल्या प्रतीचा तांदूळ निवडला आहे का?
अशा गोष्टींबद्दल सतर्कता वाढत चालली आहे.
आपल्या आरोग्याबद्दल लोक गंभीरपणे विचार करून अन्हेल्दी सोडून हेल्दीकडे वाटचाल करत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे.
तुम्हाला सुद्धा हे बदल करायला सोपे जावे म्हणून आजचा हा लेख आहे.
आहारात बदल करताना आपण सगळ्यात आधी विचार करतो ते, आपण वापरत असलेल्या तेलाबद्दल.
आपण वापरतो ते तेल चांगले आहे का?
आपण वापरतो त्या तेलापेक्षा अजून चांगले काही पर्याय उपलब्ध आहेत का?
असे प्रश्न आपल्याला पडलेले असतात. आम्ही याचेच उत्तर या लेखात देणार आहोत.
बाजारात अनेक प्रकारची तेल असतात आणि प्रत्येकाचे काही फायदे, काही तोटे असतात.
या लेखात राईस ब्रॅन ऑईलचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जेणेकरून पुढच्या वेळी तेल विकत घेताना तुमच्या आरोग्याला पूरक असा निर्णय तुम्ही घेऊ शकाल.
राईस ब्रॅन ऑईल हे भारतासह अनेक देशात कुकिंग ऑईल म्हणून वापरले जाते.
हे तेल तांदळाच्या बाहेरच्या आवरणातून काढले जाते. तांदळावर प्रक्रिया करून त्याचे बाहेरचे आवरण काढले जाते आणि यामुळे आपल्याला पांढरा तांदूळ मिळतो.
सहसा, हे आवरण ज्याला राईस ब्रॅन म्हणतात, हे गुरांन खायला दिले जायचे पण अलीकडेच राईस ब्रॅन ऑईल हे लोकप्रिय प्रकारचे तेल झाले आहे?
ते का? हेच आज आपण बघणार आहोत.
१. राईस ब्रॅन ऑईल आरोग्यपूर्ण असते कारण
अ. राईस ब्रॅन ऑईलमध्ये ‘गुड फॅट असतात.
आपण खाल्लेल्या अन्नातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स, फॅट, प्रोटीन हे मिळत असते.
त्यातील फॅटचे दोन प्रकार असतात.
अनसॅचुरेटेड फॅट आणि सॅचुरेटेड फॅट.
यापैकी अनसॅचुरेटेड फॅट हे आपल्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते तर, सॅचुरेटेड फॅट हे हानिकारक असते.
राईस ब्रॅन ऑईलमध्ये हे अनसॅचुरेटेड फॅट भरपूर प्रमणात असतात.
ब. राईस ब्रॅन ऑईलमध्ये व्हिटॅमिन ‘ई’ जास्त प्रमाणात आढळतात.
आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी तसेच आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन ‘ई’ गरजेचे असते.
२. मधुमेहापासून बचाव
आपल्या स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन हे होर्मोन तयार होत असते.
आपल्या रक्तातील साखर आपल्या शरीरातील सगळ्या पेशींना पुरवून, आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवणे हे या इन्सुलिन हार्मोनचे काम असते.
पण कधी कधी काही कारणामुळे काहीजणात इन्सुलिन रेसीस्टन्स येतो, ज्यामध्ये आपले शरीर या इन्सुलिन हार्मोनला दाद देत नाही.
यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेह होतो.
राईस ब्रॅन ऑईल हे हा इन्सुलिन रेसीस्टन्स निर्माण होण्याची शक्यता कमी करते.
यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
तुम्हाला जर मधुमेहाचा धोका असेल, वजन जास्त असेल किंवा फॅमिली हिस्ट्री असेल तर राईस ब्रॅन ऑईल हा एक अतिशय चांगला पर्याय आहे.
३. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
राईस ब्रॅन ऑईलमध्ये गुड फॅट्स जास्त प्रमाणात असतात हे आपण बघितलेच.
त्यामुळे साहजिकच ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.
राईस ब्रॅन ऑईलच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरातील गुड कोलेस्टेरॉलचे (HDL) प्रमाण वाढते, तर बॅड कोलेस्टेरॉलचे (LDL) प्रमाण कमी करते.
यामुळे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी राईस ब्रॅन ऑईल फायदेशीर ठरते.
४. कॅन्सरपासून बचाव
राईस ब्रॅन ऑईलमध्ये टोकोट्रीएनॉल्स नावाचे अँटीऑक्सिडंट आढळते.
आपल्या शरीरात काही ‘फ्री रॅडीकल्स’ तयार होत असतात.
हे ‘फ्री रॅडीकल्स’ आपल्या शरीरातील इतर पेशींसाठी हानिकारक असतात.
एँटीऑक्सिडन्ट आपल्या शरीरातील इतर, आरोग्यपूर्ण पेशींचे फ्री रॅडीकल्सपासून बचाव करतात.
टोकोट्रीएनॉल्स या एँटीऑक्सिडन्टचा कॅन्सर रोखण्यासाठी फायदा होतो.
थोडक्यात, राईस ब्रॅन ऑईलमध्ये एँटीकॅन्सर गुणधर्म असतात.
५. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त
राईस ब्रॅन ऑईलमध्ये आढळणारे व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट हे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत.
आपल्या रोजच्या जेवणात जर हे तेल वापरले तर आपली रोग प्रतिकारशक्ती सुधारून किरकोळ आजारांपासून आपला बचाव होईल.
६. त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी चांगले
तेलकट पदार्थ खाल्ल्याचे त्वचेवर विपरीत परिणाम होऊ लागतात.
पण राईस ब्रॅन ऑईलमध्ये व्हिटॅमिन ‘ई’ जास्त प्रमाणात असल्याने तसेच त्यात आढळणाऱ्या वेगवेगळ्या एँटीऑक्सिडन्टमुळे ते आपल्या त्वचेच्या व केसांच्या आरोग्यासाठी देखील चांगले असते.
७. तोंडाला येणाऱ्या वासापासून सुटका
तोंडाला येणारी दुर्गंधी ही अनेकांसाठी समस्या असते.
एकू दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी तर ते चांगले नसतेच, पण त्यामुळे आपल्या वागण्या-बोलण्यात एकप्रकारचा अवघडलेपणा येऊ आपला आत्मविश्वास कमी होतो.
राईस ब्रॅन ऑईल थोडे तोंडात घेऊन त्याने चूळ भरल्याने तोंडाला येणारा घाण वास नाहीसा होतो.
८. एँटीइन्फ्लेमेट्री गुणधर्म
राईस ब्रॅन ऑईलमध्ये एँटीइन्फ्लेमेट्री गुणधर्म असतात.
हे एँटीइन्फ्लेमेट्री गुणधर्म विशेषतः आपल्या रक्तवाहिन्यांवर आपला परिणाम दाखवतात.
काही कारणाने आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये इन्फ्लेमेशन होते.
ज्यामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होऊन त्या जास्त कडक होत जातात.
यावर वेळेतच उपचार घेतले नाहीत तर याच गंभीर परिणाम होऊन ह्र्दयविकाराचा झटका येण्याची सुद्धा शक्यता असते.
राईस ब्रॅन ऑईलमध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या ओरायझेनाॅलमध्ये एँटीइन्फ्लेमेट्री गुणधर्म असतात.
ज्यामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता शाबूत राहते.
मित्रांनो, आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी व्यायाम, पुरेशी झोप जितके महत्त्वाचे आहेत तितकाच समतोल आहार…
आपल्या आहारात काही छोटेच पण महत्वपूर्ण बदल केल्याने आपल्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते.
यासाठी आपण जास्त सतर्क राहून आपल्याजवळ असणाऱ्या पर्यायांचा सर्वतोपरी विचार करून निवड केली पाहिजे.
आपण कितीही हेल्दी खायचे ठरवले तरी आपल्या भारतीय स्वयंपाकातून तेल पूर्णपणे वर्ज करणे हे अवघड आहे…
पण योग्य ती माहिती मिळवून आपण हेल्दी तेलाचा वापर निश्चितच करू शकतो, बरोबर ना?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
How to gain weight fast? Please tell me
Thanks again for the post. Really thank you! Keep writing. Deirdre Tracy Lucilla
Excellent, मला थायरॉईड असल्यामुळे माझे वजन प्रयत्न करूनही कमी होत नाही, आपले ऑइल try करून बघेन, Thanks 🙏🏻