आई होणे हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण असतो. एकदा बाळाला पाहिले की स्त्री ९ महिने सहन केलेला त्रास आणि प्रसुतीच्या वेदना क्षणात विसरून जाते.
परंतु गरोदरपणाच्या काही खुणा मात्र स्ट्रेच मार्क्सच्या रूपाने स्त्रीच्या शरीरावर तशाच राहू शकतात.
स्त्रियांना आपल्या शरीराचा बेढब झालेला आकार आणि पोट, कंबर, दंड इत्यादी ठिकाणी आलेले स्ट्रेच मार्क्स आवडत नाहीत.
आज आम्ही तुम्हाला स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय, ते कशामुळे येतात, ते कमी कसे करायचे आणि घालवण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत.
स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय ?
स्ट्रेच मार्क्स म्हणजे त्वचेची वरची लेयर फाटून दिसु लागलेल्या पांढरट खुणा. जेव्हा शरीराचे वजन वाढते आणि आकारमान बदलते तेव्हा शरीरावरील त्वचेचे सर्वात पदर (लेयर) ताणले गेल्यामुळे आतल्याआत फाटतात आणि त्याचे आधी लालसर असणाऱ्या आणि नंतर पांढरट दिसणाऱ्या खुणा शरीरावर दिसु लागतात.
गरोदरपणा, वजन वाढणे किंवा व्यायाम ह्या कारणांमुळे स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात.
स्ट्रेच मार्क्स होण्याची कारणे
स्ट्रेच मार्क्स फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही होऊ शकतात. वजन वाढणे हे त्याचे प्रमुख कारण आहेच परंतु त्याव्यतिरिक्त जे लोक जीम करतात त्यांनाही दंड, खांदे, पोट, कंबर इत्यादी ठिकाणी स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात.
आपली त्वचा दोन आवरणांची बनलेली असते. जेव्हा कोणत्याही कारणाने वजन वाढते तेव्हा त्वचेचे वरचे आवरण ताणले जाते परंतु आतील आवरण ताणले जात नाही म्हणून वरील आवरण फाटून स्ट्रेच मार्क्स दिसु लागतात.
खालील कारणांमुळे स्ट्रेच मार्क्स दिसु लागतात.
१. गरोदरपणा अथवा इतर कोणत्याही करणामुळे वजन खूप वाढणे.
२. वाढीच्या वयात होणारे हॉर्मोन्सचे असंतुलन
३. खेळाडू किंवा व्यायामपटू ह्यांच्या शरीरात होणारे बदल
स्ट्रेच मार्क्स होऊ नये ह्यासाठी काय करावे ?
बहुतेक वेळा योग्य आहार आणि दिनचर्येत थोडा बदल केल्यास स्ट्रेच मार्क्स होऊ न देणे शक्य आहे. स्ट्रेच मार्क्स होऊच न देण्यासाठी खालील उपाय करावेत.
१. व्यायाम करण्यामुळे त्वचा सतेज, तजेलदार आणि मजबूत बनते. नियमित व्यायाम करण्याने स्ट्रेच मार्क्स होत नाहीत. पोटावर स्ट्रेच मार्क्स येऊ नयेत म्हणून नियमित क्रंचेस कराव्यात. दंड, जोर, बैठका करण्यामुळे देखील स्ट्रेच मार्क्स येत नाहीत.
२. स्ट्रेच मार्क्स होऊ नयेत असे वाटत असेल तर आहार पौष्टिक असणे अत्यंत आवश्यक आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या विटामीन ई असणारे बदाम, अक्रोड तसेच विटामीन सी असणाऱ्या फळांचा समावेश अवश्य करावा. त्यामुळे त्वचेचे नवे लेयर्स बनण्यास मदत होते आणि स्ट्रेच मार्क्स येत नाहीत.
३. भरपूर प्रमाणात पाणी पिण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि स्ट्रेच मार्क्स येत नाहीत.
४. संत्री आणि लिंबाची साले उन्हात वाळवून त्यांची पूड करून ठेवावी. ती पूड गुलाब पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करून गरोदरपणात वाढणाऱ्या पोटावर लावावी त्यामुळे स्ट्रेच मार्क्स येत नाहीत.
स्ट्रेच मार्क्स घालवण्याचे घरगुती उपाय
काही वेळा स्ट्रेच मार्क्स येऊ न देण्याचे कितीही प्रयत्न केले तरी अनुवांशिकता, हॉर्मोन्सचे असंतुलन ह्यामुळे स्ट्रेच मार्क्स येतात. अशा वेळी ते घालवण्यासाठी काय घरगुती उपाय करावेत ते आपण आज पाहणार आहोत.
१. हळद
हळदीची तेल अथवा पाणी घालून घट्ट पेस्ट बनवून ती स्ट्रेच मार्क्सना दिवसातून २ वेळा लावावी. स्ट्रेच मार्क्स दिसणे कमी होते.
२. पाणी
आपल्या शरीरात ७२% पाणी असते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाणी पाण्यामुळे शरीरातील हॉर्मोन्स संतुलित राहतात आणि स्ट्रेच मार्क्स दिसणे कमी होते.
३. अक्रोड
अक्रोडामध्ये व्हिटॅमिन ई असते. अक्रोड बारिक वाटून त्यात पाणी घालून त्याची पेस्ट करून स्ट्रेच मार्क्स ना लावावी. १५ मिनिटे ठेवून धुवून टाकावी. हा उपाय नियमितपणे केल्यास स्ट्रेच मार्क्स दिसणे कमी होते.
४. एरंडेल तेल
स्ट्रेच मार्क्सच्या ठिकाणी एरंडेल तेलाची गोल गोल फिरवून मालिश केल्यास स्ट्रेच मार्क्स दिसणे कमी होते.
५. कोरफडीचा गर
स्ट्रेच मार्क्सच्या खुणांवर कोरफडीचा गर नियमित लावल्यामुळे स्ट्रेच मार्क्स दिसणे कमी होते. त्वचेच्या बाबतीत कुठल्याही समस्येवर कोरफडीचा गर हा रामबाण उपाय आहे.
६. साखर
लिंबाच्या रसात साखर आणि बदाम तेल मिसळून ते मिश्रण डागांवर लावावे. १० मिनिटांनी ते धुवून टाकावे. स्ट्रेच मार्क्स कमी होतात.
७. बटाटा
बटाट्यामध्ये स्टार्च असतो जो कोणतेही डाग कमी करण्यास मदत करतो. एका बटाट्याचा रस काढून तो स्ट्रेच मार्क्स वर लावून ठेवल्यास ते कमी होतात.
८. लिंबाचा रस
लिंबाचा रस स्ट्रेच मार्क्सवर लावणे हा स्ट्रेच मार्क्स घालवण्याचा अगदी साधा पण खूप उपयुक्त उपाय आहे.
९. कोको बटर
कोको बटरने रोज मालिश करणे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यास मदत करते. गरोदरपणात हा उपाय जरूर करावा.
१०. ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑईलने रोज मालिश करणे देखील स्ट्रेच मार्क्स दिसणे कमी करते.
११. ग्लिसरीन
लिंबाच्या रसात २,३ थेंब ग्लिसरीन मिसळून ते स्ट्रेच मार्क्स वर १० मिनिटे लावून ठेवावे. नंतर धुवून टाकावे. खूप फरक पडतो. असे दिवसातून २ वेळा करावे.
१२. ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून स्ट्रेच मार्क्सच्या जागांवर लावून २० मिनिटे ठेवावे. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाकावे. ह्या उपायचा बराच फायदा होतो.
तर हे आहेत स्ट्रेच मार्क्स घालवण्याचे घरगुती उपाय. ह्यांचा नियमितपणे वापर केल्यास निश्चित फरक पडतो. त्यांचा जरूर लाभ घ्या.
परंतु जर काही कारणांनी ह्या उपायांचा लाभ झाला नाही तर स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. कारण खूप जुने झाल्यावर स्ट्रेच मार्क्स हटवणे अवघड होऊन बसते. तेव्हा स्ट्रेच मार्क्सवर वेळीच उपाय करा आणि सुंदर दिसा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very informative and knwoledgfull article.