आजीबाईच्या बटव्यातील २२ रामबाण घरगुती उपाय, जरूर वाचा.

अनेकदा छोट्या छोट्या शारीरिक समस्येवर घरातल्या वडीलधाऱ्यांकडे काही ना काही उपाय असतोच जो रामबाण उपाय ठरतो.

काही किरकोळ आरोग्य समस्या अशा असतात, ज्या सोडवण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील हे सोपे २२ रामबाण घरगुती उपाय पुरेसे ठरतात.

१) कान दुखी – कांदा बारीक करून त्याचा रस कापडानं गाळून घ्या. तो रस गरम करून कानात ४ थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होते.

२) दातदुखी- हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून दोनदा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते.

३) दात पोकळी – कापूराची बारीक पूड करून बोटाने दातांवर लावा आणि चोळा. छिद्र पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर कापूर छिद्राखाली काही वेळ दाबून ठेवल्याने दातदुखी हळूहळू कमी होते.

४) लहान मुलांच्या पोटातले जंत – लहान मुलांच्या पोटात जंत झाले असतील तर कांद्याचा रस सकाळ संध्याकाळी गरम करून एक तोळा दिला तर जंत नक्कीच मरतात.

५) शरीरावरच्या गाठी – कांदा बारीक करून गरम करा. नंतर त्यात गोमूत्र मिसळून छोटे गोळे तयार करा. कपड्याच्या साहाय्याने गाठीवर बांधा ,याने वेदना कमी व्हायला मदत होते.

६) पोटातील कृमी आणि जंत – १ चमचा सोयाबीनच्या पानांचा रस आणि मध एकत्र करून सकाळी, दुपार आणि संध्याकाळी प्यावे, जंत आणि कृमी ४/५ दिवसात मरतात आणि बाहेर पडतात.

७) लहान मुलांमध्ये होणारी उलटी, जुलाब- पिकलेल्या डाळिंबाच्या फळाचा १ चमचा रस सकाळ, दुपार आणि संध्याकाळी गरम करून लहान मुलांना दिला तर निश्चितपणे उलट्या जुलाब थांबतात.

८) बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी – १ मोठ्या आकाराचा लिंबू कापून घ्या. रात्रभर तो अशा जागी ठेवा जिथं दव पडेल.त्यानंतर सकाळी ते लिंबू एका ग्लास साखरेच्या पाण्यात पिळून त्यात किंचित काळं मीठ टाकून सेवन केल्यानं बद्धकोष्ठता दूर होते.

९) त्वचा आगीने भाजणे – कच्चा बटाटा बारीक करून त्याचा रस काढून तो रस जळलेल्या जागेवर लावल्यानं आराम मिळतो. याशिवाय चिंचेची साल जाळून त्याचं बारीक चूर्ण करून ते चूर्ण गाईच्या तुपात मिसळून जळलेल्या जागेवर लावलं तरी आराम मिळतो.

१०) कानात मुरुमं – मोहरीच्या तेलात लसूण शिजवून, त्या तेलाचे २ थेंब सकाळ, दुपार, संध्याकाळ कानात टाकल्याने कानातले मुरुम गळतात किंवा बरे होतात आणि वेदना कमी होतात.

११) डांग्या खोकला – तुरटी तव्यावर भाजून बारीक वाटून घ्या. त्यानंतर तुरटीचे ३ भाग घेऊन तेव्हढीच साखर त्यात मिसळून सकाळ, दुपार, संध्याकाळ घेतलं तर डांग्या खोकला बरा होतो.

१२) लघवीची जळजळ – ताजी कारली बारीक चिरून हाताने नीट चोळून कारल्याचं पाणी स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात गोळा करा. त्या रसाची ५० ग्रॅमची मात्रा करून ते तीन वेळा प्यावे (सकाळी, दुपार आणि संध्याकाळ), जळजळ आणि लघवीचा कडकपणा नाहीसा होतो.

१३) शरीरावरचे फोड – कडुनिंबाची मऊ पाने बारीक करून गाईच्या तुपात शिजवून फोडांवर हलक्या कपड्याच्या साहाय्याने बांधून ठेवली तर गंभीर आणि जुने असाध्य फोडही बरे होतात.

१४) डोकेदुखी- सुंठ बारीक वाटून शुध्द शेळीच्या दुधात मिसळून नाकातून वारंवार ओढल्याने सर्व प्रकारच्या डोकेदुखीत आराम मिळतो.

१५) लघवीमध्ये साखर – वाळलेल्या जांभळाच्या बीचा बारीक तुकडा टाकून कापडाने गाळून अठ्ठावीस दिवस (सकाळी, दुपार आणि संध्याकाळ) पाण्यासोबत घ्यावा, लघवीसोबत साखर येणे बंद होते. याशिवाय २ ताज्या कारल्याचा रस नियमितपणे पिणे देखील या रोगात फायदेशीर आहे.

१६) मेंदूचा अशक्तपणा – मेंदीच्या अठरा बिया बारीक करून शुद्ध मधासोबत दिवसातून ३ वेळा (सकाळी, दुपार आणि संध्याकाळ) घेतल्यामुळे मेंदूचा अशक्तपणा दूर होऊन स्मरणशक्ती चांगली राहते. त्यामुळे डोकेदुखीतही आराम मिळतो.

१७) अर्धशिशी – ३ भाग कापूर आणि मलयगिरी चंदन गुलाबपाण्यामध्ये (गुलाबपाण्याचे प्रमाण थोडं जास्त असावं) चोळून नाकातून ओढल्याने अर्धशिशी दुखण्यावर आराम मिळतो.

१८) रक्ताचे जुलाब – २ तोळे जांभळं ताज्या पाण्यात बारीक करून १ ग्लास सकाळी ४/५ दिवस प्यायल्याने रक्ताचे जुलाब थांबतात, त्यात साखर किंवा इतर कोणतेही पदार्थ टाकू नयेत.

१९) सर्दी – पाव कप गाईचे दुध गरम करून त्यात १२ दाणे काळी मिरी आणि १ तोळे साखर वाटून मिसळून रात्री झोपताना प्या. सर्दी ५ दिवसात पूर्णपणे बरी होईल किंवा १ तोळा साखर आणि ८ दाणे काळी मिरी ताज्या पाण्यात बारीक करून चहाप्रमाणे प्या आणि ५ दिवस अंघोळ करू नका.

२०) मंदाग्नी – लिंबाच्या रसात आल्याचे छोटे तुकडे टाका आणि त्यात थोडेसे मीठ मिसळून काचेच्या भांड्यात ठेवा. दररोज ५/६ तुकडे जेवताना घ्या, मंदाग्नी दूर होईल.

२१) पोटाचे विकार – ओवा,काळी मिरी आणि खडे मीठ एकत्र करून पावडर तयार करा. हे तिन्ही सम प्रमाणात असावेत. हे चूर्ण रात्री झोपताना गरम पाण्यासोबत नियमित सेवन केलं तर पोटाचे सर्व प्रकारचे आजार लवकर बरे होतात.

२२) लठ्ठपणा दूर करा – १ ग्लास पाण्यात १ लिंबाचा रस रोज रिकाम्या पोटी प्यायल्याने लठ्ठपणा दूर होतो. हे ३ महिने सतत केलं पाहिजे. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसात हा प्रयोग जास्त फायदेशीर ठरतो.

तर आजीबाईंच्या बटव्यातले हे घरगुती रामबाण उपाय तुम्हांला नक्कीच फायदेशीर ठरतील.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।