टाइप २ मधुमेह आणि अल्झायमर
अल्झायमर रोग हा डिमेंशियाचा असा एक प्रकार आहे जो ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधारण १५ लोकांमधील एका व्यक्तीला प्रभावित करतो. विस्मरण, भाषण समस्या यापासून सुरु होणार हा आजार मेंदू, मज्जातंतू आणि पेशींच्या हानीमुळे होतो.
टाइप २ मधुमेह म्हणजे रुग्णाचे शरीर इन्शुलिनचा योग्यप्रकारे वापर करत नाही. याला इन्शुलिन प्रतिरोध म्हणतात. सुरुवातीला, स्वादुपिंड अतिरिक्त इन्शुलिन तयार करण्याची क्षमता राखून ठेवते. पण कालांतराने हे टिकून राहू शकत नाही आणि आपल्या रक्तातील ग्लुकोजला सामान्य पातळीवर ठेवण्यासाठी पुरेशी इन्शुलिन तयार होऊ शकत नाही.
टाइप २ मधुमेहाचा उपचार करण्यासाठी तयार केलेले औषध अल्झायमरच्या उपचारासाठी वापरले जाऊ शकते, असे ऑल्बेनी युनिव्हर्सिटीच्या (Albany University New York) शास्त्रज्ञांनी काही अभ्यासाअंती सिद्ध केले आहे.
ब्रेन रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये अल्झायमरच्या रुग्णांमध्ये टाईप २ मधुमेहवर उपचार करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या औषधांचा वापर करून बराच सुधार होऊ शकतो.
लंडनस्थित लॅनकेस्टर विद्यापीठातील प्राध्यापक “ख्रिश्चन होल्स्कर” यांनी अल्झायमर रोगासारख्या जुन्या न्युरोडेजनरेटिव्ह डिसऑर्डरवरील उपचारासाठी नवीन टाईप २ मधुमेहातील औषधोपचाराचा कसा उपयोग होऊ शकतो याचा अभ्यास केला आहे.
अलझायमर रोग हा डेमेन्शियाचे सर्वात सामान्य कारण आहे आणि अल्झायमर सोसाइटीनुसार २०५१ पर्यंत या रुग्णांच्या संख्येत २० लाख लोकांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
जरी या औषधांचा अभ्यास आतापर्यंत उंदरांमध्येच आढळला आहे, तरी सध्या अस्तित्वात असलेल्या मधुमेहावरील औषधांच्या या अभ्यासांमुळे अलझायमर असलेल्या लोकांसाठी एक वरदान ठरणार आहे त्यामुळे हे काम अधिक विकसित होणे महत्वाचे आहे.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.