दूध ऊतू जाऊ नये म्हणून वापरा ह्या ६ सोप्या ट्रिक्स

दूध ऊतू जाऊ नये म्हणून वापरा ह्या ६ सोप्या ट्रिक्स
पाणी आणि दूध तापत ठेवल्यास पाणी उतू जात नाही, पण दूध मात्र उतू जाते याचे कारण काय?

 

मैत्रिणींनो, वारंवार दूध ऊतू जाऊन तुमचा ओटा, गॅसची शेगडी खराब होते का? दूध ऊतू जाण्यामुळे तुम्ही हैराण झाल्या आहात का?

मित्रांनो, दूध ओतू जाऊन गॅस, ओटा खराब झाला म्हणून तुम्हाला घरच्यांचा ओरडा खावा लागतो का?

असे असेल तर हा लेख तुमच्यासाठी एक मोठा रिलीफ आहे.

आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या ६ ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे ह्या समस्येवरचं उत्तर, हमखास तुम्हाला मिळेल.

आपण स्वयंपाकघरात काहीतरी काम करत असतो. एकीकडे गॅसवर दूध तापायला ठेवलेलं असतं. आता दूध तापत आलंय, एका मिनिटात गॅस बंद करायचाय अशी आपल्या मेंदूने नोंद पण घेतलेली असते.

पण तितक्यात काहीतरी कारणाने क्षणभरासाठी आपण वळतो आणि…. भसाभस दूध ऊतू जातं.

काय, ओळखीचा वाटतोय ना हा प्रसंग?  घराघरात नेहमीच घडणारी ही गोष्ट, घरातल्या गृहिणींना मात्र त्रस्त करते.

कारण दुध ओतू गेल्यानंतर ते दुधाचे भांडे, गॅसची शेगडी आणि ओटा स्वच्छ  करणे हे एक मोठेच काम होऊन बसते.

क्षणभरासाठी आपण दुधावरची नजर का हटवली ह्या पश्चातापाने गृहिणी अगदी दुःखी होऊन जातात.

परंतु असे होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही दूध ऊतू जाण्यापासून वाचवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या सोप्या ट्रिक्स आहेत त्या.

१.  दुधाच्या भांड्याच्या कडांना बटर लावा. 

दूध उतू जाऊ नये म्हणून करण्याची ही सर्वात सोपी ट्रिक आहे. ज्या पातेल्यात दूध काढायचे आहे त्या पातेल्याच्या कडांना आधी थोडेसे बटर (लोणी) लावून घ्या. त्यानंतर त्या पातेल्यात दूध ओतून ते तापायला ठेवा. दूध उकळून वर जरी आले तरी पातेल्याच्या कडांना असणाऱ्या बटर मुळे ते उतू जाणार नाही.

२.  दुधाच्या भांड्यावर लाकडी चमचा ठेवा. 

दूध ओतू न जाऊ देण्याची आणखी एक सोपी  आणि सुरक्षित ट्रेक म्हणजे  दुधाच्या भांड्यावर किंवा दुधाच्या भांड्यात एक लाकडी चमचा ठेवा.

असा चमचा ठेवल्यामुळे दूध उकळू लागले तरी ते भांड्यातून बाहेर येत नाही. अर्थात दूध अधून-मधून हलवणे आवश्यक आहे.

तसेच ते फार वेळ उकळत ठेवता कामा नये नाहीतर ते आटून जाण्याची शक्यता असते.

दुधाच्या भांड्यावर लाकडी चमचा ठेवा. 
दुधाच्या भांड्यावर लाकडी चमचा ठेवा.

३.  दुधावर किंचित गार पाणी शिंपडा. 

अचानक जर भरभर दूध उतू जाऊ लागले तर उतू जाणार्‍या दुधावर गार पाण्याचे काही थेंब शिंपडा. त्यामुळे वर आलेला दुधाचा फेस खाली बसेल आणि दूध उतू जाणार नाही. अर्थात ही ट्रीक करण्यासाठी पिण्याचे स्वच्छ आणि गार पाणी हाताशी असणे आवश्यक आहे.

४.  दूध तापवण्यासाठी नेहमीच स्टेनलेस स्टीलच्या भांड्याचा वापर करा. 

दूध तापवण्यासाठी नेहमीच स्टेनलेस स्टीलच्या जाड बुडाच्या पातेल्याचा अथवा भांड्याचा वापर करा. तसेच दूध तापवताना गॅसची फ्लेम  कमी ठेवा. असे करण्यामुळे दूध उतू जाणार नाही तसेच करपून भांड्याला खाली लागणार नाही.

५.  भांड्यात दूध काढण्या आधी त्यात थोडे पाणी घाला. 

दूध उतू जाणे रोखण्यासाठी करता येणारी ही आणखी एक सोपी ट्रिक आहे. ज्या पातेल्यात दूध काढायचे आहे त्या पातेल्यात आधी थोडे गार पाणी घाला. पाणी अगदी थोडे म्हणजे चमचा दोन चमचे इतकेच घालायचे आहे, अन्यथा दूध पातळ होईल.

पाणी घातल्यानंतर त्या पातेल्यात दूध काढून ते मंद आचेवर तापायला ठेवा. असे करण्यामुळे दूध उतू तर जाणार नाहीच शिवाय करपून खाली भांड्याला लागणार देखील नाही.

६. डबल बॉईलींग मेथड वापरा. 

डबल बॉईलींगची मेथड सहसा चॉकलेट किंवा बटर वितळवण्यासाठी वापरतात. दूध तापवण्यासाठी सुद्धा ही मेथड उपयोगी पडू शकते. डबल बॉईलींग करताना एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते तापण्यासाठी गॅस वर ठेवावे.

त्यानंतर लहान भांड्यात दूध घेऊन ते भांडे गरम पाण्यात ठेवावे.  जसजसे पाणी तापेल तसतसे दूध देखील तापेल. परंतु डबल बॉईलींग करत असल्यामुळे ते ओतू मात्र जाणार नाही.

तर मित्र मैत्रिणींनो, या आहेत अगदी सोप्या सहा ट्रिक्स. यांचा वापर करून तुम्ही दूध उतू जाण्यापासून वाचवू शकता.

पुरुष मित्रांनो, या पद्धतीने दूध तापवले तर गॅस, ओटा खराब झाला याबद्दल जी बोलणी बसतात त्यापासून तुमची नक्कीच सुटका होऊ शकेल.

म्हणूनच या उपायांचा नक्की वापर करा, तुमचे याबाबतचे अनुभव आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या आणखी मित्र-मैत्रिणींना या ट्रिक्सचा उपयोग व्हावा यासाठी हा लेख नक्की शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।