सर, मी एक तेहतीस वर्षाचा विवाहीत तरुण आहे, लग्न झाले आहे, मुले आहेत, मोठा परिवार आहे.
घरच्या अडचणींमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले, नौकरी करतो, जेमतेम पगार आहे, कसाबसा खर्च भागतो.
मला ह्या दारिद्रातुन बाहेर पडायचे आहे, खुप आनंदी आयुष्य जगायचे आहे, लिहण्याचा छंद जपायचा आहे.
गरजुंना मदत करुन त्यांच्या चेहर्यावर हास्य फुलवायचे आहे.
तुम्ही म्हणता की लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरुन सगळे काही शक्य आहे.
एवढ्या अडचणीत माझी स्वप्ने पुर्ण करणे मला कसे शक्य होईल, सर?
XXX जी, मनमोकळेपणाने आपला प्रश्न शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
खरं तर प्रत्येकच व्यक्तीला वाटत असतं की आपलं आयुष्य सुखाचं असावं, प्रत्येकाचीच ऐषोआरामात जगण्याची स्वप्ने असतात.
बहुतांश लोकांना हे जमत नाही!
फक्त जगातल्या काही मोजक्याच लोकांना हे साध्य करणं शक्य होतं.
ते लोक असं काय करतात, जे आपण केलं तर आपणही आपली स्वप्नातली लाईफ जगु शकु?
झटपट यशाची शिडी चढुन जाणारे लोक, भविष्याचा वेध घेतात.
बरोब्बर पाच वर्षाखाली मी प्रचंड मानसिक, आर्थिक आणि शारिरीक तणावातुन जात होतो, अक्षरशः आयुष्यालाच कंटाळुन गेलो होतो.
कुठुनतरी ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ चे भुत माझ्या डोक्यात घुसले.
आज तुम्हाला वाटत आहे, अगदी तसचं मलाही स्वतःचे आयुष्य बदलण्याची खुप खुप तीव्र इच्छा झाली.
त्यावेळी मी माझ्या स्वप्नातल्या आयुष्याची एक कल्पना केली, पाच वर्षांनंतर मी कुठे असेन? माझे आयुष्य कसे असेल, हे बारीकसारीक तपशीलासह लिहुन काढले, मनोमन ठरवले, आणि तेव्हा कल्पना केलेल्या नव्वद टक्के उद्दिष्टांना आज मी साध्य केले आहे.
म्हणजे एक प्रकारे आज मी माझी ड्रिम लाईफच जगत आहे.
स्वप्न पुर्ण करण्यासाठी उपयुक्त असा रोडमॅप मी आज तुमच्यासमोर ठेवत आहे, त्याचा तुम्हालाही निश्चित फायदा होईल.
शेअरबाजारामध्ये खुप मोठा लॉस झाल्यावर माझ्यावर खुप मोठे कर्ज झाले होते, आगीतुन फुफाट्यात असल्याप्रमाणे दिवसेंदिवस अडचणी वाढतच होत्या.
पण मी स्वतःला सावरले, स्वतःलाच धीर दिला, खचुन गेलो नाही, तर पुन्हा कंबर कसुन उभा राहीलो. एकेक आघात होतच होता, पण हातपाय गाळुन थंड बसलो नाही तर मी आयुष्यालाच आव्हान दिले.
आता मुळुमुळु रडत बसायचे नाही, आता जे होईल त्याला निर्भयपणे सामोरे जायचे ठरवले, एका हिमतीने पाय रोवुन उभा ठाकलो आणि आश्चर्य!!! मी फक्त हिंमतवान असल्याचे नाटक केले आणि समोरची सगळी संकटेच गायब झाली, फक्त आणि फक्त संधीच दिसु लागल्या.
एके ठिकाणी पीटर ड्रकरने म्हण्टले आहे, यशस्वी व्हायची इच्छा असणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी, येणार्या पाच वर्षात आपण कुठे असु, हे ठरवणे खुप अत्यावश्यक आहे, पण दुर्दैवाने खुपच कमी आणि मोजके लोक आपल्यासमोर ते स्पष्टपणे मांडतात, आणि बहुतेक करुन हेच लोक इतिहास घडवतात.
कुठेतरी वाचले आणि डोक्यात फिट्ट बसले.
आणि पुढच्या पाच वर्षात साध्य करण्याचे डोळ्यासमोर तीन प्रकारचे उद्दीष्ट्य ठेवले.
१) व्यवसाय आणि कारकिर्द
हे काही महत्वाचे प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवेत!
पुढच्या पाच वर्षानंतर म्हणजे २०२४ मध्ये आपली कारकिर्द कुठे पोहचली असेल?
मी आता करतो, तेच काम आणखी पाच वर्षांनी करण्यात मला स्वारस्य आहे का माझ्या आवडीचे काम अजुन काही वेगळेच आहे?
पाच वर्षानंतरची तुमची आर्थिक उत्पन्नाची स्थिती काय असावी असे तुम्हाला वाटते? ते लिहा.
आणि त्यासोबतच तुमच्या आदर्श मुक्कामी पोहचण्यासाठी आता इथे वर्तमानकाळात कोणकोणती पावले उचलावी लागतील, ते ही लिहुन काढा.
आता फक्त पहिली पायरी टाका, संपुर्ण जिना दिसला नाही तरी पहीली पायरी चढा, पहिली चढली की दुसरी पायरी आपोआप दिसते, मग तिसरी मग चौथी आणि मग संपुर्ण ध्येय आवाक्यात आलेलं दिसु लागतं!
ह्या सगळ्याचं श्रेय भीती वाटत असतानाही पहिली पायरी टाकण्यामध्येच आहे.
एकदा मोठी संपत्ती कमवण्याचा ध्यास मनाशी बाळगला तर व्यक्तिगत आयुष्यामध्ये मोठा त्याग करावा लागतो, पण ध्येयाप्रति समर्पित असणार्यांना त्याचे शल्य वाटत नाही.
ह्या मार्गावर प्रचंड इच्छाशक्ती आणि मनाचा निर्धार तुम्हाला साथ देईल.
एकदा का पाच वर्षांपुढचे ठाम ध्येय मनात ठेऊन वाटचाल सुरु केली की मागच्या एका वर्षात मिळवले होते, तेवढे पैसे तुम्ही काही महिन्यात मिळवल्याचे अनुभवाल!
२) कुटुंब आणि नाती
पाच वर्षांनंतर आपले कुटुंब आणि आपल्या त्यांच्या नातेसंबंध कसे असतील याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का?
जर तुम्ही विवाहीत असाल तर एका जागी शांत बसुन विचार करा की कशा प्रकारची जीवनशैली, कशा प्रकारचे घर तुम्हाला हवे आहे?
सुट्टीत तुम्ही कुठे फिरायला जाता?
तुमच्या प्रिय कुटुंबाने कशा प्रकारचे आयुष्य जगावे, असे तुम्हाला वाटते?
आता पुन्हा भविष्यातुन वर्तमानात या आणि आणि “हा स्वप्नवत घटनाक्रम माझ्या आयुष्यात येण्यासाठी मी आजपासुन काय करु?” हा प्रश्न स्वतःला विचारा.
आपोआपच काही काळानंतर मनातले आदर्श आयुष्य तुमच्या वाट्याला येईल.
३) उत्कृष्ट शारिरीक आरोग्य
आता स्वतःचे आरोग्य आणि धडधाकटपणा यांचा विचार करा, भविष्यात तुमचे आरोग्य, तुमचे व्यक्तिमत्व कसे असावे, असे तुम्हाला वाटते?
आज आहात त्यापेक्षा अधिक देखणे, अधिक आकर्षक आणि अधिक निरोगी झाल्यावरचे तुमचे रुप स्वतःच्या डोळ्यासमोर आणा.
आता वर्तमानकाळात येऊन काही प्रश्न स्वतःला विचारा, आपले स्वप्नातले आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी तुम्ही कसा आहार घ्यायला हवा? कोणत्या प्रकारचे शारिरीक व्यायाम कराल?
आजपासुन तात्काळ पहिले पाऊल टाका.
कन्फुशिअस म्हणतो, त्याप्रमाणे हजारो मैलाचा प्रवास एका पावलानेच सुरु होतो.
४) स्वतःवर विश्वास ठेवुन पहिली पायरी चढा, ध्येय गाठेपर्यंत चालत राहा.
आर्थिक स्वातंत्र मिळवणे, सुखसमाधानाने जगणे, ही सर्वांचीच इच्छा असते, ते मिळवण्यासाठी स्वतःला विचारा, आर्थिक आवक शुन्य असताना, दर महिन्याला किती रुपये तुम्हाला हवे आहेत?
आता विचार करा, तुम्हाला तुमच्या स्वप्नातल्या राहणीमानासाठी दर महिना किती रुपये आवश्यक आहेत?
एका सर्व्हेनुसार सत्तर टक्के लोकांना आपला एका महिन्याचा नेमका खर्च माहित नसतो. थोडा गृहपाठ करुन तो माहित करुन घ्या.
आता पहिले पाऊल टाका, आर्थिक स्वातंत्र मिळवण्यासाठी बॅंकेमध्ये एक खाते उघडा. पगारीच्या पंधरा ते वीस टक्के रक्कम हा खात्यात नियमित पैसे भरा, आणि काहीही, अगदी काहीही झाले तरी त्या खात्याला हात लावु नका.
ह्या रकमेची गुंतवणुक, काही वर्षांनी, तुम्हाला चक्रवाढ दराने आश्चर्यचकित करणारे रिटर्न देईल.
अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी तुमच्यावर आलेला दबाव तुम्हाला पैसे कमवण्याच्या नवनव्या क्लृप्त्या भेट म्हणुन देत राहील, आणि सातत्याने केलेली बचत, ठरवलेल्या कालावधीच्या आधीच तुमचे लक्ष्य गाठण्यात तुमची मदत करेल.
स्वतःला शिस्त लावा, स्वतःच स्वतःचे ताबेदार व्हा, स्वतःवर नियंत्रण ठेवा.
ठामपणे निर्णय घ्या, आणि तात्काळ कृती करा.
तुम्ही कुठेही असा, जीवनाच्या कोणत्याही समस्येने त्रस्त असा.
तुम्हाला फक्त तुमच्या आयुष्यात आणखी काय-काय हवे, ते ठरवायचे आहे, आणि त्या दिशेने पाऊल टाकायचे आहे.
आणि आपल्या ड्रिम लाईफची पहिली पायरी तुम्हाला नेहमी दिसतच असते, हो ना!!!
हा लेख वाचणार्या प्रत्येक व्यक्तीची सारी स्वप्ने पुर्ण होवो, ही मनःपुर्वक प्रार्थना.
खुप शुभेच्छा, धन्यवाद आणि मनःपुर्वक आभार!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Spirit full article sir