संपूर्ण भारतात विविध कारणांनी नारळाचे तेल लोकप्रिय आहे. ते खाद्यतेल म्हणून वापरले जाते, सहजपणे उपलब्ध होते आणि त्याचे अनेकानेक उपयोग आहेत.
आपल्या संस्कृतीत सण, उत्सवांची रेलचेल असतेच. ओलं नारळ प्रत्येक उत्सवात मानाचं स्थान घेऊन असतंच असतं. या ओल्या नारळापासून Coconut Oil खोबरेल तेल कसे बनवता येते त्याची कृती आज आपण बघू.
ओल्या नारळापासून Coconut Oil खोबरेल तेल बनवण्याची कृती…
ओले नारळ अर्ध्या अर्ध्या भागात फोडून घ्यावेत.
फोडलेल्या नारळाचा बारीक खव करून घ्यावा.
खवलेले नारळ मिक्सर ग्राइंडर मधून बारीक करून घ्यावे. गरजेपुरते पाणी घालावे.
मिक्सर ग्राइंडर मधून काढलेले नारळाचे दूध गाळणीतून तसेच कापडातून गाळून घ्यावे.
गाळून घेतलेले नारळाचे दूध एक रात्रभर भांड्यामध्ये ठेवावे. आणि सकाळी चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यावर जमलेले लोणी चमच्याने काढावे.
आपण गाईचे किंवा म्हशीचे तूप बनवताना लोणी जसे कढवतो तसे हे कोकोनट बटर बारीक आचेवर कढवावे.
तळाशी बेरी जमा होऊन खोबरेल तेल तयार होईल.
हे आहे तयार होणारे Coconut Oil खोबरेल तेल
खोबरेलतेलाचे हे २० उपयोग तुम्हाला माहित आहेत का?
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.