नोकरीच्या ठिकाणी पगारवाढीसाठीचे बोलणे कसे करावे? वाचा या लेखात

दोन-तीन वर्षांपूर्वीची एक बातमी होती, पगारवाढ मिळावी म्हणून अजय पासवान नावाचा एक तरुण वरळी येथिल दूरदर्शनच्या टॉवरवर चढला, आणि ‘मीडियाला बोलवा तेव्हाच खाली येईल’ असा हेका धरून बसला.

त्याचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी, दूरदर्शनच्या कार्यालयातून कॅमेरे आणि माईक सुद्धा मागवले

पुढे चार तासांच्या प्रयत्नानंतर त्याला खाली आणण्यात यश आले.

पण अर्थातच पगारवाढ मिळाली नाही. तर मित्रांनो, पगारवाढ मिळवण्याचे प्रयत्न करताना आततायीपणा न करता संयमाने काही विशेष गोष्टी कराव्या लागतात. त्या कोणत्या ते वाचा या लेखात. 

दिवसेंदिवस वाढत्या महागाईने हल्ली सगळेच बेजार झालेले आहेत

कितीही काटकसरीने राहून पहा, अगदी गरजेचे खर्च करायचं म्हंटल तरी खर्चाचा आणि मिळकतीचा ताळमेळ बसवणं म्हणजे तारेवरची कसरत होऊन जाते.

अशा वेळी कमाईचे स्रोत वाढवावे हा एक मार्ग असतो, पण तो बरेच जणांना कठीण वाटतो.

याशिवाय दुसरा मार्ग म्हणजे, पगारवाढीसाठी प्रयत्न…

पगार वाढवून घेण्यासाठी चर्चा करणे तसे इतके सोपे सुध्दा नसते.

पगारवाढीसाठी चर्चा करण्याचे दोन प्रसंग असू शकतात. यातील एक म्हणजे तुम्ही काम करता तिथेच, तुमच्या बॉसकडे पगारवाढीसाठी बोलणे किंवा नवीन जॉब ऑफर स्वीकारताना मॅनेजमेंट बरोबर चांगला पगार ठरवण्यासाठी चर्चा करणे.

हे कठीण जरी असले तरी अशक्य नाही.

जशी आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे की, बाळ रडलं तर आईला समजतं की त्याला भूक लागली आहे. तसंच काहीसं पगारवाढीचं सुद्धा आहे. फक्त, इथे तुम्हाला तुमच्या अडचणी आणि गरजांचं रडगाणं न गाता तुमची व्हॅल्यू योग्य पध्दतीने मांडून सांगता आली पाहिजे.

पगारासंदर्भात चर्चा कशी करावी

१) माहिती एकत्रित करा:

सर्वात आधी पूर्ण वर्षभरात कम्पनीच्या कामात तुमच्या काँट्रिब्युशन बद्दल एक अहवाल तयार करा.

काँट्रिब्युशन तुमच्या प्रोफाइल नुसार बदलू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही पूर्ण केलेले सेल्स टार्गेट, एखादे महत्त्वाचे प्रोजेक्ट यशस्वीरित्त्या पूर्ण करणे किंवा एखादे अतिरिक्त जवाबदारीचे काम तुम्ही पूर्ण केलेले असेल किंवा कम्पनीच्या उत्पादनात कॉस्ट कमी करायला तुम्ही मदत केली असेल वगैरे….

अशा गोष्टी जर तुम्ही मुद्देसूद मॅनेजमेंट समोर ठेऊ शकलात तर फक्त नजीकच्या काळात घडलेल्या घटनांवर मॅनेजमेंट निर्णय घेणार नाही. तुमच्या बद्दलचे सकारात्मक मुद्दे तुम्हाला समोर आणता येतील.

२) आपली किंमत ओळखा:

नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या कौशल्याचा पगार मिळतो. या गोष्टीची माहिती घ्या, की तुमच्यासारखे कैशल्य असल्यास, बाहेर इतर ठिकाणी किती सॅलरी मिळते.

तुमचा अनुभव आणि तुमचे स्किल्स बघता, बाहेर इतर ठिकाणी काय संधी आहेत?

रिक्रूरमेन्ट कन्सल्टंट कडे जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर ते किती पगार ऑफर करणाऱ्या संस्था तुम्हाला सुचवतात, वगैरे गोष्टींचा अंदाज घ्या.

३) कम्पनीची गरज समजून घ्या:

या कोरोना काळात कर्मचाऱ्यांना जसे कठीण परिस्थितीला समोरे जावे लागले, तसेच काहीसे कम्पन्यांच्या बद्दल सुद्धा झालेले आहे.

कम्पनीची कामाची गरज समजून तशी तुमची तयारी दाखवली, तर तुम्हाला तुमच्या गरजा सुद्धा बॉस किंवा कम्पनी प्रशासनाकडे मांडता येतील.

४) आपल्यावरील तणाव कमी करा :

पगारवाढीसाठी चर्चा हे आणि यासारखी कामे ही आपण तणावात असताना योग्य पध्दतीने करू शकत नाही.

मुळात तणावात असताना, जे पदरात पडेल ते घेण्याकडे माणसाचा कल असतो.

आणि या वेळेस संयमाने तुम्हाला तुमची योग्य किंमत पटवून द्यायची असते. त्यामुळे परिस्थिती चा तणाव तुमच्यावर येणार नाही याची काळजी घ्या. कारण ही वेळ वर्ष-दोन वर्षांतुन एकदाच तुम्हाला मिळणार आहे.

५) योग्य वेळ बघून चर्चा करा:

ही चर्चा करण्यासाठी योग्य वेळ हेरणं हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

कम्पनी मध्ये कॉस्ट कटिंग चा विचार चालू आहे किंवा एखाद्या कामाची डेडलाईन जवळ आली आहे यासारखी क्रिटिकल वेळ पगारवाढीच्या चर्चेसाठी निवडू नका.

६) फक्त सॅलरीचाच विचार न करता इतर गोष्टी स्वीकारण्याची सुद्धा तयारी ठेवा:

कधी कधी चर्चेतून पगारवाढ शक्य नसल्याचा निष्कर्ष निघू शकतो.

अशा वेळी आपली योग्यता पटवून देऊन बोनस किंवा कमिशन यासारख्या दुसऱ्या बेनिफिट्सचे पर्याय सुद्धा तुम्ही सुचवू शकता.

मित्रांनो, याप्रमाणे प्रयत्न करून बघा, तुम्हाला तुमची इच्छित पगारवाढ मिळो या शुभेच्छेसह, धन्यवाद.

मनाचे श्लोक

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।