आपले आधार कार्ड मोबाईल नंबर बरोबर अपडेट कसे करावे

आधार बरोबर जोडल्या गेलेल्या वेगवेगळ्या सेवा ऑनलाइन मिळवण्यासाठी आधार आणि मोबाईल नंबर जोडलेले असणं हे गरजेचं आहे.

हा नंबर जोडलेला असण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की, कुठलीही सेवा घेताना या मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड पाठवला जातो.

बरेचदा असंही होतं की आधार ला दिलेला मोबाईल नंबर तुम्ही विसरता. किंवा मोबाइल नंबर बदलल्याने वॅरिफिकेशन कोड मिळवणं शक्य होत नाही.

बऱ्याचशा सरकारी कामांमध्ये आधार बेस्ड ओ. टी. पी. मोबाईल वर येण्याची गरज असते.

यु. आय. डी. ए. आय च्या डेटाबेस मध्ये तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे का आणि तो रजिस्टर कसा करावा ते आता समजून घ्या.

स्टेप १: सर्वात आधी www.uidai.gov.in या वेबसाईटवर जा

स्टेप २: ‘माय आधार’ या टॅब वर क्लिक करून ‘वॅरीफाय इ मेल/मोबाईल नंबर’ सिलेक्ट करा
आपले आधार कार्ड मोबाईल नंबर बरोबर अपडेट कसे करावे

स्टेप ३: यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. इथे तुमचा आधार नंबर आणि तुम्हाला वॅरीफाय करायचा असेल तो नंबर किंवा ईमेल आय डी टाका.
आपले आधार कार्ड मोबाईल नंबर बरोबर अपडेट कसे करावे

स्टेप ४: यानंतर कॅपच कोड टाकून ‘सेंड OTP’ वर क्लिक करा.

जर तुम्ही दिलेला मोबाईल नंबर UIDAI च्या डेटाबेस मध्ये असलेल्या मोबाईल नंबर बरोबर जुळत असेल तर तुमचा मोबाईल नंबर डेटाबेस मध्ये रजिस्टर असल्याचा मेसेज येईल आणि तसे नसल्यास मोबाईल नंबर रजिस्टर नसल्याचा मेसेज स्क्रीनवर येईल.

मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी काय करावे

जर तुमचा मोबाईल नंबर UIDIA च्या रेकॉर्ड बरोबर मॅच करत नसेल मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर भेट द्यावी लागेल. लक्षात घ्या आधार मोबाईल नम्बर बरोबर लिंक करण्याचे काम ऑनलाईन होत नाही.

घरच्या घरी आधार कार्ड पॅन नम्बरशी लिंक करण्याची सोपी पद्धत

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।