काचांवर स्क्रॅचेस पडले म्हणून चष्मा बदलताय!!
थांबा, तुम्ही ह्या उपायांनी सहज घालवू शकाल चष्म्याच्या काचांवरील स्क्रॅचेस.
आपण कितीही जपून हाताळला तरी चष्म्याच्या काचांवर स्क्रॅचेस (ओरखडे) पडतातच. पण त्यामुळे वैतागून एकदम नवीन चष्मा घेण्याची गरज नाही.
खाली दिलेल्या सोप्या उपायांचा वापर करून आपण ते ओरखडे घालवू शकतो.
चष्म्याच्या काचांवरील स्क्रॅचेस घालवण्याचे उपाय
1) घरातली टुथपेस्ट एक मऊ कपड्यावर घेऊन चष्म्यावर जिथे ओरखडे आहेत तिथे ती हळूहळू लावून हलकेच घासा.
काही वेळानंतर ओरखडे पुसट झालेले दिसतील.
2) थोडा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून तो काचेवरील ओरखड्याना लावा. काही वेळानंतर ओरखडे दिसणार नाहीत.
3) विंडशीट वॉटर रीपेलंट जे कार च्या काचा साफ करण्यासाठी वापरले जाते त्याचा उपयोग चष्म्याच्या काचा साफ करण्यासाठी होऊ शकतो.
4) चष्मा काही वेळासाठी फ्रीजर मध्ये ठेवा. त्यामुळे काचांवर बर्फ जमा होईल आणि नंतर हळूहळू तो बर्फ काढा, ओरखडे दिसेनासे होतील.
हे आहेत चष्म्याच्या काचांवरील स्क्रॅचेस वरचे सोपे उपाय. तुम्ही देखील करून पहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.