वीज हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग बनलेला आहे. पण विजेची बचत कशी करावी? सध्या तर लॉक डाऊन मुळे, पुढे पाठवले गेलेले बील भरावे की न भरावे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे….
विजेचे प्रति युनिट रेट वाढले, लॉकडाऊन मध्ये तुम्ही सगळे घरातच बसून होते, अशी वेगवेगळी करणं आणि समजावून सांगितले गेलेले कलक्युलेशन हे पाहून, काहीही झालं तरी जनतेचं ऐकायला कोणी तयार नसतं, असा विचार करून शेवटी बील भरून मोकळं व्हावं, या विचारपर्यंत बरेच जण पोहोचले आहेत.
अशा वेळी आपल्या समोर एकच मार्ग राहतो, तो म्हणजे विजेची बचत करणे.
या लेखात अशा काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांचा वापर करून, वीज वाचवून वीज बिल कमी करणे शक्य होईल.
१) LED बल्ब चा वापर करा: तुमच्या घरात जर जुने बल्ब किंवा CFL लावलेले असतील तर LED बल्ब वापरायला सुरुवात करा.
10 W च्या CFL च्या जागी 3 W चा LED बल्ब लावला तर तो त्यापेक्षा सुद्धा जास्त प्रकाश देतो.
जर एखाद्या रूममध्ये 40 W चा CFL तुम्ही लावत असाल तर तिथे फक्त 12 W चा LED बल्ब त्यापेक्षा जास्त प्रकाश देऊन म्हणजे, उजेड पाडून वीज बिल कमी करण्यात महत्त्वाचा वाटा उचलेल.
२) 5 स्टार रेटिंग ची उपकरणे खरेदी करा: तुम्ही जेव्हा फ्रीज, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन अशी उपकरणे खरेदी करतात तेव्हा त्याची साईझ, रंग किंवा किती लिटरचा आहे अशी फीचर्स बघण्या बरोबरच त्याची पावर रेटिंग काय आहे? हेही बघा.
5 स्टार रेटिंग असलेली उपकरणे महाग असतात पण त्याने विजेची भरपूर बचत होऊ शकते.
3) AC 25° वर सेट करून ठेवा: जर तुमच्या घरात पण उन्हाळ्याच्या दिवसात AC वापरला जात असेल तर AC मुळे तुमचे वीज बिल मोठ्या प्रमाणात वाढल्याचे तुम्ही बघत असाल.
अशा वेळी टेम्परेचर कमीतकमी न ठेवता ते 25℃ च्या आसपास ठेवा. या तपमानात जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही असे प्लेझंट वातावरण राहू शकते. खोली लवकर थंड होऊ शकते.
साधारण 25 ℃ तापमानावर ऑटोमॅटिकली चालू आणि बंद होऊ शकेल अशी सेटिंग केली तर वीज बिल आटोक्यात आणणे सोपे होऊ शकेल.
4) एक्सटेन्शन बोर्ड कसा असावा?
एका सॉकेट वर जास्त उपकरणे लावण्यासाठी किंवा उपकरण सॉकेटपेक्षा जास्त अंतरावर असेल तर आपण एक्सटेन्शन बोर्ड वापरतो.
पण एक्सटेन्शन बोर्ड घेताना एकाच स्विच वर वेगवेगळे सॉकेट चालू होतील असा बोर्ड घेणे टाळावे.
बाजारातून एक्सटेन्शन बोर्ड घेताना एका स्विचवर एक सॉकेट चालेल असा बोर्ड निवडावा. ज्यामुळे जे उपकरण उपयोगात असेल त्याच सॉकेट मध्ये वीज चालू राहील.
5) सोलार पॅनल चा वापर करा: सोलार पॅनल चा वापर केला तर विजेची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. तुम्ही जर इन्व्हर्टर वापरत असाल तर MPPT सोलर चार्ज कंट्रोलर वापरून बॅटरी चार्ज करणे शक्य होईल.
एवढेच नाही तर साध्या इन्व्हर्टर ला सोलर इन्व्हर्टर मध्ये बदलून नॉन-कन्व्हेन्शनल एनर्जी चा वापर सुद्धा काही लोक करतात.
याशिवाय गरज नसताना विजेची उपकरणे बंद करणे हा सर्वात महत्त्वाचा आणि आपल्या हातात असलेला उपाय तर आहेच!
आणि या दिवसात विजेचे अवाढव्य बिल येऊ नये म्हणून एक गोष्ट न चुकता करायची. ती म्हणजे आपल्या अँड्रॉइड मोबाईल च्या ऍप वरून स्वतः च वीज कम्पनीला ठराविक वेळी मीटर चे रिडींग पाठवून द्यायचे म्हणजे सरासरी म्हंटले जाणारे पण अंदाजे लावलेले मीटर रिडींग ग्राह्य धरून त्यानुसार बिल भरण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.
वीज बिल वाचवणारे काही उपाय तुम्हीही करत असाल तर कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या मित्रांना माहिती उपयोगी पडेल असे वाटत असेल तर दिलेल्या पर्यायांचा वापर करून लेख शेअर करायला विसरू नका….
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
त्या पेक्षा हरियाणा सरकार जी गोष्ट राबवत आहे,म्हणजेच मनोहर योजना,घरा घरात सोलर पॅनल लावून स्वतः विज वापरत आहे ,त्या साठी जर राज्य सरकार काही कराल तर त्याचा फायदा नक्कीच होईल…