कसे शोधायचे छुपे कॅमेरे? जाणून घ्या आणि सुरक्षित रहा 

काही दिवसांपूर्वी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या रेसिडेंट डॉक्टर महिलेच्या खोलीत आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे बसवण्याची घटना उघडकीला आली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली.

सदर महिलेच्या खोलीत मोबाईल चार्जरमध्ये आणि बाथरूममध्ये बल्बमध्ये कॅमेरे लपवून ठेवले होते.

अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे.

सदर घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

छुप्या कॅमेऱ्याचा सर्वात जास्त धोका हॉटेलची खोली, मॉल किंवा दुकानातील ट्रायल रूम किंवा कुठल्याही चेंजिंग रूम आणि बाथरूम इथे सर्वात जास्त असतो.

अशा ठिकाणी कॅमेरे लावून महिला, मुली किंवा लहान मुलांचे छुपे चित्रीकरण करून त्याचा गैरवापर केला जातो.

अशा प्रकारचे कॅमेरे लावून चित्रीकरण करून ते वेबसाइटवर प्रसारित करणे किंवा सदर चित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणे, हे चित्रीकरण दाखवून इतर प्रकारे ब्लॅकमेल करणे हे प्रकार केले जातात.

त्यामुळे मुली व महिलांनी ह्याबाबतीत सतर्क राहणे अतिशय आवश्यक आहे.

आपण कोठेही अशा जागा वापरत असू तर तेथे छुपे कॅमेरे नाहीत ह्याची खात्री करून घ्यायला हवी.

हॉटेलच्या खोलीत किंवा बाथरूम, चेंजींग रूममध्ये छुपे कॅमेरे आहेत का हे कसे ओळखायचे ते आपण आज पाहूया.

१. सर्व परिसर नीट तपासा 

आपण जिथे राहणार, वावरणार किंवा कपडे बदलणार आहोत तो सर्व परिसर नीट तपासा. छुपे कॅमेरे बसवण्याच्या जागा सर्वसाधारणपणे ह्या असतात.

  • भिंतीवरील चित्रे, घडयाळ इ.
  • ईलेक्ट्रिकल सॉकेट
  • दिवे
  • आरसे
  • टिशू पेपरचे बॉक्स
  • स्मोक डिटेक्टर्स
  • बाथरूममधील नळ, शॉवर

ह्या सर्व आणि इतरही जागांची नीट तपासणी करा.

२. चमकणाऱ्या एलईडी लाइटचा शोध घ्या 

छुपे कॅमेरे शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खोलीत अंधार करणे. बहुतेक सर्व छुप्या कॅमेऱ्याना चमकणारे एलईडी लाइट असतातच जे अंधार केल्यावर लुकलुकताना दिसून येतात. म्हणून खोलीतील दिवे घालवून खोलीची नीट तपासणी करावी.

३. मोबाईल फोनचा वापर करा 

छुपे कॅमेरे नेहेमी मोबाईलच्या नेटवर्कला अडथळा आणतात. खरखर किंवा तत्सम आवाज ऐकू येऊ लागतो. त्यामुळे मुद्दाम मोबाईलवरुन कॉल करून खोलीत सगळीकडे फिरा. जिथे नेटवर्कला प्रॉब्लेम येईल तिथे थांबून बारकाईने तपासणी करा. तेथे छुपा कॅमेरा असू शकतो.

४. फ्लॅश लाइटचा वापर करा 

खोलीत सर्वत्र अंधार करून मोबाईलचा फ्लॅश लाइट किंवा एखादा टॉर्च ऑन करा. जर त्या प्रकाशात आणखी काही परावर्तित प्रकाश दिसला तर नक्कीच तेथे छुपा कॅमेरा असू शकतो. बारकाईने तपासणी करा.

५. आरशाची बारकाईने तपासणी करा 

छुपा कॅमेरा बसवण्याचे सर्वात सोपे स्थान म्हणजे आरसा. त्यामागे कॅमेरा लपवणे सोपे देखील आहे आणि त्यामुळे चित्रीकरण करण्याचा हेतु देखील साध्य होतो. परंतु असे होऊ देऊ नका. त्यासाठी आपल्यासमोर असणाऱ्या आरशाची बारकाईने तपासणी करा.

१. त्यासाठी आपल्या हाताचा पंजा आरशावर ठेवा.

२. जर तुमच्या हाताच्या बोटांमध्ये आणि त्यांच्या प्रतिबिंबामध्ये गॅप दिसत असेल तर तुम्ही सुरक्षित आहात. परंतु जर गॅप नसेल तर मात्र तेथे नक्कीच छुपा कॅमेरा आहे. ह्या गोष्टीची ताबडतोब दखल घ्या.

छुप्या कॅमेऱ्याचा शोध कसा घ्याल

तुम्हाला जर कुठे छुपे कॅमेरे आढळले तर काय करावे ?

जर तुम्हाला कुठेही छुपे कॅमेरे आढळले तर एकदम घाबरून न जाता शांतपणाने परिस्थिति हाताळा.

त्या कॅमेऱ्याला स्वतः हात न लावता हॉटेलचे व्यवस्थापन अथवा पोलिस ह्यांना ह्या गोष्टीची कल्पना द्या. ते कॅमेरे त्यांना हाताळू द्या.

तसेच पोलिसांवर पुढील कारवाई सोपवा.

अशा कॅमेऱ्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खोलीत किंवा बाथरूममध्ये प्रवेश केल्यावर सुरुवातीलाच कॅमेरे आहेत का ह्याची वर दिलेल्या पद्धतीने चाचपणी करा.

शंका आल्यास तक्रार करा आणि ती जागा सोडून बाहेर पडा.

आपली सुरक्षा आपल्याच हातात असते. त्यामुळे सतर्क रहा तरच सुरक्षित राहू शकाल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।