मिठाचे हे ७ उपाय करून बघा, घरामध्ये तुम्हाला आठवडाभरामध्ये फरक जाणवेल.
तसेच पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्यास होणारे फायदे हे सर्व समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
खाद्यपदार्थात सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मीठ.
पण हा पदार्थ घरातलं वातावरण चांगलं ठेवण्यासाठीसुद्धा फारच लाभदायक ठरतो.
त्यासाठी अनेक प्रकारच्या उपायांमध्ये मिठाचा वापर केला जातो.
आज आपण मिठाचे असे महत्त्वाचे ७ उपाय बघूया ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरांमध्ये आठवडाभरात चांगला फरक जाणवेल.
मिठाचे बरेच प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत.
१) रॉक सॉल्ट याला पहाडी मिठही म्हणतात.
२) समुद्री मीठ याला खडे मीठ म्हणतात.
३) काळं मीठ
४) सामान्य दळलेलं बारीक मीठ
ज्योतिष शास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानतात, आणि म्हणूनच मिठाला स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात ठेवत नाहीत.
कारण जर तुम्ही मीठ स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात ठेवले तर चंद्र आणि शुक्राची युती होऊन घरादारावर परिणाम जाणवतात.
घरामध्ये आजारपण आणि समस्या निर्माण होतात.
मिठाला प्लास्टिक बरणीत सुद्धा ठेवू नका.
मीठ हे नेहेमी काचेच्या बरणीत साठवा, त्यामुळे मिठापासून कोणतंही अशुभ फळ तुम्हाला मिळणार नाही.
मित्रांनो, मीठ सांडणं हेसुद्धा अशुभ मानलं जातं.
मीठ सांडल्यामुळे चंद्र आणि शुक्र कमजोर होतात.
स्वयंपाक करताना जे पदार्थ चाखून पाहिले असतील, त्या पदार्थांचं पावित्र्य नष्ट होऊन गरिबी येते असंही मानलं जातं.
स्वयंपाकात मीठ कमी पडलं तर ते तुम्ही नैवेद्यानंतर घालू शकता.
लक्षात ठेवा मीठ हाताने दुसऱ्याच्या हातात डायरेक्ट देऊ नका, किंवा मिठाचा पुडा सुद्धा देऊ नका.
या मीठाचे फायदे ही बरेच आहेत, आणि वेगवेगळ्या उपायात मीठाचा वापर करून चांगले बदल घडवता येतात.
तर जाणून घेऊया मिठापासून लाभ कसे मिळवता येतात.
१) एक दारिद्रय कमी करण्यासाठी
घरातलं दारिद्रय दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा, मात्र कटाक्षाने गुरुवार सोडून फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडंसं रॉक सॉल्ट घाला.
या उपायांमुळे घरातली नकारात्मकता कमी होते, वातावरणातली पवित्रता वाढते.
लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग खुला होऊन घरामध्ये समृद्धी येते.
२) पैशाची आवक सुरू ठेवण्यासाठी
घरात सतत पैशाची आवक सुरू राहावी यासाठी काचेचा क्लास घेऊन त्यात पाणी आणि मीठ घेऊन घराच्या नैऋत्यला म्हणजे दक्षिण पश्चिम कोपऱ्यात हा ग्लास ठेवा.
ग्लासमधलं पाणी जेंव्हा सुकेल तेंव्हा ग्लास स्वच्छ धुऊन पुन्हा मीठ आणि पाण्यानं भरून ठेवा.
३) टॉयलेट आणि बाथरुमच्या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी.
मीठ हे प्रत्येक प्रकारची अस्वच्छता दूर करणारं केमिकल आहे.
एका काचेच्या बाऊलमध्ये खडेमीठ भरा आणि हा बाऊल टॉयलेट आणि बाथरूम मध्ये ठेवा.
या उपायानं नकारात्मकता दूर होते.
प्रत्येक महिन्यामध्ये हे मीठ टाकून देऊन बाऊल मध्ये नवीन मीठ भरावं.
४) दृष्ट काढायला.
तुम्हांला किंवा तुमच्या घरातल्या लहान मुलांना दृष्ट लागलेली तुम्हाला जाणवलं तर, चिमुट्भर मीठ घेऊन सात वेळा उतरून टाका आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करा.
यासाठी तुम्ही सिंक मधल्या नळाखाली हे मीठ टाकू शकता.
यामुळे लागलेली दृष्ट निघून जाईल.
५) व्यक्तीगत बाधा झाली असेल तर
एक मूठ बारीक दळलेले मीठ घेऊन स्वतःच्या डोक्यावरून संध्याकाळच्या वेळेला ३ त्रिवार उतरून टाका आणि हे मीठ दरवाजाच्या बाहेर टाकून द्या.
ही क्रिया लागोपाठ ३ दिवस करा त्यामुळे तुम्हाला आराम पडेल.
जर फरक जाणवलाच नाही तर मीठ टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करा.
६) वास्तुदोष
वास्तूत असणारा एखादा दोष जो तुम्ही दूर करू शकत नाही, पण ज्याचा तुम्हाला सतत त्रास होतो.
उदासीनता वाढते, भय, चिंता, नैराश्य सतावतात.
अशा दोषासाठी मिठाचा उपाय करून बघा.
यासाठी दोन्ही हातात मीठ घेऊन थोडा वेळ तसंच थांबा.
त्यानंतर मीठ वॉश बेसिन मध्ये टाकून पाणी टाका.
हे मीठ इकडं-तिकडं चुकूनही पडू देऊ नका
७) संपत्ती आणि समृद्धीसाठी
मीठ काचेच्या बरणीत भरून त्यात चार-पाच लवंगा टाका.
त्यामुळे पैशाची सतत आवक सुरू राहून सुख आणि समृद्धी घरामध्ये नांदेल.
लवंगा टाकल्यामुळे मिठाला सुगंध येईलच पण घरामध्ये पैशाची कधीही कमतरता जाणवणार नाही.
७) आजारपणातून मुक्ती मिळवा.
झोपताना डोकं पूर्वेला करून झोपा. झोपायच्या खोलीत रॉक सॉल्ट चे तुकडे ठेवा त्यामुळे आजारपण दूर पळून जाईल.
पाण्यात समुद्री मीठ टाकून अंघोळ केल्यास, त्वचेचे रोग दूर होतात, अर्थरायटीस च्या आजारात आराम मिळतो, थकवा दूर होण्यासही मदत होते.
घरांमध्ये एखादी व्यक्ती दीर्घ काळ आजारी असेल तर रॉक सॉल्ट किंवा काळया मिठाचा स्वयंपाकात नियमित वापर करा.
त्याचबरोबर आजारी व्यक्तीच्या डोक्याजवळ रॉक सॉल्ट किंवा काळं मीठ ठेवा. आठवड्याभराने हे मीठ बदलत राहा.
तर अशा पद्धतीने मिठाचा वापर तुम्ही केलात तर, तुम्हांला चांगला बदल तुमच्या आजूबाजूला घडताना दिसेल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Please give scientific reasons behind everything you wrote about salt.