सध्याच्या महागाईच्या काळात पैसे कमवण्याच्या निरनिराळ्या संधी शोधून काढणे आवश्यक बनले आहे.
आज आपण अशीच एक चांगली संधी बघणार आहोत.
होय, तुमची कार तुम्हाला दर महिन्याला चांगले पैसे मिळवून देऊ शकते.
जर तुमच्याकडे स्वतःच्या मालकीची कार असेल आणि तुम्हाला उत्तम प्रकारे ड्रायविंग येत असेल तर तुमची कार तुम्हाला महिन्याला चक्क ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत पैसे मिळवून देऊ शकते.
तुमच्याकडे दुसरे एखादे पूर्ण वेळ काम असेल तरी दिवसातील थोड्या वेळासाठी कारचा उपयोग करून तुम्ही १५ ते २० हजार रुपये एक्स्ट्रा इन्कम म्हणून मिळवू शकता.
चला तर मग, कारपासून पैसे कसे मिळवायचे ते आज आपण जाणून घेऊया.
कार वापरून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु आम्ही तुम्हाला त्यातील योग्य आणि वैध असणारे मार्ग सुचवणार आहोत.
ज्यामुळे तुम्ही कोणत्याही अडचणीत येणार नाही ह्याची खबरदारी देखील घेतली जाईल.
कार वापरून पैसे कमवण्याचे मार्ग
१. कॅब कंपनी साठी कार चालवणे
सध्या मोठ्या शहरात ओला, उबर सारख्या कंपन्या कॅब सर्विस देत आहेत. अशा कॅब सर्विस देणाऱ्या कंपनी बरोबर करार करून तुम्ही त्यांच्यासाठी तुमची कार चालवून पैसे कमवू शकता.
ह्यासाठी कॅब सर्विस देणाऱ्या कंपन्या तुम्हाला ग्राहक मिळवून देतात आणि ग्राहकाला आकारण्याचा रेट ही ठरवून देतात. त्याबद्दल त्या कंपनीला काही कमिशन द्यावे लागते.
तसेच कामाचे तास आणि कोणत्या एरियात कॅब चालवायची हे ठरवण्याची मुभा कॅब सर्विस कंपनी तुम्हाला देते. ह्या मार्गाने आपल्या सोयीनुसार गाडी चालवून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तसेच हयात दररोज पेमेंट मिळण्याचा ऑप्शन देखील असतो.
त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज पैसे कमवू शकता. मोठ्या शहरांमध्ये सध्या कॅब चालवणे हा चांगला व्यवसाय बनला आहे.
२. ट्रॅवल एजन्सी साठी कार चालवणे
तुम्ही एखाद्या ट्रॅवल एजन्सीबरोबर करार करून त्यांच्यासाठी कार चालवू शकता. शहरात आलेल्या पर्यटकांना दिवसभर किंवा त्यांच्या सोयीनुसार गाडीतून फिरवणे, निरनिराळ्या ठिकाणी घेऊन जाणे अशा पद्धतीचे हे काम असते.
ट्रॅवल एजन्सी ह्याचे ठरवून तुम्हाला पेमेंट आणि इनसेंटीव्ह देखील देते. ह्या कामात देखील चांगले पैसे मिळू शकतात. परंतु इथे ठराविक तास काम करणे आवश्यक ठरते.
तुम्ही आपल्या सोयीनुसार गाडी चालवू शकत नाही तर पर्यटकांच्या सोयीनुसार ती चालवावी लागते.
३. ऑफिस किंवा कॉल सेंटर साठी कार चालवणे
हल्ली बरेच ऑफिस किंवा कॉल सेंटर त्यांच्या एम्प्लॉयीजना नेण्या आणण्यासाठी गाड्यांचा वापर करतात. अशा ऑफिस किंवा कॉल सेंटर साठी गाडी चालवून देखील तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.
ह्यामध्ये ऑफिसमधील लोकांना एक विश्वासार्ह ड्रायवरची गरज असते जी तुम्ही निश्चितपणे पूर्ण करू शकता. अशा बाबतीत ऑफिस तुम्हाला पगार देऊ शकते किंवा डायरेक्ट पैसे देऊन थोडे कमिशन तुमच्याकडून घेऊ शकते. दोन्ही बाबतीत चांगले पैसे मिळण्याची हमी आहे.
४. तुमची कार भाड्याने देणे
वर दिलेल्या सर्व पर्यायांमध्ये तुम्ही तुमची कार स्वतः चालवणे गृहीत धरले आहे. परंतु तुमच्याकडे कार तर आहे पण काही कारणाने ती चालवणे तुम्हाला शक्य नसेल तरीही काळजी करू नका.
तुमच्या कार द्वारे तुम्ही तरीही पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्ही कॅब सर्विस कंपनी किंवा ट्रॅवल एजन्सीला तुमची कार भाड्याने देऊ शकता.
तसेच हल्ली झूम कार किंवा रेंटल कार ह्यासारख्या कंपन्या ग्राहकांना डायरेक्ट स्वतः कार चालवण्यासाठी भाड्याने देतात. तिथे तुम्ही तुमची कार देऊ शकता. अशा प्रकारे तुमची कार भाड्याने देऊन तुम्ही पैसे कमवू शकता.
तर हे आहेत वेगवेगळे पर्याय ज्यातून तुमच्या कारचा वापर करून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. परंतु सध्या तरी ही सर्विस भारतातल्या मोठ्या शहरांमध्येच अव्हेलेबल आहे. त्यामुळे मोठ्या शहरात राहणाऱ्या आणि स्वतःची कार असणाऱ्या लोकांना ही पैसे कमवण्याची चांगली संधी आहे.
तुम्ही छोट्या शहरात रहात असाल तरी स्वतः पुढाकार घेऊन छोट्या प्रमाणात असा व्यवसाय सुरु करू शकता. तसेच तुमच्या गावातील ट्रॅवल एजन्सीशी टाय अप करून देखील अशा पद्धतीचे काम करू शकता.
सावधानतेचा इशारा
अशा पद्धतीचे काम स्वीकारताना सावधानता बाळगणे मात्र आवश्यक आहे. विश्वासपात्र कंपनी किंवा कॅब सर्विसचीच अशा कामासाठी निवड करा.
तसेच काम सुरु करताना योग्य करार करा ज्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे वेळेवर मिळतील. कोणतेही नुकसान होणार नाही.
तर अशा प्रकारे योग्य पर्याय निवडून तुमच्या कारचा उपयोग करून भरपूर पैसे मिळवा आणि ह्या महागाईच्या काळात खर्चाला हातभार लावा.
पण अर्थातच कार चालवताना संपूर्ण सुरक्षेची काळजी घ्या.
ड्राइव सेफ!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.