केळ्याच्या सालींचे बागकामासाठी चार उपयोग 

 

अतिशय पौष्टिक असणाऱ्या केळ्याची साल सुद्धा उपयोगी पडते.  कसे ते जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

 केळे हे  एक अतिशय पौष्टिक  फळ आहे आणि त्याचा आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो हे तर आपण सर्व जाणतोच.  दररोज एक केळ खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले असते.

जर दररोज एक केळ खायचे ठरवले तर अर्थातच  आपल्याकडे  खूप मोठ्या प्रमाणात केळीच्या साली  जमा होतील.  मग त्या अशाच कचऱ्यात टाकून द्यायच्या का?  तर नाही.

जसे केळे पौष्टिक आहे तसेच केळीच्या सालींमध्ये देखील काही उपयोगी द्रव्य असतात. त्यामुळे केळीच्या साली  देखील आपल्याला खूप उपयोगी पडतात. झाडांसाठी एक उत्तम प्रकारचे खत म्हणून केळ्याच्या सालींचा प्रामुख्याने उपयोग होतो.

चला तर मग,  जाणून घेऊयात केळ्याच्या सालींचे बागकामासाठी (banana peels)  उपयोग. 

केळ्याच्या सालींचा प्रामुख्याने खत म्हणून उपयोग होतो.  केळ्याच्या सालींपासून इतक्या चांगल्या प्रकारचे खत कसे बनते हे जाणून घेण्यासाठी आधी केळ्याच्या सालींमध्ये असणारी घटक द्रव्य नेमकी कोणती ते पाहिले पाहिजे.

केळ्याच्या सालींमध्ये मोठ्या प्रमाणात  कॅल्शियम असते  ज्यामुळे  झाडाच्या मुळांची वाढ चांगल्या रीतीने होते तसेच मातीतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

केळ्याच्या सालींमध्ये मॅग्नेशियम असते ज्याच्यामुळे झाडांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया म्हणजेच फोटोसिंथेसिस  चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते.

केळ्याच्या सालींमध्ये फॉस्फरस असते  ज्याच्यामुळे झाडांमध्ये फुले आणि फळे येण्याचे प्रमाण वाढते तसेच  नवीन बीजे  अंकुरित होण्यास  सुद्धा याची मदत होते. (Pollination)

केळ्याच्या सालींमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम सुद्धा असते जे कीड आणि रोगप्रतिकारक म्हणून काम करते.  झाडांवर बसणारी कीड कमी करणे तसेच झाडांवर पडणारे रोग कमी करणे यासाठी याचा उपयोग होतो.

याचाच अर्थ केळीच्या साली  या झाडांसाठी एक उत्तम प्रकारचे खत ठरू शकतात ज्याचा आपल्या घरातील/  बागेतील झाडांना  खूप उपयोग होऊ शकतो.

परंतु खत म्हणून केळीच्या सालींचा वापर नेमका कसा करायचा?  केळीच्या सालींपासून खत नेमके कसे बनवायचे?

१.  घरगुती पद्धतीने सेंद्रिय  खत आणि कीटकनाशक बनवण्याची पद्धत. 

आपल्याकडे जमा झालेल्या केळीच्या साली  बारीक कापून  एका बादलीत भरून ठेवा.  सगळ्या साली  पाण्यात बुडतील  इतके पाणी त्या बादलीत घाला.  दोन ते तीन दिवस हे मिश्रण असेच ठेवून द्या.  फक्त अधून मधून ते मिश्रण हलवा.

साधारण तीन दिवसानंतर  हे मिश्रण गाळून घ्या.  नंतर ते पाणी झाडांना घाला.  ते पाणी झाडांच्या पानांवर स्प्रे करण्याचा देखील खूप उपयोग होतो.  केळ्यांच्या सालींपासून बनवलेले हे पाणी कीटकनाशक आणि खताचे काम करते.

२. घरगुती पद्धतीने  कोरडे सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत. 

केळ्याच्या सालींचे  एकसारखे तुकडे करून  ते एखाद्या ट्रेमध्ये पसरून ठेवा.  तो ट्रे उन्हात ठेवून  केळीच्या साली वाळवून घ्या.

वाळलेल्या केळीच्या सालींचा  डायरेक्ट खत म्हणून उपयोग होऊ शकतो. आपल्या घरातील कुंडी मधील मातीत ह्या वाळलेल्या साली  घालून वरून मातीचा अजून एक थर द्या.

किंवा ह्या वाळलेल्या केळीच्या सालींची मिक्सर मधून पावडर बनवून घेऊन  ती पावडर कुंडीत खत म्हणून घाला.

या दोन्ही पद्धतीने कुंडीतील मातीची गुणवत्ता चांगल्या प्रकारे वाढते आणि झाडांची वाढ जोमाने होऊ शकते.

३.  केळीच्या सालींचा कुंड्यांमध्ये थेट वापर करणे. 

झाडे लावताना माती आणि कोकोपीटचा वापर केला जातो.  तसेच काही प्रमाणात पालापाचोळा देखील वापरला जातो.  त्याच बरोबर  मातीत थेट केळीच्या सालींचे तुकडे मिसळले  तरी मातीची गुणवत्ता खूप वाढते.  अशा सालींमुळे हळूहळू कंपोस्ट खत तयार होऊन झाडांना चांगले पोषण मिळू शकते.

४. केळ्याच्या सालींपासून कंपोस्ट तयार करणे. 

घरगुती ओला कचरा जिरवण्यासाठी  हल्ली कंपोस्ट बीन्सचा वापर केला जातो.  असा ओला कचरा जमा करून  त्यापासून उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत  तयार करता येते.  या ओल्या कचऱ्यामध्ये  केळीच्या सालींचा तुकडे करून वापर केल्यास अतिशय चांगल्या प्रतीचे खत तयार होते.  यामुळे ओला कचरा जिरवण्याचा प्रश्न देखील सुटतो.  आणि घरगुती चांगले खत मिळाल्यामुळे झाडांची वाढ देखील जोमाने होते.

तर आपल्याला टाकाऊ वाटणाऱ्या केळीच्या सालींचे हे आहेत चार प्रकारचे उपयोग.

अशा पद्धतीने केळीच्या सालींपासून  खत तयार करून पहा आणि तुमचा अनुभव आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.  तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका.

रात्री झोपण्याआधी केळी खाण्याचे होणारे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा



माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।