देशात महागाईमुळे सर्वच गोष्टींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यात घरगुती वाणसामान देखील आहेच.
विशेषतः खाद्य तेलाच्या किमती मधल्या काळात खूपच वाढल्या आहेत. आयात निर्यातीवर वाढलेले निर्बंध हे ह्याचे प्रमुख कारण आहे असे सांगितले जाते.
अखिल भारतीय खाद्य तेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. शंकर ठक्कर ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात अमेरिका, मलेशिया आणि इंडोनेशिया येथून तेलाची मोठ्या प्रमाणात आयात होते. ह्या आयातीवर मधल्या काळात निर्बंध असल्यामुळे तेल महागले होते.
शिवाय हवामानामुळे जगभर पिकांचे झालेले नुकसान आणि ईदमुळे मलेशिया, इंडोनेशिया इत्यादि देशांमध्ये कमी झालेले उत्पादन हे देखील खाद्य तेलाच्या किमती वाढवण्यास कारणीभूत ठरले आहे.
परंतु आता खाद्य तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज मंगळवार १५, जून २०२१ रोजी अमेरिकेत एका खाद्य तेलाशी निगडीत मोठ्या निर्णयाबाबत बैठक होणार आहे.
बायो फ्युलमध्ये किती प्रमाणात रिफाईण्ड ऑइल मिसळले जाऊ शकते हा तो निर्णय आहे.
बायो फ्युलमध्ये ४६% पर्यन्त रिफाईण्ड ऑइल मिसळले जाऊ शकेल असा प्रस्ताव आहे.
याआधी ही टक्केवारी १३ % इतकीच होती. हा प्रस्ताव मान्य होण्याचीच जास्त शक्यता आहे. असे झाले तर खाद्य तेलाच्या किमती झपाट्याने कमी होऊ शकतील.
तसेच आता मलेशिया आणि इंडोनेशिया मधील तेल उत्पादन पूर्वपदावर आल्यामुळे आणि आयात निर्यातीवरील निर्बंध कमी झाल्यामुळे तेलांच्या किमती कमी होण्यास मदत होईल.
ह्याशिवाय आता भारतात मोहरीच्या पिकाचे ८६ लाख टन इतके भरघोस उत्पादन झाले आहे. त्यामुळे मोहरीच्या तेलाचे उत्पादन देखील वाढणार आहे.
हे देखील तेलाच्या किमती कमी करण्यास मदत करू शकेल.
आज घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर हे अवलंबून आहे की आता खाद्य तेल सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार का?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.