गॅस सिलेंडर, कनेक्शन बाबतीत फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी ते वाचा या लेखात
घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आजच्या काळात वापरायची म्हटली तर घरोघरी LPGच्या चुली असेच म्हणावे लागेल.
यातला गंमतीचा भाग सोडला तर गॅस कनेक्शन ही आपल्या घरातील अत्यंत गरजेची अशी गोष्ट आहे.
मायक्रोव्हेव, इंडक्शन या सोयी असल्या तरी घरोघरी गॅस कनेक्शन लागतेच.
आपल्याला अशा ज्या गरजेच्या गोष्टी असतात त्याबद्दल सजग असणे गरजेचे आहे कारण अशा गोष्टींमध्ये फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते.
गॅस सिलिंडर बाबतीत पण फसवणुकीची काही प्रकरणे निदर्शनास आली आहेत.
कदाचित एका गॅस सिलिंडर मागची फसवणूक फार मोठी वाटत नसेल सुद्धा पण गॅस ही नेहमीच लागणारी गोष्ट असल्याने दर वेळेला अशी थोडी थोडी फसवणूक होत गेली तर नुकसानाची रक्कम फार मोठी होते शिवाय कोणत्याही बाबतीत, कितीही कमी रकमेचे जर नुकसान होत असेल तर त्याबद्दल आपण सतर्क असायलाच हवे.
आज या लेखात त्याच संदर्भात माहिती दिली आहे. गॅस बाबतीत फसवणूक कोणत्या प्रकारे होते व ती होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची हे या लेखात तुम्हाला समजणार आहे.
गॅस बाबतीत फसवणूक होण्याच्या तीन शक्यता आहेत. काही भागात या तिन्ही गोष्टी होत असल्याचे वेगवेगळ्या माध्यमातून समजले आहे. या तीन शक्यता कोणत्या आहेत हे आपण एकेक करून बघूया.
१. एक्सपायरी डेट झालेले सिलिंडर देणे
गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट कशी ओळखाल?
सिलेंडर पकडण्यासाठी वरच्या भागात जी गोल लोखंडी रिंग असते, त्या खाली तीन रंगाच्या पट्ट्या असतात. त्यातल्या काळ्या रंगाच्या पट्टीवर गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट लिहिलेली असते. यावर A, B, C आणि D अक्षर लिहिलेली असतात.
तसेच या अक्षरांसोबत दोन अंक लिहिले असतात. या अक्षरांवरुन सिलेंडर ची एक्सपायरी डेट ओळखता येते.
जसे…
A – जानेवारी ते मार्च
B – एप्रिल ते जून
C – जुलै ते सप्टेंबर
D – ऑक्टोबर ते डिसेंबर
सिलेंडर पकडण्यासाठी वरच्या भागात जी गोल लोखंडी रिंग असते, त्या खाली तीन रंगाच्या पट्ट्या असतात. त्यातल्या काळ्या रंगाच्या पट्टीवर गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट लिहिलेली असते. यावर A, B, C आणि D अक्षर लिहिलेली असतात.
तसेच या अक्षरांसोबत दोन अंक लिहिले असतात. या अक्षरांवरुन सिलेंडर ची एक्सपायरी डेट ओळखता येते.
जसे…
A – जानेवारी ते मार्च
B – एप्रिल ते जून
C – जुलै ते सप्टेंबर
D – ऑक्टोबर ते डिसेंबर
२. गॅस सिलिंडरमधून गॅस चोरला जाणे
२०१९ मध्ये उज्ज्वला योजने अंतर्गत देशभरात ८ करोड मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार असल्याचे जाहीर केले गेले.
त्यानुसार सुमारे ६ करोड कनेक्शन्स दिली गेली पण दुर्दैवाने त्यामध्ये बरीच अफरातफर करण्यात आली.
यातील बऱ्याच गॅस सिलिंडरमधून गॅस चक्क चोरला गेला असून सिलिंडरमध्ये जितका गॅस असणे अपेक्षित असते त्यापेक्षा कमी गॅस असलेले सिलिंडर लोकांना मिळाले.
आपल्या बाबतीत सुद्धा हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गॅस सिलिंडर आल्यावर आपण काही त्याचे वजन करून शहानिशा करून घेत नाही.
त्यामुळे अशी फसवणूक होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. असे झाल्यास गॅस लवकर संपला असेल असे म्हणून आपण स्वतःची समजूत काढतो.
पण याच भाबडेपणाचा फायदा उचलला जातो. नेहमीचा स्वयंपाक करून, कोणीही पाहुणे आले नसताना सुद्धा जर तुमचा गॅस सिलिंडर नेहमी पेक्षा कमी दिवसांतच संपत असेल तर तुमच्या सिलिंडरमधून गॅसची चोरी झाल्याची शक्यता असते.
१४.२ वजनाच्या गॅस मधून साधारण २०० ग्राम ते अडीच किलोपर्यंत गॅसची चोरी होण्याची शक्यता असते. गॅसच्या वजनामध्ये जास्तीतजास्त फरक हा +/- १५० ग्रामचा असायला हवा असा नियम आहे.
त्यामुळे त्यापेक्षा जास्त फरक असला तर तुमच्या सिलिंडरमधून गॅसची चोरी होत आहे हे समजावे.
आता हे होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?
खरेतर तुम्ही गॅस घेताना तुम्हाला याबाबत समजणार नाही कारण तुमच्या गॅसचे सील जरी उघडून परत लावले गेले असेल तरी ते करताना चोरी करण्याऱ्यानी ते अशाप्रकारे परत जोडले असेल ज्यामुळे तुम्हाला, किंवा कोणत्याही सामान्य माणसाला त्याचा पत्ता लागणार नाही.
अशामुळे ही गोष्ट गॅस संपल्यावरच निदर्शनास येणार, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असणार.
मग गॅसच्या बाबतीत अशी फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?
याकरता एक ऍप्लीकेशन आहे. या ऍप्लीकेशन द्वारे तुम्ही तुमच्या सिलिंडरमध्ये तुम्ही ज्या प्रमाणासाठी पैसे भरले आहेत त्याच योग्य प्रमाणात गॅस आहे ना, याची खात्री करून घेऊ शकता.
Chkfake हे त्याचे नाव. या ऍप्लीकेशन द्वारा तुम्ही तुमच्या गॅस सिलिंडरची शहानिशा करू शकता.
जर तुमच्या गॅस सिलिंडरमधून गॅस चोरला गेला असेल तर त्याचा काही खुणा सिलिंडरवर शिल्लक राहतात.
या ऍप्लीकेशन द्वारे त्याच खुणा तुम्हाला दिसणार आहेत. टेलिग्राफच्या एका रिपोर्टनुसार, डिलिव्हरी बॉय कडून ग्राहकाला सिलिंडर देण्याच्या मार्गात जसे गॅस चोरला जाण्याची शक्यता असते, तसेच एजन्सीच्या गोडाऊन मध्ये सुद्धा गॅस काढला जाण्याची बरीच प्रकरणे निदर्शनास आलेली आहेत.
प्रत्येक सिलिंडरमधून थोडा थोडा गॅस काढून घेऊन तो बाहेर विकला जातो. यामुळे तुम्हाला जेव्हा सिलिंडर दिला जातो तेव्हा तो पूर्णपणे भरलेला आहे ना याची खात्री करून घेणे हेच हिताचे आहे.
यासाठी प्रथम तुम्हाला Chkfake हे ऍप्लीकेशन डाऊनलोड करावे लागेल. हे तुम्हाला गुगल प्ले स्टोअर व ऍपल ऍप स्टोअरवर मोफत उपलब्ध असेल.
त्यानंतर तुम्हाला हवे असलेले प्रोडक्ट यामध्ये तुम्ही शोधू शकता. त्यामध्ये ‘verify’ या पर्यायावर क्लिक करून तुमच्या समोर असलेल्या प्रोडक्ट वरचा कोड स्कॅन करावा.
तुमच्या गॅस सिलिंडरचे सील उघडून गॅस ची चोरी केली गेली असेल तर ते तुम्हाला यामधून दिसेल.
३. खोटे सर्व्हिसमन
बऱ्याचदा घरी गॅस एजन्सीमधून आलो असल्याचे खोटे गॅसची तपासणी करायला सांगत माणसे येतात.
गॅसची तपासणी करताना ते गॅसच्या पाईपला लिक आहे, रेग्युलेटर बिघडला आहे असे सांगतात. असे सांगितल्यानंतर घाबरणे साहजिक आहे. कधीकधी तर ते घरातल्यांचे लक्ष नसताना स्टोव्हचा नॉब सैल करून तिथे काडी लाऊन भीती सुद्धा दाखवतात.
गॅसच्या बाबतीत कोणताच धोका पत्करायची आपली तयारी नसते आणि ते बरोबरच आहे पण त्यामुळे अशा फसव्या लोकांना बळी पडता कामा नये.
खोटा लीक सांगून ही लोकं पुष्कळ प्रमाणात पैसे घेतात. नुसत्या तपासणीचे सुद्धा पैसे जास्त सांगतात.
तुम्ही एकदा त्यांना घरात घेतल्यावर त्यांना पैसे देऊन बाहेर पाठवण्यापलीकडे तुमच्याकडे काही गत्यंतर नसते.
हे खरे आहे की गॅस एजन्सीवाले सर्व्हिसमन तपासणी करायला पाठवतात पण त्यासाठी त्यांची काहीतरी नियमावली असते. उठसुठ कोणीही कधीहीघरी येऊ शकत नाही. मग तुमच्या दारात आलेला सर्व्हिसमन खरा आहे की खोटा हे कसे ओळखाल?
१. गॅस एजन्सीची माणसे कनेक्शन तपासायला ५ वर्षातून एकदा येतात.
२. कनेक्शन तपासणीचे पैसे रुपये २२५ इतकेच भरावे लागतात, ५ वर्षातून एकदा.
३. सहसा गॅस डिलिव्हरीच्या वेळेसच हे केले जाते.
४. तपासणीला सर्व्हिसमन पाठवण्या अगोदर गॅस एजन्सी तुम्हाला SMS द्वारा कळवते.
आता अशा सर्व्हीसमनना घरात घ्यायच्या आधी काय काळजी घ्यावी?
१. सर्व्हिसमनचे आयडेन्टीटी तपासूनच त्यांना घरात येऊ द्यावे.
२. तुम्हाला जर काही शंका आली तर लगेच गॅस एजन्सीला फोन करावा.
या व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमच्या गॅस कनेक्शन संबंधी काही शंका असतील किंवा लीक आहे अशी भीती असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधू शकताच.
मित्रांनो, या अशाप्रकारच्या फसवेगिरीपासून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या लेखात सांगितल्या प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.