लक्ष्मी पूजन मुहूर्त : २४ ऑक्टोबर २०२२ संध्याकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी सुरु होत असून रात्री ८ वाजून १६ मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त आहे.
दिवाळीच्या सणाला आपण लक्ष्मीपूजन, कुबेर पूजन करतो.
घरीदारी धनाची बरसात होत रहावी, माता लक्ष्मीचे वास्तव्य सदैव आपल्या घरात असावे यासाठी आपण मोठ्या श्रद्धेने तिची मनोभावे पूजा करतो.
या लेखातून आम्ही तुम्हाला एक विशिष्ट असा मंत्र आणि पूजाविधी सांगणार आहोत.
यामुळे सदैव आर्थिक भरभराट होते. जाणून घेऊया या पूजेचे धार्मिक महत्त्व!!!
दिवाळीच्या दिवशी गणेश लक्ष्मी पूजा केल्याने धन, धान्य आणि उत्तम आरोग्य यांची प्राप्ती होते.
गणेश लक्ष्मी पूजा विधी
दिवाळी दिवशी संध्याकाळी लोक आपले घरदार स्वच्छ झाडून घेतात. आजूबाजूचा परिसर देखील साफ करतात.
दारासमोर सुंदर रांगोळी काढून घराला मंगल तोरण लावून सजावट सुद्धा करतात. उंबरठ्याजवळ तसेच अंगणात, तुळशी वृंदावनाजवळ सुंदर पणत्या लावतात.
दारात आकर्षक आकाशकंदील लावून सर्व आसमंत प्रकाशाने उजळून टाकतात.
जिथे स्वच्छता, प्रकाश, सौंदर्य असते तिथे लक्ष्मी देवीचा वावर असतो.
आणि अशाच ठिकाणी ती स्थिर होते.
म्हणून हा प्रकाशाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा हजारो वर्षे चालत आलेली आहे.
दिवाळी पूजेचा मुहूर्त
दिवाळीची ही पूजा तिथीप्रमाणे अमावास्येला केली जाते. अश्विन अमावास्येला प्रदोष काळ हा गणेश लक्ष्मी पूजेचा योग्य मुहूर्त होय. या पूजेसाठी भक्तगण श्रीगणेशाची आणि लक्ष्मी मातेची नवीन प्रतिमा विकत आणतात.
या प्रतिमा सुंदर सजवलेल्या चौरंगावर स्थापन करतात. चारी बाजूंनी पणत्या, सुगंधी फुले यांनी आरास करतात.
या पूजेसाठी चंदन, हळद, कुंकू, शेंदूर, श्रीफळ, कलश, फुले, विड्याची पाने, सुपारी, तांदूळ इत्यादी साहित्य आवश्यक आहे. प्रसाद म्हणून मिठाई किंवा इतर गोडाधोडाचे पदार्थ अर्पण केले जातात.
अशाप्रकारे पूजाविधी संपन्न झाला की मग वेदमंत्रांचे पठण केले जाते.
आम्ही अशाच काही मंत्रांची माहिती तुम्हाला देत आहोत. शास्त्रोक्त पद्धतीने यांचे उच्चारण केले असता या मंत्रांचा निश्चित फायदा होतो. हे प्रभावी मंत्र असून यांच्या पठणाने माता लक्ष्मी आणि श्रीगणेशाची अखंड कृपा तुमच्यावर बरसत राहिल.
त्यामुळे धनधान्य आणि विद्यारुपी समृद्धी तुमच्यावर प्रसन्न होईल.
पाहूया कोणते आहेत हे वेदिक मंत्र
आर्थिक भरभराट होण्यासाठी म्हणण्याचा मंत्र
ॐ श्री महालक्ष्म्यै नमः
सर्व प्रकारच्या समृद्धीसाठी
||ॐ ऱ्हिं श्रीं क्लिं महालक्ष्मी नमः||
सर्व प्रकारच्या सुखासाठी
||ॐ श्रीम् श्री s नमः||
आध्यात्मिक पातळीवर प्रगती होण्यासाठी
|| ॐ महादेविच् विद्महे, विष्णूपत्नीच धीमही, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ||
हे विशेष दिवाळी मंत्र म्हणजे बीज मंत्र असून त्याचा नाद वातावरणात विशिष्ट ध्वनी लहरी निर्माण करतो.
यामुळे सकारात्मक स्पंदने निर्माण होतात. आणि परिणामस्वरूप शुभ फलप्राप्ती होते.
याशिवाय पूजाविधी मंगल वातावरण निर्माण करण्यासाठी खूपच प्रभावी आहे. त्यामुळे मानसिक समाधान आणि शांतीचा अनुभव येतो.
तर तुम्हीही या दिवाळीत या बीज मंत्र उच्चारांसहीत गणेश लक्ष्मी पूजा करुन मानसिक शांती आणि समृद्धीचा अनुभव घ्या.
सर्व वाचकांना दीपावली शुभेच्छा!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.